*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
*४५. सिनर्जी निर्माण करा व पैसा मिळवा*
--------------------------------
Synergy म्हणजे The Combined Power of group of things, when they are working together that is greater than the total Power achieved by each working separately.
सिनर्जी ही उद्योगात यशस्वी होण्यासाठी खूप महत्वाची बाब आहे. सर्व गोष्टी स्वतःला येतील, सर्व काही मीच करेन असा विचार करणारा एक तर वेडा असेल किंवा देव असेल. तुम्हाला काही तुमच्या वैयक्तिक कॅपॅसिटी पलीकडे कमवायचे असेल तर तुम्हाला इतरांशी Synergy निर्माण करावी लागेल. समजा तुम्ही प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये चांगले असाल, परंतु मार्केटिंगमध्ये कमजोर असाल, तर तुम्हाला मार्केटिंग वाल्यांशी Synergy तयार करावी लागेल. एका झाडाखाली दोन लहान मुलं उभी होती व झाडाला सफरचंदे लागली होती, पण ती त्यांच्या हाताला येत नव्हती, त्या दोघांनी विचार केला आपण एकत्र काम करू, जाड्या मुलाने हडकुळ्या मुलांला खांद्यावर चढायला सांगितले त्यामुळे त्यांना सफरचंद त्यांना तोडता आली.
पहिल्यांदा केवळ प्रत्येकी एक सफरचंदही मिळत नव्हते, परंतु Synergy तयार केल्याने ५ सफरचंदे मिळाली. जाड्या मुलाने तीन घेतली, कारण त्याने जास्त ताकद लावली होती व हडकुळ्याने दोन घेतली. उद्योग, व्यवसाय करत असताना आपण ओपन माईंडेड असावे, इतरांशी जुळवून काम करायला हवे, त्यामुळे तुमच्या मुळबुध्दीपेक्षा, कुवतीपेक्षा जास्त फायदा होतो. आठमुठ्या, ताठर माणसाचा आयुष्यात दगड होतो. फायद्यासाठी नमते घ्या, जुळवून घ्या, पुढे पुढे चाला.
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते
Comments
Post a Comment