Skip to main content

#सोयापासून बनवता येणारे पौष्टिक दूध..

सोयापासून बनवता येणारे पौष्टिक दूध

   शेती सोबतच शेती पूरक व्यवसाय करण्याची काळाची  गरज आहे.  शेती पूरक व्यवसायासाठी अनेक पर्याय असून आपल्या बजेट नुसार आपण व्यवसाय निवडू शकतो. मागच्या काही लेखांमध्ये इंडिअन रूट्झ ऍग्रोने सोया वर प्रक्रिया करून पदार्थ बनवणाऱ्या लातूर येथील साधना देशमुख यांची यशोगाथा सांगितली होती. साधना देशमुख यांची यशोगाथा वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा - https://www.facebook.com/IndianRootzAgrow/photos/a.1229346957106605/2232430000131624/?type=3&theater

इंडिअन रूट्झ ऍग्रोच्या या दिवाळी विशेष लेखातून सोयाबीनचे महत्त्व , त्यात असणारे प्रथिने व प्रक्रिया करून सोया दूध कसे बनवता येते याची थोडक्यात माहिती जाणून  घेऊयात.        

   सोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व अन्य जीवनसत्त्वे व खनिज असतात. सोयाबीनवर योग्य प्रकारे प्रक्रिया करून सोयाबीनचे पौष्टिक दूध तयार करता येते.

   एक किलोग्रॅम सोयाबीनपासून ७-८ लिटर सोया दूध तयार होते. सोयाबीनचे दूध तयार करण्यासाठी फक्त दहा रुपये प्रति लिटर इतका खर्च येतो व ते २० रुपये प्रति लिटर विकले तरी गायी म्हशीच्या दुधाच्या (४० रु. लिटर) तुलनेत फक्त अर्ध्या दरात उपलब्ध होऊ शकते. सोया दूध गाईच्या दुधाच्या समकक्ष पौष्टिक असूनही स्वस्त दरात मिळू शकते. सोया दुधापासून दही, ताक, लस्सी, श्रीखंड, पनीर, आइस्क्रीम, आम्रखंड इ. पदार्थ तयार करता येतात. सोयाबीनपासून दूध तयार करण्याच्या पद्धतीमध्ये जे उपपदार्थ मिळतात त्याचाही उपयोग चांगल्या गुणवत्तेचे खाद्यपदार्थ, उदा. गुलाबजामून, शिरा, भजी, केक इ. तयार करण्यासाठी होतो. सोयाबीनपासून दूध व अन्य पदार्थ बनवून चांगला फायदा मिळवता येतो.

सोया दूध तयार करण्याची पद्धत
चांगल्या गुणवत्तेचे सोया दूध तयार करण्यासाठी काळजीपूर्वक सर्व प्रक्रिया पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असते. 
सोयाबीनचे टरफल काढून डाळ तयार करावी. सोयाडाळ ६ ते ८ तास पाण्यामध्ये भिजवावी.
भिजलेली डाळ गरम पाण्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी.
तयार झालेले बारीक मिश्रण १५ ते २० मिनिटांपर्यंत उकळून कपड्यातून गाळून घ्यावे.
गाळल्यानंतर सोया दूध मिळते व कपड्यामध्ये जो चोथा राहातो तो ओकारा असतो.
सोया दुधापासून साेया पनीरही बनविता येते.  

सोया दुधाचे फायदे -
हाडांना मजबूत बनविण्यासाठी हे दूध फार उपयुक्त आहे.
एक ग्लास सोया दुधात ३३० मिली ग्राम कॅल्शियम असतं आणि ९५ कॅलरी असते.
त्याचसोबत यामध्ये असणारे काही घटक  कर्करोगाचे प्रमाण कमी करतात.
हे दूध पौष्टिक असल्यामुळे गरोदर महिलांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. डॉक्टरांच्या सल्ल्याने दूध सेवन करावे.
रक्त दाब संतुलित राखण्यासाठी हे दूध उपयोगी ठरते.
शरीरातील चरबीचे (कोलेस्ट्रॉल) प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी उपयोगी ठरते.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...