*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
_४२. दहावी नापास व दहा लाख नफा_
--------------------------------
संजय एक अवलिया व अट्टल व्यावसायिक भेटला. दहावी नापास झाल्यावर संजय एका रेडिमेड कपड्याच्या दुकानात कामाला लागला. तेथे थोडा थोडा व्यवसाय शिकून त्याने स्वतःचे दुकान टाकले. आज तो एकूण पाच व्यवसाय करतो.
१) रेडिमेड कापडाचे दुकान - रोज ५ ते ७ हजाराची विक्री, दीड हजार नफा.
२) ५ एकर शेती - वार्षिक ३ ते ४ लाख नफा.
३) स्कॉर्पिओ व ट्रॅक्टर भाड्याने देणे - वार्षिक १ ते २ लाख नफा.
४) लायसेन्स सावकारी व्यवसाय – १५ लाखाचे खेळत भांडवल, महिना ३५ ते ४० हजार नफा.
५) शेळी पालन - ४० शेळ्यांचा फार्म आहे, वार्षिक दोन ते अडीच लाख नफा.
६) दुग्ध व्यवसाय (पाच म्हशी) - महिना १० ते १२ हजार नफा (शेणखत वेगळे)
१२ ते १५ वर्षापूर्वी तालुक्याच्या ठिकाणी संजयने दहावी नापास झाल्यावर १ हजार रुपये महिना पगारावर रेडिमेड कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम सुरू केले. पुढे धंदा शिकला व स्वतःचे दुकान टाकले, परत घरची शेती बागायत केली. असे करत करत मेहनतीने एक एक व्यवसाय वाढवत गेला. तो व त्याची पत्नी व्यवसाय व शेती सांभाळतात. त्याच्याबरोबरचे दहावी पास झालेले मित्र इंजिनियर झाले, पालकांचे ८-१० लाख रुपये खर्च झाले आणि अजूनही ते नोकरीच शोधतायत. त्यामुळे पैशाला पैसा लावा, पैसा कमवत रहा, पैसा पैशाला खेचतो.
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते
Comments
Post a Comment