Skip to main content

#व्यवसायासाठी आवश्यक संसाधने:-..

व्यवसायासाठी आवश्यक संसाधने:-

कोणताही व्यवसाय सुरु करीत असतांना काही मुलभूत गोष्टींचा विचार करावाच लागतो. ज्यामध्ये जमीन (जागा), भांडवल (पैसे), मनुष्यबळ (कामगार), कच्चा माल (जर गरज असेल तर) या संसाधनांचा विचार सर्वात आधी करावा लागतो. त्याचप्रमाणे मार्केटींग (विपणन), जाहिरात, हिशोब ठेवणे या गोष्टीही तितक्याच आवश्यक ठरतात. या संसाधनांचा योग्य वापर करणे हे कोणत्याही व्यावसाईकासाठी आवश्यक गोष्ट ठरते. व्यवसायासाठी योग्य जागा, त्याचप्रमाणे व्यवसायाच्या उभारणीसाठी पुरेसे भांडवल हाताशी असणे आवश्यक ठरते.

काही काही व्यवसायासाठी कच्च्या मालाची गरज लागत नाही. पण जाहिरात आणि विपणन आवश्यकच ठरते अश्यावेळी ती ती कौशल्य असलेली माणसे बरोबर बालागावीच लागतात. ब-याच वेळा व्यावसाईकाच्या अंगी यातली अनेक कौशल्य असतात किंवा त्याला या सर्व बाबींचे किमान ज्ञान असते. परंतू व्यावसाईकाच्या हातात असलेला वेळ आणि कामे याची सांगड घालणे कठीण जाते त्यावेळी त्याला प्रशिक्षीत मनुष्यबळ बरोबर नोकरीला ठेवावेच लागते.

स्वतःचा व्यवसाय सुरु करा

नोकरी करणे किवा मिळवणे प्रत्येकालाच शक्य नसते. तेव्हा स्वतः चा व्यवसाय हा चागला मार्ग आहे.

व्यवसाया विषयी थोडेसे

स्वतः चा व्यवसाय म्हणजे आपण इतर कोणासाठी काम न करता स्वतःच स्वतःसाठी काम करून पैसे मिळवणे. यामध्ये सुरवातीला जरी थोड्या पैश्यची आवशकता भासली तरी एकदा व्यवसाय वाढल्यावर नफाही मिळतो. आणि तो व्यवसायासाठी लागणारा खर्च वजा जाता स्वत:चा असतो. त्यामुळे स्वतः चा व्यवसाय सुरु करताना घाबरून न जाता सुरवातीच्या भांडवला साठी तुम्ही काही सरकारी योजनांचाही लाभ घेऊ शकता. मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

व्यवसाय निवडतांना घ्यावयाची काळजी

सर्वात आधी तुम्हाला कुठल्या गोष्टीची आवड आहे आणि कुठल्या गोष्टींचा व्यवसाय करण्याची तुमची क्षमता आहे याचा विचार करा, व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणा-या आवश्यक भांडवलाचाही विचार करा. सुरवातीला तुम्ही अगदी छोटा किवा सिझनल व्यवसाय करून ही बाजरपेठेचा अंदाज घाऊ शकता. नंतर हळू हळू जशी मागणी वाढेल तसा  तसा व्यवसाय वाढवू शकता.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...