वनौषधी:-
प्राचीन काळापासून औषधी वनस्पती त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे मानवाच्या वापरत आहेत. आयुर्वेदाने केलेल्या अभ्यासानुसार सुमारे २००० वनस्पतीमध्ये निरनिराळे आजार बरे करण्याची क्षमता असुन सुमारे १३०० वनस्पती त्यांच्या निरनिराळ्या सुगंध व स्वादासाठी प्रसिद्ध आहेत.
वनौषधी वनस्पतींची वैशिष्ट्ये
जागतिक पातळीवर वनौषधी वनस्पतींना फार महत्वाचे स्थान आहे.
वनस्पतीजन्य औषधांचा वापर मोठया प्रमाणावर वाढत असुन काही औषधी वनस्पतींची लागवड शास्त्रीयदृष्ट्या सुरु करण्यात आलेली आहे.
औषधी वनस्पतीची जागतिक व्यापाराची वार्षिक उलाढाल सुमारे ६० दशलक्ष डॉलरची आहे.
भारतातून सध्या सुमारे ४५० कोटी रुपयांची वनस्पतीजन्य औषधे विविध देशांमध्ये निर्यात केली जातात.
औषधी वनस्पतींपासून विविध औषधे व सौदर्य प्रसाधने बनविली जातात.
मानवी जीवनात औषधी वनस्पतींना अन्यन्यसाधारण महत्व असल्याने औषधी वनस्पतीखालील लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.
आपल्या देशातील तसेच महाराष्ट्र राज्यातील भौगोलिक परिस्थिती, जमीन व हवामान यामध्ये असलेली विविधता औषधी वनस्पतीचा लागवडीसाठी अतिशय अनुकूल आहे. वनस्पतीजन्य औषधांमुळे इतर अनिष्ट परिणाम होत नसल्याने त्याचबरोबर औषधी वनस्पतींमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठया प्रमाणात मदत होताना दिसते. आपल्या देशातून साधारणतः ४० औषधी वनस्पतीची लागवड विविध प्रदेशांमधून केली जाते. आज आपण पहिले तर असे दिसून येते जंगलातून सहजपणे ज्या वनौषधी उपलब्ध होत होत्या त्यांचेही प्रमाण कमी होत चाललेले दिसून येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वनौषधी प्रजातीची शेती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
औषधी वनस्पतींच्या क्षेत्रवाढीस भविष्यात चांगला वाव आहे. उत्पादक शेतकरी, खरेदीदार/ उद्दोजक, संशोधन संस्था, वनखाते व विस्तार यंत्रणामधील योग्य तो समन्वय साधून या क्षेत्राच्या सर्वांगीण विकास करणेकरिता महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे कार्यरत आहे.
औषधी वनस्पती – अर्जुन, बेल, अडुळसा
अर्जुन, बेल, अडुळसा या औषधी वनस्पती आपल्यासाठी खुपच महत्वाच्या आहेत. आयुर्वेदात या वनस्पतींना मानाचे स्थान दिले गेले आहे. भारतात या वनस्पती सर्वात अधिक प्रमाणात आढळतात. विविध मानवी विकारांवर गुणकारी असणाऱ्या या वनस्पती ग्रामीण भागात घराजवळ लावण्याची प्रथा आहे.
अर्जुन
अर्जुन ही सदाहरित वनस्पती भारतामध्ये सर्वत्र आढळते. प्रामुख्याने हा वृक्ष बिहार, हिमालय, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात आढळतो.
उपयोग:
सालीचे चूर्ण व दुध यांचा काढा हा पोटाला मुकामार बसला तर उपयोगी आहे.
सालीचा काढा दुधातून हृदयरोगावर अत्यंत उपयोगी असून त्याला हृदय टॉनिक म्हटले तरी वावगे होणार नाही.
हाड मोडले तर जोड सांधण्यासाठीही याचा उपयोग होतो.
यांच्या पानांचा ताजा रस कान दुखत असेल तर उपयोगी पडतो.
रक्तस्त्राव बंद होण्यासाठी अर्जुन सादडा पोटात देतात. याने रक्त शुद्धी चांगली होते.
मार, ठेच, वृणशोध, हात-पाय मोडणे, या गोष्टी बऱ्या करण्यासाठी अर्जुनासारखे मौल्यवान दुसरे औषध नाही.
बेल
बेल हा वृक्ष हिमालय, सह्याद्री, सातपुडा पर्वतांच्या दरम्यान सर्व ठिकाणी आढळतो.
उपयोग:
बेलाची मुळे, त्रिदोषामध्ये होणाऱ्या तापावर गुणकारी असून मुत्राविकार, पाठीच्या कण्यातील वेदना, दयाची धडपड इत्यादींवर गुणकारी आहे.
बेलाचे मूळ पाणी पाचक असून वात आणि कफ यांचा नाश करते तसेच नेत्र विकार, बधिरता आणि त्वचेला येणारी सूज यासाठी गुणकारी आहे.
बेलाची फुले तृष्णा, वामन आणि अतिसार इ. आजारात वापरतात.
मेंदू आणि हृदयाच्या स्वास्थासाठी फळातील गर अतिशय लाभदायी आहे.
अडुळसा
याची फुले पांढरी असतात व फुलांना देठ नसतो. फळे टोकाला लागतात.
सर्व प्रकारचा खोकला, घशाचे आजार, कफाचा विकार, दम या रोगांवर अडुळसा हे रामबाण औषध आहे.
अडुळसा हे संधिवात, गुडघेदुखी आदी दुखण्यांवरही उपायकारक आहे.
सध्याच्या प्रदूषणाच्या काळात घशाचे विकार खूप प्रमाणात होत आहेत. अशा वेळेस आपणांस आपले परसबागेत, गच्चीवर, कुंडीत, अडुळशाची रोपे लावणे नितांत गरजेचे आहे.
निलगिरीचे महत्व
निलगिरी बहुगुणी, बहुउपयोगी आणि जलद वाढणारे झाड आहे. एकात्मिक कृषी विकास कार्यक्रमात निलगिरीचा अंतर्भाव केला आहे. सर्व प्रकारच्या प्रदेशात हे झाड वाढत असल्याने सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेत निलगिरीला महत्त्वपूर्ण स्थान आहे.
• निलगिरीच्या विविध जाती :-
युकॅलिप्टस हेरे कर्टिस. – निलगिरी पर्वतावर आढळते.
युकॅलिप्टस गोल्बूलस.
युकॅलिप्टस ग्रँडीस.
युकॅलिप्टस कॅमलडुलेन्सिस. – निलगिरी पर्वतावर आढळते.
• हवामान :-
अत्यंत उष्ण, कमी पावसाच्या प्रदेशापासून ते शीत हवामान असलेल्या प्रदेशात निलगिरीची लागवड केली जाते.
निलगिरीचे झाड वाळले म्हणजे त्याच्या वजनात एक तृतीयांश घट येते व ते एक चांगले इंधन असून त्याचे कॅलरीफिक मूल्य ४७०० ते ४८०० कॅलरीज प्रती किलोग्रॅम आहे.
• जमीन :-
निलगिरीची वाढ जास्तीत जास्त प्रमाणात खडकाळ, परंतु सुपीक, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या आणि ओल साठवून ठेवणाऱ्या जमिनीत चांगली होते.
• लागवड :-
जून महिन्यात रोपांच्या लागवडीसाठी खड्डे करवेत. २२ मी. किंवा २३ मी. किंवा ३३ मी. अंतरावर ही लागवड करावी.निलगिरीच्या घनदाट लागवडीसाठी ०.६ × ०.६ मी. अंतरावर लागवड उपयुक्त ठरते.
• उत्पादन :-
निलगिरी लागवडीपासून हेक्टरी २० ते ३० हजार इतका फायदा होतो.
• उपयोग :-
पाने व कोवळ्या फांद्यांपासून निलगिरी तेल काढतात. त्याचा औषधी,औद्योगिक व सुगंधी तेल निर्मितीसाठी उपयोग होतो. तसेच निलगिरीचे लाकूड औद्योगिक उपयोगासाठी व ७० प्रकारच्या तेल औषधांसाठी वापरले जाते.
औषधी तेलात सिनीओल जास्त आहे. त्यापासून साबण, स्प्रे व औषधी गोळ्या तयार करतात.त्यांचा उपयोग सर्दीवर होतो. तसेच रोगप्रतिबंधक औषधी, तसेच वेदानांवरही वापर करतात. सिनीओल हे निलगिरी तेलातील महत्वाचे द्रव्य आहे.
निलगिरीच्या झाडांपासून कागद निर्मिती केली जाते. त्याचे वनसंशोधन केंद्र डेहराडून येथे आहे.
निलगिरीपासुन रेऑनचे धागे तयार करतात.
या झाड्याच्या सालीपासून वा बुंध्यातून पाझरणाऱ्या स्त्रावामुळे कातडी कमविण्यास लागणारे टेनिनसारखे द्रव्य मिळते. ते औषध व डिंक तयार करण्यासाठी वापरता
वनएरंड
वनएरंड बियांमध्ये सर्वाधिक ३५% ते ४०% अखाद्य तेलाचे प्रमाण असते.या वनस्पतीपासून बायोडिझेल या महत्वाच्या इंधनाची निर्मिती करता येणे शक्य असल्याने वनएरंडाची लागवड करणे काळाची गरज बनली आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी सर्वप्रथम या झाडाची लागवड राष्ट्रपती भवनात केली होती. शेतकऱ्यांत या वनस्पती बाबतची जागृती घडवून त्यांना वनएरंड लागवडीसाठी प्रोत्साहीत करायला हवे.
वनएरंडाची स्थानिक नावे पुढीलप्रमाणे –
रतनज्योत.
पारशी एरंड.
मोगली एरंड.
चंद्रज्योत.
जमल गोटा इंग्रजीत याला जट्रोफा म्हणतात.
हवामान – अवर्षणग्रस्त व बेताचा पाऊस पडणाऱ्या प्रदेशात वनएरंड चांगला येतो.
जमीन – लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येते. मध्यम जमीन अनुकूल असते.
लागवड – जुने ते जुलै महिन्यात करावी. लागवड बियांपासून करावी.
अंतर – बागायतात २ मी. × २ मी. अंतरावर करावी. जिरायातात १.७५ मी. × १.७५ मी. ओळीत अंतरावर करावी.
पाणीपुरवठा – नियमित व पुरेसा पाणीपुरवठा असल्यास उत्पादन चांगले मिळते.
उत्पादन – प्रत्येक फळात ३ ते ४ बिया असतात. १० वर्षानंतर प्रत्येक झाडास हेक्टरी १२०० ते १३०० किलो बिया निघतात.
Comments
Post a Comment