Skip to main content

#जावा कंपनीचा इतिहास...

तर आज दिनांक १५.११.२०१८ रोजी ठिक सकाळी ११ वाजून ३० मिनटांनी जावा कंपनीचा इतिहास जन्मला आलाय.
एझडी जावा कंपनीचे होते

१९६० साली कर्नाटकमधील मैसूर येथून या कंपनीची सुरुवात झाली होती आणि १९६८ सालापासून कंपनीने आपल्या मोटोरसायकलची विक्री सुरू केली होती. मैसूरचे गव्हर्नर जयचमराजा वडियार यांनी कंपनी सुरू करण्यासाठी रुस्तुम आणि फारूक या इराणी बंधूंना प्रोत्साहित केलं होतं.  त्यातूनच मैसूरमधील यादवगिरी औद्योगिक क्षेत्रातील २५ एकर जमिनीत इराणी बंधूंनी ‘आयडियल जावा इंडिया लिमिटेडची’ सुरुवात केली होती. मैसूरच्या महाराजांनी स्वतः या प्लॅन्टचं उद्घाटन केलं होतं. कंपनीत महाराजांनी एकट्याने जवळपास ५१ लाख रुपये गुंतवले होते.

जवळपास २२०० पगारी कर्मचाऱ्यांसह सुरू झालेल्या या कंपनीला वर्षाकाठी ४२००० मोटोसायकलच्या उत्पादनाचा परवाना मिळाला होता. दिवसाला साधारणतः १३० नवीन बाईकच्या उत्पादनाची कंपनीची क्षमता होती.

‘फॉरेव्हर बाईक, फॉरेव्हर व्हॅल्यू’

या टॅगलाईनखाली बाजारात आलेल्या या बाईकने आपली टॅगलाईन शब्दशः जपली होती. ७०, ८० आणि ९० च्या दशकात भारतातील बाईकर्समध्ये जिकडे तिकडे फक्त येझदीचाच बोलबाला होता. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटाच्या माध्यमातून ही बाईक मोठ्या पडद्यावर देखील पोहोचली होती.

त्यानंतरच्या काळात मात्र भारत सरकारने सुझुकी, होंडा, यामाहा आणि कावासकी यांसारख्या जपानी कंपन्यांना भारतात मोटोरसायकल निर्मितीचे कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली. सहाजिकच बाजारात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली. जापनीज कंपन्यांनी आपल्या बाईकमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वेगवेगळे प्रयोग केले आणि बाजारात आपले पाय पसरवायला सुरुवात केली. याचा परिणाम एझडीच्या व्यवसायावर झाला आणि ८० चं दशक संपता-संपता येझदीची लोकप्रियता देखील कमी व्हायला लागली आणि शेवटी  १९९६ साली कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जावा १९९६ सालीच बंद झाली !!!

नविन गाड्या कशा असणार.
JAWA – जुनाच कलर जुनीच स्टाईल. 1.64 लाख. 300 CC.
JAWA 42 – १.५५ लाख. ऑन रोड. लूक मॉडर्न. 300 CC.
JAWA Perak –  टिपीकल बॉबर स्टाईल हि गाडी पुढच्या महिन्यादोन महिन्यात रस्त्यावर येणार आहे.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...