Skip to main content

#केवळ 59 मिनिटांत व्यावसायिकांना मिळणार 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज..

*केवळ 59 मिनिटांत व्यावसायिकांना मिळणार 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज*
----------------------------------
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) मोठी घोषणा केली आहे. तसेच व्याजावरच्या अनुदानासहीत इतर मोठ्या घोषणाही मोदींनी केल्या आहेत. त्यामध्ये केवळ 59 मिनिटांत व्यापाऱ्यांना 1 कोटी रुपयांचे कर्ज मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. एमएसएमई क्षेत्राला गती देण्यासाठी आणि रोजगारसाठीही या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना ही नव्या कर्ज योजनेची घोषणा केली. सध्या केंद्रीय अर्थ मंत्रालय या प्रस्तावावर काम करत आहे. एमएसएमई सेक्टरमध्ये 6.3 कोटींहून अधिक युनिट्स आहेत आणि 11.1 कोटी लोकांना या युनिट्समधून रोजगार मिळतो. जीडीपीतही या क्षेत्राचं 30 टक्के योगदान आहे.

उत्पादनातही या क्षेत्राची 45 टक्के भागीदारी आहे. देशातील एकूण निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये या क्षेत्राचं 40 टक्के योगदान आहे. एमएसएमई युनिट्स समोर कर्जाची सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे उद्योगाला उपयुक्त कर्ज अनुदानाच्या माध्यमातून मिळाल्यास या क्षेत्राला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. दरम्यान, जास्त व्याजावर अनुदान दिल्यास कर्जे स्वस्त होतील आणि एमएसएमई क्षेत्रात कर्ज घेण्याचं प्रमाण वाढीस लागणार आहे. 

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लिंक - https://www.psbloansin59minutes.com/home

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...