Skip to main content

#कडकनाथ..

काळाभोर कडकनाथ
अनेकांना नोकरी करण्यापेक्षा एखादा चांगला व्यवसाय करावा अशी इच्छा असते. अशा लोकांसाठी कडकनाथ उत्पनांचे चांगले साधन बनू शकतो. कडकनाथ ही कोंबड्यांची एक विशेष जात असून काळ्या रंगाचे मांस असणारी ही एकमेव जात आहे. या जातीच्या कोंबडीच्या एका अंड्याला ५० रूपयांपर्यंत किंमत मिळते तसेच चिकनला ब्रायलरच्या तुलनेत दुप्पट किंमत मिळते. या जातीच्या कोंबड्यांच्या मांसाला तसेच अंड्याना देशातून वाढती मागणी असल्याचेही आकडेवारी सांगते. तसेच अंडी ओनलाइनहि विकली जातात.
कडकनाथ ही काळ्या रंगाच्या कोंबड्यांची जात मुळची मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातली. असे सांगतात की या कोंबड्या त्यांची चव,स्वाद व आरोग्यपूर्ण मांस यासाठी प्रसिद्ध आहेत. पांढर्या चिकनच्या तुलनेत या कोंबड्यांच्या मासात कोलेस्टोरॉलचे प्रमाण कमी असते व अमिनो अॅसिड जास्त प्रमाणात असतात त्यामुळे ते आरोग्यासाठी अधिक हितकर ठरते. आजकाल या जातीच्या कोंबड्या देशभर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र, आंध्र, तमीळनाडू सारख्या अनेक राज्यात व्यावसायिक या कोंबडी पालनातून लक्षावधींची कमाई करत आहेत.
या कोंबड्यांचे मांस ६ महिन्याची कोंबडी असेल तर १५० ते २०० रूपये व १२ महिन्यांची असेल तर २५० ते ३०० रूपयांनी विकले जाते. देशी कोंबडीसाठी हाच दर ९० ते १५० रूपये आहे. या जातीच्या १०० कोंबड्या पाळण्यासाठी १५० चौरस फूट जागा लागते. पोल्ट्री मध्ये मोकळी हवा, पुरेसा सूर्यप्रकाश आवश्यक असतो तसेच पाण्यापासून उंच जागेवर पोल्टी असणे फायद्याचे ठरते. या कोंबड्यांना अंधारात अथवा रात्री खाणे देऊ नये तसेच एका पोल्ट्रीत एकाच ब्रीडची पिले ठेवावीत. पाण्याची भांडी दिवसातून दोन तीन वेळा साफ करावीत असा सल्ला दिला जातो. पोल्टी सुरू करताना बाहेरून पिले मागवूनही सुरू करता येते.
कडकनाथ ही कोंबड्याची एक प्रजाती आहे. या जातीचे स्थानिक नांव "कालामासी" असे आहे, ज्याचा अर्थ काळे मांस असलेली कोंबडी. संपूर्ण काळ्या रंगाच्या या कोंबडीचे रक्त आणि मांसही काळे असते.[१] मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्हे आणि राजस्थान तसेच गुजरातलगतचे जिल्हे मिळून अंदाजे ८०० चौरस मैलांचा प्रदेश या जातीचे मुळ उगमस्थान समजले जाते. आदिवासी, स्थानीय निवासी आणि ग्रामीण गरीब लोक बहुतांशी या जातीच्या कोंबड्या पाळतात. हा पक्षी पवित्र समजला जातो आणि दिवाळीनंतर देवीला त्याचा बळी चढवला जातो
फायदेशीर कडकनाथ पालन
कडकनाथ पक्षीकडकनाथ पक्षी त्याच्या स्थानिक वातावरण घेण्याची क्षमता , रोग प्रतिकार शक्ती , चवदार मांस, गुणवत्ता,औषधी मूल्य, पोत आणि चव यामुळे फार लोकप्रिय आहे असे मानले जाते .या जातीचे मांस काळे आहे.कडकनाथ कोंबड्यांतील औषधी गुणधर्मामुळे त्यांच्या अंडी व मांसाला चांगली मागणी व भाव आहे. कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता अतिशय चांगली असल्यामुळे या कोंबड्यांच्या खाद्यावर व व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास चांगला फायदा होऊ शकतो.
कोंबड्या उंच व काळ्या रंगाच्या असून, त्यांची कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता अतिशय चांगली आहे. या कोंबड्या मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्ह्यामध्ये अाढळतात. या कोंबडीचे मांस रंगाने काळे असून, चविष्ट व औषधी आहे. गावरान कोंबड्यासोबत कडकनाथ कोंबड्याचे संगोपन करता येते.

पौष्टीक मूल्य:
कडकनाथ मध्ये प्रथिने 18-20% आणि सामन्य प्रजाती मध्ये जास्त 25% आहे. संशोधनाप्रमाणे,कडकनाथ मध्ये पांढरा चिकन पेक्षा कमी कोलेस्ट्रॉल (0.73-1.05%) आहे असे दर्शविले आहे (13-25%) यामध्ये 18 अमीनो ऍसिडस् उच्च पातळी संप्रेरक आहेत त्यापैकी 8 अमीनो ऍसिडस् मानवी शरीरास आवश्यक आहेत. यामध्ये जीवनसत्त्वे बाईज 1, ब2,ब6, बी 12, सी आणि ई, नियासीन, प्रथिने, चरबी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, निकोचिनिक ऍसिडस्, इ

औषधी गुणधर्म:
कडकनाथ होमिओपॅथी आणि मानसिक विकारा साठी विशेष औषधी म्हणून वापरले जाते . तज्ञ असे म्हणतात की मेलानिन रंगद्रव्य जो कडकनाथ च्या रक्तात असतो तो माणसाच्या हृदय चा रक्त प्रवाह वाढवन्या साठी वापरले जाते कडकनाथ चिकन महिला वंध्यत्व, मेनोक्षेणईक (असामान्य पाळीच्या), नेहमीचा गर्भपात साठी एक चमत्कारिक औषधी आहे. - कडकनाथ कोंबडीच्या मांसामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असून, कोलेस्टेराॅलचे प्रमाण अतिशय कमी अाहे. त्यामुळे हृदय रोग असलेल्यांना कडकनाथ कोंबडीचे मांस उपयुक्त अाहे.- या पक्ष्यांची रोगप्रतिकारशक्ती अतिशय चांगली असून, कोंबडीचे मांस चविष्ट असते.- कडकनाथ पक्ष्यांची अंडी व मांस उच्च रक्तदाब, डोकेदुखी, दमा व मूत्रपिंडाची सूज, कॅन्सर, नपुंसकता इ. रोगावर गुणकारी अाहे.- मांस व अंड्यामध्ये आवश्यक अशा अमिनो आम्लाचे प्रमाण, संप्रेरके, जीवनसत्त्व ब१, ब२, ब६, ब१२ आणि ई, नायासिन, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह यांचे प्रमाण भरपूर असते.

अंडी:
कडकनाथ ची अंडी कमजोरी , दमा, मूत्रपिंडाची सूज आणि तीव्र डोकेदुखी वर उपचार करण्यासाठी प्रभावीपणे वापरले जाऊ शकते. कडकनाथ च्या अंडी मध्ये कोलेस्ट्रॉल मात्रा बाकी पक्षांपेक्ष्या कमी आहे म्हणून विशेषत: वयस्कर लोकांना आणि उच्च रक्तदाब बळीना हि अंडी खूप पौष्टीक आहेत . कडकनाथ मांस आणि अंडीप्रथिने आणि लोह( 25.47 % ) दोन्ही चा एक श्रीमंत स्रोत आहे.

व्यवस्थापन :-
अंडी उबवण केंद्रातून आणलेली पिले ४८ तासांच्या आत पिलांसाठी तयार केलेल्या उबवण गृहामध्ये (ब्रुडर हाउस) स्थानांतरित करावीत. पिले पारखून निरोगी असल्याची खात्री करून घ्यावी.- खाद्याची व पाण्याची भांडी स्वच्छ व निर्जंतुक करून घ्यावीत.- उबवण गृहामध्ये दोन इंच जाडीचा साळीचा थर गादीसारखा अंथरावा. त्यावर पाच-सहा थरांमध्ये जुनी वर्तमानपत्रे पसरावीत.- पिले उबवण गृहामध्ये आणण्याच्या २४ तास आधीच ब्रुडरच्या तापमानाची खात्री करून घ्यावी.- पिलांना उबेच्या स्रोताजवळ ठेवण्यासाठी व्होवर गार्ड किंवा टीनच्या गोलाकार पत्र्याचा उपयोग करावा.- पिलांना श्वसनाचे रोग, तसेच शरीरामध्ये पाण्याची कमतरता होऊ नये, त्याकरिता खोलीतील आर्द्रता ४० टक्क्यांच्या वर ठेवावी.- पिले उबवण गृहामध्ये एकाच ठिकाणी जमा होऊ नये, घराचे तापमान सगळीकडे सारखेच राहील यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.- पिलांना सुरवातीच्या १५ तासांपर्यंत आठ टक्के ग्लुकोजचे पाणी द्यावे.- पिलांना उबवण गृहामध्ये पाणी पाजूनच सोडावे. उबवण गृहामध्ये खेळती हवा असावी.- पिलांना शिफारशीप्रमाणे खाद्य द्यावे. त्यामध्ये काटेकोरपणा पाळावा.- खाद्याची व पाण्याची भांडी पिलाच्या संख्येनुसार योग्य प्रमाणात असावीत. साधारणतः १० पिलांसाठी एक पाण्याचे व एक खाद्याचे भांडे असावे.- मांसल, तसेच अंडी देणाऱ्या अशा दोन्ही पिलांना वेगवेगळा आहार द्यावा.- या पक्ष्यांना चिकमॅश, लेअरमॅश तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार द्यावे.

वैशिष्ट्ये :
१. पिलाचे वजन - २८-२३ ग्रॅम
२. आठ आठवड्यांनंतरचे वजनः- ०.८४१ किलो
३. १ किलो वजनासाठी लागणारा कालावधी - २० आठवडे
४. जगण्याची क्षमता - ९४ टक्के
५. पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन - २.२ - २.५ किलो
६. पूर्ण वाढ झालेल्या मादीचे वजन - १.५ - १.८८ किलो
७. चव - गावरान कोंबडीप्रमाणे
८. मांसाचे प्रमाण (त्वचेचे सोडून) - ६५ टक्के
९. प्रतिमहिना अंडी उत्पादन - ११- १३ नग
१०. वार्षिक अंडी उत्पादन - ६० ते ८० नग
११. अंड्याचे वजन - ३५ - ४० ग्रॅम

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...