Skip to main content

#MakeMyTrip...

MakeMyTrip :-

MakeMyTrip हे अॅप आजकाल सर्वांच्या मोबाईलमध्ये असते. हवाईसेवा, बस, ट्रेन किंवा देशातील तसेच परदेशातील हॉलिडे हॉटेल्स बूक करायचे असल्यास आपण MakeMyTrip या कंपनीची सेवा पसंत करतो. फिरायचं असेल किंवा कार्यालयीन कामानिमित्त बाहेर राज्यात जाणे असो, या कंपनीची सेवा आपल्यासाठी हमखास तयार असतेच. कंपनीने उत्तम सुविधेमुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. आता घेऊया या कंपनीच्या कार्याचा आढावा.

साधारण २००० साली दीप कालरा यांनी MakeMyTrip ही स्टार्टअप कंपनी सुरू केली. तेव्हाचा काळ म्हणजे नामी बिझनेसमनचा. त्यात स्टार्टअप ही संकल्पना फारच नवीन होती. परंतु दीप यांना आपल्या कल्पनेवर परिपूर्ण विश्वास होता. पुढे जाण्यापूर्वी त्यांच्या संघर्षाबद्दल जाणून घेऊयात. दीप यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयाचे पदवीधर झाले. पुढे एमबीएची डिग्रीसाठी त्यांनी आयआयएम-अहमदाबाद येथून पूर्ण केली.

त्यावेळचा काळ म्हणजे एमबीएसाठी महत्त्वपूर्ण काळ होता. अनेक मोठ-मोठ्या कंपन्या एमबीए झालेल्या विद्यार्थ्यांना मोठी पोस्ट आणि गलेलठ्ठ पगाराची नोकरी देत होते. अशातच दीप कालरा हे एबीएन ऍम्रो बॅंकेमध्ये नोकरीसाठी रुजू झाले. परंतु पुढच्या काही वर्षात त्यांना ही नोकरी कंटाळवाणी वाटू लागली. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि पुढचा एक वर्ष आपण भविष्यात काय करायचे यावर केंद्रित केला.

दरम्यान, याच काळात दीप यांना समजले की, ”जीवनात पैसाच सर्व काही नाही, आपण जे काम करीत आहोत त्यात आपल्याला रस नसेल तर ते काम व्यर्थ आहे!” आणि हीच जाणीव घेत ते जीवनातील प्रवास करीत राहिले. याच वेळी त्यांनी काही कंपन्यात काम केले पण त्यातही अपयश पदरी पडले. पुढे दीप यांनी जीई कॅपिटलमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट म्हणून काम सुरु केले. या वेळेस त्यांचा संपर्क इ-कॉमर्समधील महत्त्वाचा लोकांशी झाला. त्यातूनच MakeMyTrip ची संकल्पना उदयास आली आणि दीप कालरा हे ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनीचे संस्थापकीय अध्यक्ष झाले.

MakeMyTrip ही कंपनी काही वर्षात भारतातील महत्त्वाची प्रवासी वेबसाईट म्हणून प्रसिद्ध झाली आहे. कंपनी 50 शहरात 65 रिटेल्स स्टोअर्स सांभाळत आहे तसेच कंपनीची ऑफिसेस न्यु यॉर्क आणि सिडनी या महत्त्वाच्या शहरात आहेत. महात्त्वाचे म्हणजे 2010 साली कंपनीचे शेअर्स नॅसडॅक या अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाले आहेत. अशा कंपनीचा मार्केट रेव्हेन्यू 255.37 मिलीयन डॉलर आहे असून कंपनीत दोन हजारांहून अधिक लोकं काम करतात. तसेच या स्टार्टअपला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

MakeMyTrip चे फाऊंडर दीप कालरा यांनी एकदा सांगितले होते, “तुमचा बिझनेस छोटा असो वा मोठा त्याला उत्तम बिझनेस बनवा, त्याचा कारभार स्वच्छ ठेवा, त्याला असा बिझनेस बनवा ज्याचा तुम्हाला गर्व होईल.” आपलाही बिझनेस वाढविताना दीप कालरा यांचा कानमंत्र लक्षात ठेऊया आणि पुढे वाटचाल करुया…

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...