chinese Bamboo Tree .
...
...
खरंतर बांबू म्हणजे गवत , पण या प्रकाराला Tree असे म्हणतात .
कारण पण तसंच आहे .
याची होणारी वाढ .. चायनीज बांबू ट्री ची उंची होते ती 80 ते 90 फूट .
आणि ते टिकते पण शंभर वर्ष .
..
तर याच्या स्टोरी चा आणि व्यावसायाचा काय संबंध ?
..
पूर्ण वाचा ..
..
..
चीन मध्ये एक शेतकरी होता .
त्याला त्याच्या मित्राने बांबूची लागवड करण्याकरिता त्याचे बीज दिले .
आणि हे सांगून दिले कि , हा प्रयोग तुझी परिक्षा घेईल .
..
त्या शेतकऱ्याने उजाड माळावर ... याचे बीज लावले , आणि त्याच्या मित्रांच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक बीजा जवळ मार्किंग करून त्यांना रोज पाणी दयायला सुरुवात केली ..
पाणी देऊन आठ दिवस झाले तरी काहीच हालचाल दिसेना .
तो रोज जाई ... मार्किंग केलेल्या ठिकाणी पाणी देई .
पण काहीच हालचाल दिसेना ....
.. पाणी - खत .... खत ... परत पाणी असे करत करत
पूर्ण वर्ष झाले . तरिही कसलाच कोंब दिसेना ,
आता त्याचे घरचे लोक पण त्यास म्हणू लागले ... काहीच होणार नाही याचे .
...
..
...
पण त्याच्या कानात त्याच्या मित्राचे शब्द होते , कि हे पीक तुझी परिक्षा घेईल .
..
तो रोज जाई .. त्या माळ रानावरील मार्किंग केलेल्या ठिकाणी पाणी देई ,
वर्ष दुसरे , तिसरे , चौथे ... सरले ... पण काहीच नाही ,
लोकांनी त्याला वेडयात काढायला चालू केले , लोकांनी त्याला या कर्मापासून परावृत्त करायला चालू केले , त्यात त्याचे आपली माणसं पण होती .
पण हा चालत राहिला कोणाचही काहीही मनावर न घेता , नित्य नेमाने पाणी टाकत राहिला .
...
...
वर्ष पाचवे ..
आणि अचानक एक दिवस ... सर्व मार्किंग केलेल्या ठिकाणाबरून एक - एक फुटाची रोपे बाहेर आलेली ,
तो अचंबीत झाला .
सर्व गाव ते बघायला बाहेर आलेले .
दुसऱ्या दिवशी रोपांची उंची दुप्पट , तिसऱ्या दिवशी चौपट ..
सर्वच जण अचंबीत .... आणि पाच आठवड्यात 90 फुट उंची गाठली त्या बांबूनी .
...
...
वरील स्टोरी फक्त कल्पना विलास नव्हे ...
तर रिअॅलटी आहे .
चायनीज बांबू ट्री जमीनीच्या बाहेर यायला पाच वर्ष घेतो , आणि एकदा का बाहेर आला कि , फक्त पाच आठवडयात 90 फुटाची उंची गाठतो .
मग आपण काय म्हणू ? . कि या बांबूला उगवायला किती दिवस लागतात ? पाच आठवडे का पाच वर्ष - पाच आठवडे ?
...
...
आपणा व्यावसायिकांचं पण तसंच असते ,
भलेही पाच वर्ष जमिनीवर काहीही दिसत नसले तरी त्या बांबूची मुळे जमिनीत पसरत असतात ,
तसे आपल्याला पण संबंध पक्के करायचे असतात .
...
कोणीही काहीही म्हणो , नावे ठेवो आपण आपले काम करत चालावे लागते .
कारण एका दिवसात उगवणारे ... गणपतीच्या डेकोरेशन समोरचे अळीव .. फार काळ जगत नाही . त्याचा फारसा उपयोग पण होत नाही .
म्हणून .. म्हणून ... व्यावसायिक बंधूनो आणि उद्योजक मित्रांनो ... सुरुवातीच्या काळात जरी काही दिसले नाही , तरीही निरुत्साही होऊ नका ,
पाणी देत रहा , खत देत रहा , आणि ज्या दिवशी रिजल्ट निघेल .. त्या दिवशी जगाचे डोळे फाटतील .. शंभर टक्के .
...
...
म्हणून जेंव्हा लवकर रिजल्ट दिसणार नाही .. तेंव्हा लक्षात घ्या , काम खूप मोठे होणार आहे वेळ लागेल
...
...
मोठ्ठे होण्यासाठी शुभेच्छा .
...
..
Comments
Post a Comment