*उद्योग आणि मराठी माणूस...* -------------------------------- *_१८. महागाई कधीही कमी होणार नाही, तुम्ही पैसे कमवा_* -------------------------------- 'तब तक कमाओ, जब तक महंगी चीज सस्ती ना लगने लगे... चाहे वो सम्मान हो, या सामान...' पृथ्वीचे तापमान : वाढती लोकसंख्या, प्रदूषण, वृक्षतोड यामुळे पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. प्रत्येक वर्षी मागील वर्षापेक्षा मोठा दुष्काळ व ऊन पडताना दिसत आहे. पाऊस कमी होत चालला आहे, तापमान वाढीमुळे पाणी कमी झाले आहे. अनियमित पाऊस आणि पिकावरील रोगाचे प्रमाण वाढते आहे, त्यामुळे पीक उत्पादनावरील खर्च वाढतोय; पण उत्पादन कमी होत आहे, त्यामुळे वस्तूच्या किंमती वाढत आहेत, धरणात पाणी कमी झाल्यामुळे वीजनिर्मिती कमी होत आहे, नैसर्गिक साधनांवर ताण पडत आहे. खाणारी तोंडे १३० कोटी व उत्पन्न फक्त ६० कोटी लोकांना पुरेल एवढेच आहे, जेव्हा उत्पादन खर्चच वाढत चालला आहे, तेव्हा वस्तूंच्या किंमती कशा कमी होणार? महागाई कमी होणार नाही : कोणत्याही पक्षाचे सरकार येवो, निसर्ग नियमांनुसार महागाई ही वाढतच जाणार आहे. वाढत्या महागाई मागील मूलभूत नैसर्गिक व अर्थशास्त्रीय नियम समजून घ्या. अर्थशास्त्रज्ञांच्या एका गटाने पुढील ७ ते ९ वर्षातील वर्तवलेले वस्तूचे दर बघा. गहू ९० रु/कि, तांदूळ १२५, साखर १०८, तुरडाळ ४५०, उडीदडाळ ५८०, शेंगतेल ३८०, वांगी १५०, टोमॅटो १२०, कांदा २१०, बटाटा ८०, चहापावडर १८००, तूप २७००, दूध ११०, पालकपेंडी ७०, मेथीपेंडी ९०, हिरवी मिरची २१०, हरभराडाळ ३१०, मुंबई-पुणे बस प्रवास १२१०, वीज २३ रुपये प्र/यु, पेट्रोल १३८ रु/ली, इंग्रजी शाळेची वार्षिक फी १ लाख रुपये, नारळ ५० रुपये, केळी ९० रु/ डझन, द्राक्षे २५० रु/कि, डाळिंब ३१० रु/कि, थंडतापवरील साधे उपचार ३५० रु., रिक्षा भाडे रुपये ४५ इत्यादी तब्बल २५० हून अधिक गोष्टींची यादी दिली आहे. मित्रहो, जरा विचार करा, पुढील दहा वर्षात तुम्हाला जगण्यासाठी किती पैसे लागतील? आपण काय करावे : कोणी कितीही सांगो, महागाई कोणत्याही परिस्थितीत कमी होणार नाही. देश स्वतंत्र झाल्यापासून प्रत्येक पक्ष व नेता आश्वासन देतो, पण सर्व खोटे असून निसर्ग नियमांनुसार वस्तूचे दर वाढतच जाणार आहेत. पुढील दहा वर्षांनंतर जेव्हा तुमच्यावर कुटुंबाची जबाबदारी येईल, बायको व दोन मुलं असतील, तेव्हा चांगले जीवन जगण्यासाठी किती पैसे लागतील यांचा अंदाज बांधा. जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे कोणत्याही नोकरीतील पगारातून तुम्हाला मिळू शकत नाहीत, तेव्हा श्रीमंत होण्यासाठी उद्योग व व्यवसाय सुरू करणे, याशिवाय तुम्हाला दुसरा कोणताही मार्ग सापडणार नाही. भविष्यात सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी एक कुटुंबाला दरमहा किमान ५० हजार रुपये लागतील. चांगले उच्च पद्धतीचे जीवन जगण्यासाठी दरमहा किमान २ लाख रुपये लागतील. हा पैसा तुम्ही उद्योग केल्यावरच मिळवू शकता तेव्हा तुम्हाला चांगले सामाजिक जीवन जगायचे असेल, तर नोकरी करून जगता येणार नाही. ही वाढणारी महागाई तुमचा नोकरीतील पगार पहिल्या ५ दिवसात संपवून टाकेल. तेव्हा उद्योगाची कास धरा. आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात त्यासंबंधीचे विवेचन करण्याचा व माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा. - प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया
*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...
Comments
Post a Comment