Skip to main content

#पपई..

कमी खर्चात कमी कालावधीत नफा मिळवून देणारी पपई    
     
      कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांच्या यादीत पपई या पिकाची गणना होते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.  पपईच्या फळापासून टूटी फ्रुटी, पपई प्युरी, पपई पावडर, बेबी फूड्स ई प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात.

अनुकूल हवामान -
उष्ण कटीबंधात हे पिक जोमाने वाढते तथापि समशीतोष्ण हवामानातही उत्पादन चांगले होते
पपई पिकास सरासरी तापमान २५ ते ३८ अंश से आणि वार्षिक पर्जन्यमान १५०० मि. मी . मानवते पपईची झाडे जास्तीत जास्त ४४ अंश से तर कमीत कमी १० अंश से तापमान सहन करू शकतात.

जमीन
उत्तम निचऱ्याची मध्यम काळी किवा तांबडी व हवा  राहणारी जमीन योग्य ठरते. जांभ्या खडकात पपईची झाडे उत्तम वाढतात.खडकाळ जमिनीत हे झाड चांगले वाढत नाही.जमिनीचा सामू ६.५ ते ८.० योग्य असतो.

रोपे तयार करणे
एक हेक्टर लागवडीसाठी २५० ते ३०० गरम बियाणे पुरेसे आहे
रोपे तयार करण्याच्या आधी २ ते ३ ग्रॅम कार्बेन्डझिम प्रती किलो बियाण्यास लावावे.हि रोपे साधारण ६ते ७ आठवडे झाल्यानंतर आणि उंची १५ ते २२ से. मी . झाल्यानंतर करावी.

पूर्वमशागत व लागवड
लागवडीपूर्वी जमिनीची आडवी, उभी नांगरणी करावी
शेणखत हेक्टरी २० ते २५ टन (४० ते ५० बैलगाड्या) पसरवून मातीत मिसळून घ्यावे व जमीन सपाट करावी
लागवडीतील अंतर २.२५ मी X १.५ मी. लागवड करण्याने २००० झाडे बसतात. १.५ बाय १.५ मी या पद्धतीत ४४४४ झाडे लावली जातात
यासाठी पुसा नन्हा या बुटक्या जातीची निवड करावी
शेताची आखणी केल्यानंतर ४५X ४५X ४५ से. मि. आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत.

मल्चिंग
बाग तणविरहित ठेवण्यासाठी मल्चिंग फायद्याचे ठरते त्यामुळे पाण्याचीही बचत होते.  पॉलिथीनचा काळ्या रंगाचा मल्चींग पेपर (४० ते ५० मायक्रोन जाडीचा ) पपईच्या दोन झाडाच्या ओळीमध्ये अथरून त्याच्या कडा मातीत बुजून टाकव्यात.

लागवड
जून- जुलै, सप्टेबर- ऑक्टोबर आणि जाने -फेब्रु या महिन्यात करतात
पपईची रोपे लागवडीसाठी ५० ते ६० दिवसात तयार होतात
लागवडीनंतर फळे ११ ते १२ महिन्यात काढणीस तयार होतात

खत व व्यवस्थापन
खत प्रत्येकवेळी हप्त्यात  (ग्राम प्रतिझाड)
अमोनियम सल्फेट किवा युरिया २५० किवा १००
सिंगल सुपर फॉस्फेट ३००
सल्फेट ऑफ पोटाश ८२

पाणी व्यवस्थापन
पपईत ठिबक सिंचनाची सोय सुरुवातीपासून करणे आवश्यक आहे ठिबक असल्यास उत्पादनात वाढ होते.

आंतरपिके
पपईच्या बागेत मुग, उडीद , चवली , वाटाणा, श्रावण घेवडा , सोयाबीन, भुईमुग अशी पिके घ्यावीत.

काढणी व उत्पादन
पपईच्या प्रतीझाडापासून ४० ते ८० फळे मिळतात. उत्पादन  हेक्टरी ५० ते ८० मे. टनापर्यंत मिळते

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...