महाबँकेतर्फे महीलांसाठी "ब्युटी पार्लर मॅनेजमेन्टं" कोर्सचे मोफत प्रशिक्षण.
महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान, नागपूर यांच्या तर्फे महीलांसाठी ”ब्युटी पार्लर मॅनेजमेेंन्ट“ कोर्सचे मोफत प्रशिक्षण वर्ग दि. 01 डिसेंबर 2018 ते दि. 31 डिसेंबर 2018 या कालावधीत घेण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण 30 दिवसाचे असुन प्रशिक्षणार्थींसाठी निवास व भोजन व्यवस्था मोफत केली आहे. सदर प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहे. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थींना तांत्रिक विषयांसोबतच उद्योजकीय कौशल्य तसेच व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल, व्यवसायाच्या संधी, बाजार सर्वेक्षण, बँकेच्या योजना जसे कि मुद्रा,पिएमईजीपी, स्टॅन्ड अप इंडीया व कमजोर वर्ग वित्तीय महामंडळाच्या योजनांची सुध्दा माहिती दिली जाईल.
मुलाखतीसाठी येतांना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, मार्कलिस्ट, रेशन कार्ड, आधारकार्ड, व 4 फोटो सोबत आणावे.
स्वयंरोजगाराची आवड, व्यवसाय करण्याची तयारी, वय 18 ते 35, शिक्षण 10 वी पास/नापास अशा बेरोजगार युवतींनी इंटरव्युह साठी दि. 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत सकाळी 11.00 वाजता महाबँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान, शासकीय आय.टी.आय.,मुलांचे वसतीगृह, दुसरा मजला, रहाटे काॅलनी ते दिक्षा भूमी रोड, नागपूर येथे मुलाखती साठी हजर राहावे. असे आवाहन संस्थेचे संचालक, श्री. निलेश सी. भवाने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी फोन नं.0712-2443482 वर संपर्क साधावा. हे प्रशिक्षण नागपूर जिल्हयातील ग्रामीण भागातील बेरोजगार युवतींसाठी आयोजीत केलेले आहे. दारिद्रय रेषेखालील व कुटंूबातील प्रशिक्षणार्थींना प्राधान्य देण्यात येईल. दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थींनी येतांना सोबत दारिद्रय रेषेचा दाखला (ग्रामपंचायतचा) आणावा.
संचालक,
महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था,
नागपूर.
कृपया हा मेसेज जास्तीत जास्त शेअर जरा व आपल्या मित्र आणि नातेवाईक ज्यांना प्रशिक्षणाची गरज आहे त्याच्या पर्यंत पोहोचवा.
Comments
Post a Comment