Skip to main content

#शूज लॉन्ड्री...

शूज लॉन्ड्री एक अफलातून उद्योग:-

तुम्ही कपड्याची लॉन्ड्री, कार वॉश ऐकले आहे, पण शूज लॉन्ड्री ऐकले आहे का? महागड्या ब्रँडचे शूज ज्यांची किंमत १० ते १५ हजार किमतीची असते, अशा श्रीमंत सेलेब्रिटी लोकांकडे असे महागडे शूज असतात. अशा शूजचा वापर फार खूप कमी असतो. काही इव्हेंट, कार्यक्रम इत्यादी वेळीच वापर होतो. त्यामुळे असे शूज लवकर खराब होत नाहीत. त्यामुळे त्यांचा मेंटेनन्स करावा लागतो.

बरेच वेळा त्यांची शायनिंग जाते किंवा त्याचा एखादा पार्ट किंवा थोडासा खराब झाला तर फेकून न देता त्याला शूज लॉन्ड्रीमध्ये पाठविले जाते. शिवाय असे शूज वर्षातून एकदा तरी स्टरलाइज करून घेतले जातात. अशा शूज लॉन्ड्रीमध्ये शोरूमप्रमाणे नवीनच केले जातात. यामध्ये जगातल्या टॉप शूज ब्रँड येतात. उदा. नायके, वुडलँड, मुली, लुईस, व्हीटोन, मनोलो, जिम्मीचु, वॉल्टर, स्टेजर, अलेक्झांडर, मॅक्वीन, ब्रीयन अटवुड, स्टुअर्ट बीरझमन, मीऊ मीऊ ह्या ब्रँडच्या शूज, सॅन्डल इत्यादीची किंमत १५ हजारांपासून सुरू होते. या प्रकारचे ग्राहक मुंबईत तुम्हाला कुलाबा, बांद्रा, अंधेरी, पवई, वरळी, जुहू अशा एरियांत भेटतील.

या उद्योगासाठी या ब्रँडच्या शूजची संपूर्ण माहिती लागते, त्याच मॉडेलच्या शूजचे सर्व पार्ट्स, लेस, सोल इत्यादी सर्व तुमच्याकडे असावे लागते. तुम्हाला ३०० फुटांची जागा लागते, त्यात शूज वॉश करण्यासाठी व ड्राय करण्यासाठी व्यवस्था लागते त्यानंतर डेटिंग, पेंटिंग, पॉलिशिंग तसेच ते स्टरलाइज केले जातात व परत नवीनप्रमाणे रीपॅक केले जातात. या उद्योगाची तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून जाहिरात करता व ग्राहकांचे फोन येतात. तुमचा पिकअप बॉय शूज घेऊन येतो, ते शूज तुमच्या लॉन्ड्रीत पूर्णपणे तयार झाल्यानंतर ते ग्राहकाकडे पोहोचविले जातात. असे शूज लॉन्ड्री करण्याचा कमीत कमी खर्च रु. ३०० पासून सुरू होते.

शूज अधिक महागडा असल्यास व त्याच्या स्पेअर्सची जास्त किंमत असल्यास ती फी २ हजारपर्यंत जाऊ शकते. शूज लॉन्ड्री हा उद्योग भारतासह जगातील सर्व मोठ्या व श्रीमंत शहरांत चालतो. रोज सरासरी १५ ते २० शूजची ऑर्डर मिळते. रोज ७ ते १० हजारांचा गल्ला जमतो. कर्मचारी, स्पेअर्स व इतर खर्च वजा जाता सुमारे ५०% फायदा म्हणजे रोज ३ ते ४ हजारांचा निव्वळ नफा होतो म्हणजेच महिना १ लाख रुपये. ह्या उद्योगासाठी सुमारे पाच लाखांचे भांडवल लागते. एकदा मार्केटमध्ये नाव झाल्यावर उद्योग अधिक वाढत जातो.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...