*आसान है!..* ------------------------------- तो एका उच्चमध्यम वर्गीय सुखी घरात जन्मला होता. पण वयाच्या चौदाव्या वर्षी दहावीला असताना, काही कारणाने, त्याच्या वडीलांचा बिजनेस आर्थिक अडचणीत आला. एकामागोमाग एक संकटे कोवळ्या वयात त्याच्या कुटूंबावर कोसळली. तो हातपाय गाळुन रडत बसला नाही, त्याने कॉलेज शिकता शिकता अनेक धडपडी करायला सुरुवात केली. आपली उपजिवीका चालवण्यासाठी त्याने आणि त्याच्या आईने अनेक खटाटोप केले, अगरबत्ती विकल्या, पिसीओ चालवला. एकेक रुपया मिळवण्यासाठी, संघर्ष अनुभवला. नाजुक आर्थिक परिस्थितीमुळे त्याने स्वतःहुन कॉलेजचे शिक्षण अर्ध्यावर सोडले, अनेक छोटेमोठे बिजनेसचे अनुभव घेत, त्याने मल्टी लेव्हल मार्केटींग कंपनी जॉईन केली, तिथे तो अपयशी ठरला, मग त्याने स्वतः लिक्विडसोप तयार केली, त्याचे पॅकेजींग करुन विक्री केली, तिथेही त्याला यश मिळाले नाही, तो रुबाबदार होता, नशीब आजमवण्यासाठी त्याने मॉडेलिंगही करुन बघितले, पण त्यातही त्याचे मन रमले नाही. त्याने काही दिवस इव्हेंट मॅनेजमेंट करुन पाहीले, तिथेही त्याच्यासोबत फसवणुक झाली. त्याने पार्टनरशिपमध्ये एक कंपनी उघडली, ती चांगली चालु लागली, पण त्याच्या पार्टनरनी त्याला धोका दिला, सगळे पैसे लुबाडुन कंपनी बंद केली. तो पुन्हा एकदा रस्त्यावर आला. एकंदरीत तो इतक्या वेळा अपयशी झाला, की आपल्या अनुभवांवर त्याने एक पुस्तकच लिहुन काढले, पण दुर्दैवाने तेही अपयशी ठरले. मॉडेलिंग करताना त्याला एक गोष्ट लक्षात आली की फोटोशुट करणार्या कंपन्या मॉडेल्सच्या पोर्टफोलीओ बनवण्यासाठी त्यांना लुटत आहेत. इतरांना मदत करण्याच्या सवयीमुळे त्याने स्वतःच मित्रांचे फोटो काढायला सुरुवात केली. गंमतीत गंमतीत सुरु केलेला हा उद्योग त्याला चांगले उत्पन्न देऊ लागला, इथे त्याची रुचीही वाढु लागली. ह्या क्षेत्रात आगळेवेगळे स्थान निर्माण करण्यासाठी त्याने एक गिनीज बुक रेकॉर्ड करण्याचे ठरवले. 2003 मध्ये दहा तास पंचेचाळीस मिनीटात, एकशे बावीस मॉडेल्सचे, लगातार, दहा हजार फोटो शुट केले. त्यानंतर टेक्नॉलॉजीचा वापर करुन त्याने इमेजेस बजार नावाची वेबसाईट सुरु केली. सुरुवातीच्या अपयशानंतर, ही वेबसाईट फ्री मोडेल्सच्या फोटोजसाठी, जगातली सर्वात जास्त वापरली जाणारी वेबसाईट ठरली. प्रवास इथे थांबला नाही, त्याचा प्रवास तर इथुन सुरु झाला. संपुर्ण भारतात, मोठ्या मोठ्या संख्येने फ्री सेमिनार घेत सकारात्मक विचारांचा जागर त्याने सुरु केला, आजही रोज लाखो तरुण तरुणींना आपल्या बोलण्याने तो भुरळ घालतोय. आसान है! हा त्याचा मुलमंत्र! तोच आपला सर्वांचा लाडका संदीप महेश्वरी! गप्पाटप्पात जीवनाचं गहन तत्वज्ञान समजवण्याची अदभुत क्षमता लाभलेला संदीप महेश्वरी! स्वतःची दुःखं आतल्या आत दडवुन, जगाला खळखळुन हसायला भाग पाडणारा, मुक्तहस्ते आनंद वाटणारा, संदीप महेश्वरी! जगण्याचा उत्सव करा, उत्साहाने जगा, सगळं काही सोपं आहे, असं मनावर बिंबवणारा संदीप महेश्वरी! पैशापासुन अध्यात्मापर्यंत आणि कलेपासुन तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्रावर अदभुत पकड असणारा संदीप महेश्वरी! आपल्या वागण्याबोलण्याने, आपल्याला जिंकुन घेणारा संदीप महेश्वरी! एक पैसाही न घेता, लाखो लोकांना जगण्याचा नवा दृष्टीकोन देणारा, संदीप महेश्वरी! आणि आज त्याचा वाढदिवस! जे फक्त देतच असतात, अशा माणसांना आपण काय द्यावं? आणि अशा माणसांसाठी कधी मागावं, तर काय मागावं?
*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...
Comments
Post a Comment