Skip to main content

#नेतृत्व आणि दलाल.....

*नेतृत्व आणि दलाल*
--------------------------
         *नेतृत्व समाज्यातून जन्माला येते,*
दलालाला शत्रू निर्माण करतो.
         *नेतृत्व नेहमी समाज्याच्या हिताचे निर्णय घेते,*
दलाल स्वतःचे हित बघत असतो.
          *नेतृत्व समाज्याच्या उपयोगात येते,*
दलाल शत्रूच्या उपयोगात येतो.
           *नेतृत्व स्वतःच्या बुद्धीने चालते,*
दलाल मालकाच्या इशाऱ्यावर नाचतो.
           *नेतृत्व विचारी असते,*
दलाल अविचारी असतो.
            *नेतृत्व महापुरुषांच्या कार्य-विचारांचे वाहक असते,*
दलाल कार्य-विचारांना नष्ट करण्याचे काम करतो.
            *नेतृत्वाला मान सन्मानअसतो,*
दलालांना कुत्र्याची ही किंमत नसते.
             *नेतृत्व पिढ्यांन, पिढ्या स्मरणात राहते,*
दलाल क्षणभुंगर असतो.
             *नेतृत्व समाज्याची ओळख असते,*
दलाल समाज्यातील घाण असते.
             *नेतृत्व लढत-लढत मरते,*
दलाल रडत- रडत जगत असतो.
             *नेतृत्वाच्या संगतीने समाज असतो,*
दलाल शत्रूच्या मागे-मागे असतो.
             *नेतृत्व समाज्याला स्वाभिमानी बनविते,*
दलाल समाज्याची बोली लावत असतो.
            *नेतृत्व समाज्याला देणारा समाज बनविते,*
दलाल समाज्याला मागणारा समाज बनवितो.
*दलाल हटवा आणि समाजातील योग्य नेतृत्वाला साथ द्या.*

Comments