मल्चिंग पेपर
कमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी बांधवांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतो. मल्चिंग पेपर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास खऱ्या अर्थाने शेतकरी एक पाऊल प्रगतीकडे वाटचाल करतील. मल्चिंग पेपर च्या मदतीने शेती हा शेतकरी बांधवांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मल्चिंग पेपर च्या वापरामुळे तणांची वाढ होत नाही. तणांची वाढ होत नसल्याने खर्चात कपात होते. दर्जेदार उत्पादन मिळते,यामुळे उत्पादनाला चांगला भाव मिळतो. निश्चितच याचा फायदा शेतकरी बांधवांना होतो. मल्चिंग च्या मदतीने भाजीपाल्यासह अनेक पिकांची शेती करणे शक्य आहे. यामध्ये भाजीपाला पिकांपासून ते फुल पिकांपर्यंत सगळी पिके मल्चिंग पेपर च्या मदतीने घेता येतात.
मल्चिंग पेपरचे फायदे
• बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी पूर्णतः थांबवते. त्यामुळे पाण्याची बचत होते.
• बाष्पीभवन थांबविल्यामुळे जमिनीतील क्षार वरच्या भागावर येण्याचे प्रमाण थांबते.
• खतांच्या वापरात बचत होते. कारण खतांचे पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.
• जमिनीत हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो.
• वार्षिक तणाच्या वाढीस प्रतिकार होतो. कारण सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही.
• प्लॅस्टिकच्या प्रकाश परिवर्तनामुळे काही किडी-रोग दूर जातात. त्यांचे प्रमाण कमी होते.
• जमिनीचे तापमान वाढते. जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते.
• आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरणनिर्मिती होते. ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिक असते.
• लाभदायक सूक्ष्मजीवांची क्रिया अधिक होते.
• पेपरखालील जमिनीचे मौलिक गुणधर्म सुधारतात. उगवण २-३ दिवस लवकर होते.
• भुईमुगासारख्या पिकात मुळांवरील वरील गाठींचे प्रमाण वाढते.
• सूत्रकृमींचे प्रमाण कमी होते. पावसाच्या थेंबामुळे होणारी जमिनीची धूप थांबते.
Comments
Post a Comment