Skip to main content

#स्वतःचा आत्मविश्वास आणि संयम....

अब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा संसदेत भाषण करण्यासाठी गेले. सर्व सिनेट सदस्यांनी भरलेल्या सभागृहात त्यांना आपलं अध्यक्ष म्हणून पहिलं भाषण करायचं होतं. त्या भरलेल्या सभागृहात लिंकन पोहोचले आणि भाषण सुरु करण्यापूर्वी एक जेष्ठ सदस्य, जे अत्यंत श्रीमंत उद्योगपती उठून उभे राहिले आणि लिंकन ला उद्देशून म्हणाले ," मि. लिंकन, तुम्ही हे विसरू नका कि तुमचे वडील माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी बूट बनवत होते "
सगळे उपस्थित जोरात हसले आणि त्यांना वाटलं कि याने लिंकन यांना एक जोरदार चपराक लावली आहे आणि त्यांची लायकी दाखवली आहे. मात्र काही व्यक्ती कशाच्या बनलेल्या असतात कोणास ठाऊक ? ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचं संतुलन ढळू देत नाहीत आणि आपल्या हजरजबाबी विद्वत्तेने समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करून आपला मोठे पणा सिद्ध करतात, ते हि अगदी शांतपणे !! लिंकन हि असेच !!
सभागृह काय होणार याकडे जीव कान आणि डोळ्यात आणून पहात होतं. प्रेसिडेंट लिंकन यांनी सरळ सरळ त्या व्यक्तीवर नजर रोखून धरली ,आणि त्याला म्हणाले ,
"सर , मला माहित आहे हे , कि माझे वडील आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी बूट बनवत होते तसेच इथे अनेक इतरही सदस्य आहेत कि ज्यांच्या कुटुंबासाठी माझे वडील बूट आणि पादत्राणे बनवत होते कारण त्यांच्या सारखी पादत्राणे इतर कोणीच बनवू शकत नव्हतं "
" ते एक कलाकार होते, ते एक निर्माते होते , त्यांच्या हातात जादू आणि कला होती , त्यांनी बनवलेल्या चप्पल -बूट फक्त ह्या फक्त चपला आणि बूट नव्हते , आपलं संपूर्ण मन आणि कसब ते त्यात ओतून अत्यंत काळजीपूर्वक हे काम ते करत होते, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे , तुम्हाला या पादत्राणाविषयी काही तक्रार आहे काय ? कारण हे कसब मलाही अवगत आहे कि हे बूट कसे बनवायचे. आपली काही तक्रार असेल तर नक्की सांगा मी आपल्याला एक नवीन बुटांचा जोड बनवून देईन. पण माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत माझ्या पिताजींनी बनवलेल्या बुटांविषयी अजून तरी कोणाची काहीच तक्रार आलेली नाही. ते एक अत्यंत हुशार आणि मनस्वी कलाकार आणि कारागीर होते आणि माझ्या वडिलांचा मला आजही सार्थ अभिमान आहे !!!"
सर्व सभागृह बधिर झाल होतं , कोणाला काय बोलाव हे सुचत नव्हतं , अब्राहम लिंकन हि काय व्यक्ती आहे याची एक छोटीशी झलक आणि चुणूक या प्रसंगातून सगळ्यांना दिसली होती.आणि त्यांना त्यांच्या वडिलांचा अभिमान असल्याचा आता त्यांनाही अभिमान वाटू लागला होता.
मित्रानो , यातून एकच गोष्ट लक्षात घ्या , प्रसंग कसाही असो आपला तोल जावू देवू नका ,कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या
" आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही " हे वाक्य मनावर कोरून ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांती ढळू देवू नका
" काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो तर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते !!! . . स्वतःचा आत्मविश्वास आणि संयम कधीही ढळू देऊ नका, असे असेल तर यशस्वी होण्यापासून तुम्हांला कोणीही रोखू शकत नाही.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...