अ फ ला तू न !!
~~~~~~~~~
माझे जे मित्र व्यवसायिक आहेत आणि ज्यांचा GST नंबर आहे , त्यांनी जरूर ह्याचा लाभ घ्यावा. ★★★★★
~~~~~~~~~~~~~~~~~
मित्रांनो ,
आज मी तुमच्याशी अगदी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे.
विषय आहे MSME च्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी ह्यांनी, आज म्हणजेच 2 नोव्हेंबर 2018 ला केलेल्या घोषणा आणि भाषणाचा.
विषय जर रुक्ष वाटेल, पण तो मी जास्तीतजास्त सोपा करून सांगतो .
तर जाणून घेऊ या ,
एक/एक गोष्टी
MSMEम्हणजे काय ?
~~~~~~~~~~~
MSME म्हणजे
मायक्रो,स्मॉल,मिडीयम एंटरप्राइजेस,म्हणजेचं
मराठीत,अतिसूक्ष्म ,लघु आणि मध्यम उद्योग .
तर आज ह्या MSME च्या
उद्योजकांचा नवी दिल्लीत विज्ञानभवनमध्ये , मोदींजींच्या
सोबत एक कार्यक्रम झाला .
ह्या कार्यक्रमाध्ये मोदींजींनी 12 ठळक घोषणा केल्या ,
आता घोषणा म्हटल्या की आपल्याला नुसते पॅकेजचे आकडे किंवा
एखादं /दोन नियम शिथिल केल्यासारखं वाटतं , पण ,
इथे तसं नाहीये ,
आणि
आता , इथेचं खरं मोदींजींमधला व्यापारी / दूरदर्शी नेता/(राजकारणच्या पलीकडचा)
आपल्याला जाणवतो.
ह्या कार्यक्रमात सलग 1 तास मोदीजी ,
ह्या उद्यमीं सोबत , त्यांच्या कळणाऱ्या
भाषेत कुठेही न बघता , अस्सखलितपणे बोलत होते.
एखाद्या क्षेत्रात काही वर्षे काम केल्यावर ज्या गोष्टी समजतात ,
त्या गोष्टींवर ,
एक राजकारणी नेता सलग 1 तास खणखणीतपणे बोलून त्या क्षेत्रातल्या येणाऱ्या अडीअडचणी सरकारी नियम बदलून , सगळं काही ऑन लाईन करून ,
उद्यमींचा किंमती वेळ वाचवतोय ,
हे बघणं आणि ऐकणं खरोखरचं अपूर्व आणि अभिमानास्पद वाटलं.
तर ,
आता जाणून घेऊया
काय आहेत ह्या घोषणा,
1)
ज्या उद्योजकांची वार्षिक उलाढाल 20 लाख रुपये ते 5 करोड रुपये आहे ,त्यांना बँकेकडून बऱ्याच वेळा लोन घ्यावं लागतं आणि ज्यामध्ये त्यांचा खूप किंमती वेळ आणि पैसा जातो.
तर अश्या उद्यमींसाठी की, ज्यांनी GST/इन्कम टॅक्स पोर्टल वर रिटर्नस् फाईल केलेली आहेत ,त्यांना आता ,
रुपये 1करोड पर्यंतचे लोन फक्त 59 मिनिटांमध्ये मंजूर होणार आहे .
तुम्हाला आता हे वाचून आश्चर्य वाटेल की 1 करोड पर्यंतचे लोन फक्त 59 मिनिटांत कसे मंजूर होणार , आणि कसं शक्य होईल हे ?
ऑफिसमधून निघून घरी जायला सुद्धा
ह्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. तर , तुमची शंका बरोबर आहे ,
पण ही गोष्ट कशी करणार आहेत ते? सांगतो तुम्हाला ,
GST पोर्टलवर तुम्ही रिटर्न्स फाईल करता , इन्कम टॅक्स रिटर्न्स तुम्ही भरता , तर ह्याच दोन गोष्टींचा आणि तुमच्या बँक स्टेटमेंट मधील कॅश फ्लोचा उपयोग करून ,
सरकार (बॅंक्स) तुम्हाला ,एक करोडपर्यंतचं कर्ज फक्त 59 मिनिटांत मंजूर करेल आणि ज्याचा रियल टाईम डेटा सरकारकडे जातं असेल.
केवढी प्रचंड मोठी गोष्ट आहे ही की वेळेचा कुठलाही अपव्यय न होता ,
खेटे न मारता ,ऑनलाइन आणि ते ही प्रमाणित वेळेतचं तुम्हाला एवढे मोठे लोन मंजूर होणार आहे.
2)
लोन मिळेल हो ,पण व्याजाचं काय ?
आता असा हा दुसरा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल , बरोबर ना ?
तर,
ह्यामध्येही सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. हे एक करोड पर्यंतचं लोन तुम्हाला नेहमीपेक्षा 2 % इतके कमी दराने मिळणार आहे.
विचार करा 1 कोटीच्या लोनचे 2% इतकी रक्कम आता वाचणार आहे.
तसेच ,
जे उद्यमी त्यांचा माल एक्सपोर्ट करतात , त्यांना आता प्री एक्स्पोर्ट आणि पोस्ट एक्स्पोर्ट ह्या कालावधी मध्ये मिळणारा 3%इंटरेस्ट रिबेट आता 5%इतका मिळेल.
आता जाणून घेऊ या काही इतर महत्वाच्या घोषणा
3)
आता ह्यापुढे , ज्यांची कोणाचीही उलाढाल 500 कोटी रुपयांच्या वर आहे , त्यांना आता स्वतःला आणि ते जे काही मटेरियल ह्या MSME क्षेत्राकडून घेत असतील अश्या सर्व संस्थाना,
Trade Receivables e-Discounting System म्हणजेच(TReDS). ह्या सिस्टीम खाली येणं गरजेचं असेल.
ह्याचा मोठा फायदा MSME च्या उद्यमींना मिळेल .
तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे हे लक्षात येईल.
समजा तुम्ही एका मोठ्या कंपनीला 25 लाख रुपयांचा माल पुरवला आहे , त्या मोठ्या कंपनीला रुपये 25 लाख इतकी रक्कम किरकोळ असू शकेल पण छोट्या उद्यमीं ला ही रक्कम समजा 3 महिने मिळाली नाही तर ? तर त्याची कॅश सायकल आडेल आणि त्याच्या व्यवसायात पुढच्या ऑर्डर पुर्ततेत अडचण येईल , त्यावेळी त्या उद्यमीला ही
Trade Receivables e-Discounting System (TReDS) ही सिस्टीम उपयोगी येईल.
म्हणजेच त्या उद्यमिनी , ऑर्डर पुरवल्याची कन्फर्म पावती किंवा सर्टिफिकेट ,
बँकेला ऑन line अपलोड केले तर ,बँक त्या उद्यमीला तेवढा कॅश पुरवठा करेल ,जेणे करून, त्या उद्यमीची कॅश सायकल अडणार नाही.
4) आजपर्यंत ज्यांची 500 कोटींची उलाढाल होती अश्यांना 20%इतका माल ,कंपल्सरी ह्या MSME सेक्टर कडून घ्यायला लागत असे , त्याची मर्यादा वाढवून आता मोदी सरकारने 25% इतकी केली आहे ,आणि त्यातही ,
5)
त्यापैकी 3% इतका माल स्त्री उद्यमी असलेल्यांन कडूनचं घेणं गरजेचं आहे.
6)
ह्यापुढे श्रम मंत्रालयाच्या 8 आणि 10 युनियन रेग्यूलेशन अंतर्गत येणाऱ्या गोष्टी वर्ष्यातून 2दा फाईल करावयाच्या ऐवजी फक्त एकदाच फाईल करायला लागतील.
7)
ह्या पुढे कुठलाही इन्स्पेक्टर , कॉम्प्युटराईज्ड रँडम अलोटमेंट नुसारचं तुमच्या फॅक्टरीत येईल,★★★★★
म्हणजेच आता तो त्याच्या मर्जीने आणि सोई ने तुमच्या फॅक्टरीत येऊ शकणार नाही ,
आणि त्या संबंधित इन्स्पेक्टरला ,त्याचा अहवाल फक्त 48 तासात पोर्टलवर अपलोड करायला लागेल.
कुठल्याही आस्थापनेला इतके दिवस वॉटर आणि एअर पोल्युशन संदर्भात असे 2 वेगळे कंसेंट द्यावयास लागत होते , ही गोष्ट आता एकत्रित करून ह्यापुढे कुठलाही एक कंसेंट पुरेसा ठरणार आहे.
9)
ह्यापुढे MSME सेक्टरमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कामगारांना जनधन योजना अकाऊंट खाली आणून त्यांना प्रॉव्हिडंट फंड आणि इन्शुरन्सचं लाभार्थी बनवून त्यांची काळजी घेतली गेलेली आहे.
खरं म्हणजे ही एक मोठी आणि सदोदित चालू असणारी प्रक्रिया आहे , पण पंतप्रधान मोदीजी स्वतः पहिले 100 दिवस ह्या सगळ्या गोष्टी मॉनिटर करणार आहेत.
तसेच नुकताच भारत देश मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे EODBच्या लिस्ट मध्ये ( ईज ऑफ डुइंग बिझनेस ) 142 व्या स्थानावरून 77 व्या स्थानावर पोहचला आहे ,म्हणजेच तब्बल 65 अंकांची भरारी घेतली आहे.
हया लेखाच्या सोबत शेवटी मी तुमच्यासाठी मोदींजींच्या भाषणाची लिंक★ देत आहे , ज्यांना शक्य आहे ,त्यांनी जरूर पहा ★, ह्या मुद्द्यां बरोबरचं , इतर अनेक मुद्दे आणि बारकावे , तुम्हाला त्यांच्या कडून ऐकायला नक्कीच आवडतील.★★
आजच्या घडीला वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान असलेला , किंवा ते नसल्यास घेऊ इच्छिणारा आणि ह्या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजीशी जोडणारा असा नेता विरळाच . ★★★★★
मला वाटतं सरकारने फार मोठा विश्वास आपल्या उद्यमीं वर दाखवून ,खरोखरचं लेस गव्हर्नमेंट आणि मोर गव्हर्नन्सचा परीचय दिला आहे ,आणि मला खात्री आहे की आपल्या देशातील उद्यमी नक्कीच सरकारच्या ह्या विश्वासाला तडा न जाऊन देता ,नवीन भारताच्या उभारणीत खांद्याला खांदा लावून देशाला साथ देतील.
PM launches historic Support and Outreach Initiative for MSME sector
http://nm-4.com/pc26
via NaMo App
©राजेश लिमये .
Comments
Post a Comment