Skip to main content

#कार भाड्याने देऊन अब्जाधीश झालेला बिझनेसमन रमेश बाबू:..

कार भाड्याने देऊन अब्जाधीश झालेला बिझनेसमन रमेश बाबू:-

जर तुमच्याकडे सर्वोत्तम बिझनेस स्किल्स असतील तर ते तुम्हाला नक्कीच यश मिळवून देतील. याचा प्रत्यय कर्नाटक येथील बंगळुरूस्थित बिझनेसमन रमेश बाबू यांच्याकडे पाहून येतो. रमेश यांनी आपला वडिलोपार्जित केश कर्तनाचा व्यवसाय पुढे सुरू चालवण्यास सुरुवात केली. तो बिझनेस करीत त्यांनी आपली आवड जोपासली आणि पुढे त्याच छंदामुळे ते आज अब्जधीश झाले आहेत. पाहू यात त्यांचा यशाचा रोडमॅप...

रमेश बाबू काय करतात... दक्षिणात्य भारतातील साध्या कुटूंबातून आलेल्या रमेश यांच्या वडिलांचे केश कर्तनालय होते. काही वर्षानंतर त्यांचे देहावसान झाले. रमेश यांच्यासोबत आई आणि केश कर्तनालय, हे दोनचं सोबती होते. काही काळानंतर रमेश यांनी शिक्षण सोडले आणि आपला वडिलोपार्जित व्यवसायात मन वळवले. त्यांनी पारंपरिक केश कर्तनालयाच्या व्यवसायाला वेगळी कलाटणी दिली. त्यांच्याकडे हळूहळू भारतातील सुपरस्टार यायला सुरूवात झाली. बॉलीवूड स्टार सलमान खान, आमिर खान आणि ऐश्वर्या राय-बच्चन तसेच राजकीय नेते आणि मोठ-मोठे ऑफिसर रमेश बाबू यांच्याकडे केस कापण्यासाठी येतात.

परंतु छंद काही औरच... केश कर्तन तर रमेश बाबू यांनी आपला वडिलोपार्जित व्यवसाय म्हणून सुरू केला; परंतु त्यांचा छंद काहीच औरच होता. रमेश यांना महागड्या, लक्झरी गाड्या आणि बाईक्सचे प्रचंड वेड होते. त्या चालवणे, रिपेअर करणे त्यांना आवडत असे. अशातच त्यांनी मारुती ओमनी ही कार घेतली आणि भाड्याने द्यायला सुरुवात केली. आणि त्यांनी २००० साली रमेश टुर्स आणि ट्रॅव्हल्स हा गाड्या भाड्यानी देण्याचा बिझनेस सुरू केला. अल्पावधीत या व्यवसाय सर्वांना आवडला २००४ साली त्यांनी लक्झरी गाड्या भाड्याने देण्यास सुरुवात केली.

शेकडो कारचा मालक... रमेश बाबू यांच्याकडे सध्या दोनशेहून अधिक गाड्या आहेत. रमेश यांच्याकडे मर्सिडीझ इ-क्लास लक्झरी सेडान, बीएमडबल्यूच्या अनेक सिरीजच्या गाड्या आहेत. ते सकाळी त्यांच्या रोल्स रॉयस घोस्ट या कारमधून सलॉनमध्ये येतात आणि आपले रोजचे काम करतात. रमेश अब्जाधीश झाले असले तरी त्यांनी आपले मुख्य काम म्हणजे केस कापण्याचे काम केले सोडले नाही. म्हणूनच त्यांना 'भारताचे श्रीमंत हेअरस्टायलिस्ट' असे म्हणतात.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...