सेन्सेक्स आणि निफ्टी :
भारता मध्ये दोन प्रमुख शेअर बाजार आहेत ज्यांचं नाव अनुक्रमे
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) असे आहे.
Sensex हा दोन शब्दांवरून तयार झालेला शब्द आहे. Sensetive आणि Exchange.
हा BSE मधील लिस्टेड असणाऱ्या कंपनीचा समूह किंवा इंडेक्स आहे.
BSE मधील सर्वात ज्यास्त बाजारभाव असलेल्या 30 कंपन्यांचा SENSEX मध्ये समावेश होत असतो बाजार भावानुसार या कंपन्या बदलत असतात. ( बाजारभाव = एखाद्या कंपनीच्या शेअर ची संख्या * सद्याचे बाजार मूल्य )
Nifty हा शब्द सुद्धा दोन शब्दांवरून तयार झालेला आहे. ते म्हणजे नॅशनल फिफ्टी म्हणजेच बाजार भावानुसार निफ्टी मध्ये समावेश असलेल्या प्रथम 50 कंपन्यांचा या इंडेक्स मध्ये समावेश होत असतो.
एखादी कंपनी दोन्ही इंडेक्स मध्ये लिस्टेड असल्यास त्या कंपनीचे बाजार मूल्य जर दोन्ही इंडेक्स मधील बाजारभावाची पात्रता पूर्ण करीत असेल तर त्या कंपनीचा समावेश दोन्ही इंडेक्स मध्ये होतो.
आपण जर एखादा दोन्ही इंडेक्स मध्ये लिस्टेड असलेला शेअर घेतला असल्यास आपण तो शेअर त्याच स्टॉक एक्सचेंज मध्ये किंवा दुसऱ्या इंडेक्स मध्ये विकू शकतो. ( दुसऱ्या इंडेक्स मध्ये विकायचा असल्यास तो शेअर कमीत कमी 5 दिवसा पूर्वी घेतलेला असावा जर 5 दिवस झाले नसल्यास शेअर viklyas दंड भरावा लागतो.)
Comments
Post a Comment