Skip to main content

#पालवीकॅफे,,,,

सिप्ला मधील चांगली नोकरी सोडून स्वप्नांना साकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सौ.दीपाली शंकर कदम ह्यांचे कौतुक करू ते कमीच ..
#एकसुंदरभेट ह्या माझ्या सदरातून आज सौ.दीपाली ताई ह्यांची आपल्याला एक लहानशी ओळख ..आजवर स्वतःचे वेगळे काही तरी सुरू करायचे ह्याची मनात कायम धडपड त्यासाठी कधीतरी पाऊल उचलायला हवे होते म्हणून सिप्ला सारख्या कंपनीतून पहिला रामराम करीत त्यांनी बदलापूर येथे जनरल स्टोर्स सुरू केले ..घरातील सर्व कुटुंबांची त्यांना लाभलेली साथ ,त्याच बरोबर त्यांच्या प्रत्येक निर्णयाला कायम मिळणार पाठिंबा ह्याच जोरावर हक्काचा पक्का पगार सोडून व्यवसायाकडे पाऊलं उचलले ..पाऊलं तर उचलले पण स्वप्न अजून दूर होती ..त्या स्वप्नाच्या दिशेने जाण्यासाठी योजना ,जिद्द ह्याचा जोरावर आज सर्व नाही पण काही अंशी स्वप्न साकारायला सुरवात झाली स्वतःचा कॅफे बदलापूर स्टेशन जवळ सुरू करून ..#पालवीकॅफे ह्या नावाने आज त्यांनी स्वतःच कॅफे सुरू केला आहे ..घरातील सर्वांचे सांभाळून त्यात जनरल स्टोर्स आहे तसेच ठेऊन एक अजून स्वप्नाची जबाबदारी.. कॅफे सुरू करायचे जेव्हा ठरवले त्यासाठी त्यांनी अनेक नामवंत कॅफे संस्थेशी संपर्क केला ,त्यांच्याशी संवाद केला ..पण आपण कशाला सुरू करताय ..पाहिजे तसा फायदा नाही त्यात आपल्याला काय माहीत असे अनेक मोतीवेशन न करता नाकरात्मक अनेक गप्पा समोर येत होत्या ..त्याच वेळी त्यांनी मनाशी ठाम केले आता तर नक्कीच उभारायचे त्यासाठी कोणी फेमस ब्रँड नको ..आपणच आपली ओळख नव्याने सुरू करू ..पुढे पाहू काय ते ..आज तेच पुढे काय आहे त्याचे मी माझ्या डोळ्याने पाहिले त्याचे विचार ऐकले ..त्यांच्यातील ठाम पणा जाणवला म्हणूनच #एकसुंदरभेट ह्या सदरातून लिहायची इच्छा झाली ..खरच कोणाची succes कथा ऐकण्यापेक्षा त्यांची स्वप्न साकारण्यासाठी केली धडपड ऐकायला खूप मनाने बरे वाटते ..खरच आपण अजून काहीच नाही ह्याची समोर ह्याची जाणीव होते ..आज एक महिला त्यात त्या बदलापूर सारख्या ठिकाणी त्यात कॅफे म्हणजे किती किती विविध प्रश्नांवर त्यांनी मात करून स्वतःचे मत साकार केले ..अश्याच नव्याने धडाडीने उभारणाऱ्या विविध व्यवसायिकांचे लिखाण मी आता माझ्या #एकसुंदरभेट ह्या सदरातून आपल्या समोर आणणार आहे .त्यासाठीच #उद्योगसंस्कार हे फेसबुक पेजपण बनवले आहे त्यावर नक्कीच भेट देत जा ..माझ्या सुंदर भेटीचे लिखाण आपण वाचत जा .मॅडम शी भेट घडवून देण्याचे श्रेय श्री.संदेश फलके  ह्याच्या मुळे होऊ शकली .
©आशिष फाटक (उद्योग संस्कार )
https://www.facebook.com/udyogsaskar/

#उद्योगसंस्कार #एकसुंदरभेट #एकव्यवसायिकधडपड

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...