कालच्या इंडिअनरूट्झ ऍग्रोने प्रसारित केलेल्या कालच्या लेखात आपण जाणून घेतले कि कलिंगडाचे पीक घेऊन कशाप्रकारे एका शेतकऱ्याने यशस्वीपणे २०० क्विंटल उत्पादन घेतले. आजच्या लेखातून जाणून घेऊयात कलिंगड पिकाची सखोल माहिती -
कलिंगड हे असे पीक आहे ज्याची मागणी वर्षभर सुरु असते. परंतु उन्हाळ्यात कलिंगडाची सर्वात जास्त मागणी असते. कलिंगड हे पीक कमी वेळात कमी पाण्यात व कमी खर्चात येणारे पीक आहे. त्यामुळे या पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वाढ होत आहे.
जमीन : हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. बारामती, फलटण भागातून येणार्या कलिंगडावरती अशा प्रकारचे डाग नेहमी मोठ्या प्रमाणात दिसतात. लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, मध्यम - काळ्या ते करड्या 'रंगाची ('डी ' किंवा 'जी' साईल असलेली) पाण्याचा निचरा असणारी जमीन लागवडीस योग्य आहे.
हवामान : उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. अलीकडे कडक उन्हाळ्याचा आणि भर पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगडाची लागवड केली जाते. वाढीच्या कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होते नाही. पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते.
कलिंगडाच्या जाती :
१. शुगरबेबी : फळांची साल गर्द हिरव्या रंगाची, कमी जाडीची असून हिरवट काळे रेखावृत्तासारखे पट्टे असतात. गोडी जास्त असते.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
२. असाहीयामाटो : फिकट हिरव्या रंगाची साल असून फळे मोठी असली तरी गोडी कमी असते व चवीस थोडेसे पांचट असते. त्यामुळे मागील वीस वर्षापासून ही जात पडद्याआड गेली.
३.मधु : या संकरित जातीची फळे लंबगोल आकाराची असून फळांची साल गर्द हिरवी असते. फळांचे वजन ६ ते ७ किलो भरते. गर भरपूर व लाल असतो. या दशकात या जातीची मागणी बर्यापैकी होती.
४. अर्कामाणिक : या जातीची फळे आकाराने मोठी, गोल असतात. फळाची साला गर्द हिरव्या रंगाची मध्यम जाड सालीची असते.
५. मिलन : लवकर तयार होणारी संकरित जात असून फळे लंबगोल आकाराची असतात. फळाचे वजन ६ ते ७ किलो भरते.
६. अमृत : महिको कंपनीची संकरित जात असून फळे मध्यम आकाराची किंचित लंबगोल असून ५ ते ७ किलो वजनाची असतात. फळांच्या सालीचा रंग गर्द हिरवा असतो. फळांमध्ये बी कमी असते.
लागवडीचा हंगाम : लागवड शक्यतो जानेवारी महिन्यात करावी. म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होत असून त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात. दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तयार होतात. उत्पादन कमी येते. परंतु भाव चांगला मिळतो. लागवडीचा हंगाम कोणताही असला तरीही त्यास सप्तामृत (जर्मिनेटर,थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन) वापरल्यास प्रतिकूल हवामानात देखील वाढ चांगली झाल्याने अधिक उत्पादन मिळते. त्याचबरोबर दर्जाही सुधारतो त्यामुळे भावदेखील चांगला मिळतो. पंढरपूर, बारामती, जुन्नर भागामध्ये कलिंगडाची लागवड बाराही महिने करतात व ही कलिंगडे आडहंगामामध्ये निर्यातदेखील करतात.
लागवड : लागवड सरी पद्धतीने किंवा आळे पद्धतीने करतात. शक्यतो सरी पद्धतीनेच लागवड करावी. दोन मीटर अंतरावर सर्या काढून सरीच्या दोन्ही बाजूस दोन फुटावर लहान लहान आळी तयार करावी. एका आळ्यामध्ये एकच बी लावावे. पाणी कमी असल्यास १० -१० फुट अंतरावर सरी काढून ४ -४ फुटावर लागवड करावी.
पाणी : पाच ते सहा दिवसांचे अंतराने पाणी द्यावे. थंडीमध्ये दुपारी ११ ते ४ ह्या वेळेत व उन्हाळ्यामध्ये सकाळी ९ च्या आत पाणी द्यावे. पाण्याच्या पाळ्या अनियमित दिल्यास फळे तडकण्याचा किंवा त्यांचा आकार बदलण्याचा संभव असतो.
खते : 'कल्पतरू' सेंद्रिय खत एकरी १०० किलो वापरावे. खत देताना ५० -५० किलो कल्पतरू खत २ टप्प्यात द्यावे. फळांच्या गाठी मोठ्या झाल्यानंतर खत देवू नये. कल्पतरू सेंद्रिय खत असल्याने जमीन भुसभुशीत होऊन गारवा वाटतो त्यामुळे वेलीची उन्नग्रहण करण्याची क्रिया सुरळीत होते. त्यामुळे वेलींची वाढ जोमाने होऊन फळांचे पोषण चांगले होते. उन्हाळी कलिंगड पिकला शेणखत, कंपोस्ट खतापेक्षा किंवा सर्व उन्हाळी पिकासाठी कल्पतरू खत हे अतिशय फायदेशीर ठरले असल्याचे शेतकर्यांनी आम्हास कळविले आहे.
तोडणी व उत्पादन : साधारणपणे ९० ते १२० दिवसांमध्ये फळे काढणीस येतात.
तयार फळ कसे ओळखाल ?
१) फळांचा आकार गोलसर व मधे फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने पक्क फळावर वाजवल्यावर डबडब असा आवाज येतो.
२) फळांच्या देठावरील लव फळ पक्क होण्याच्या वेळी नाहीशी होते.
३) पूर्ण पक्क झालेल्या फळांचा जमिनीवर टेकलेला भाग पांढरट - पिवळसर रंगाचा दिसतो.
Comments
Post a Comment