Skip to main content

_#प्राईड ऑफ काऊज_*

_प्राईड ऑफ काऊज_*

संपूर्ण देश दररोज पितोय ५०कोटी लिटर नकली दूध? या अॅनिमल वेलफेअर बोर्ड च्या बातमी ने जनतेच्या मनात अनेक शंका उभ्या असताना संपूर्ण भारतातच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठ्ठा गोठा आणि शुध्द दुधाचा दर्जा जपणारा "भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म" मंचर, जि पुणें यांचा 'प्राईड ऑफ काऊज'या दूधाच्या ब्रँडने आपल्या दुधाच्या शुध्दतेची हमी देत, अमिताभ बच्चन,सचिन तेंडूलकर,अंबानी परिवारात हक्काचे ग्राहकत्व मिळवले आहे.  गोवर्धन ग्रुप च्या भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म च्या उपक्रमास ९०.४ग्रीन एफ.एम.चा सलाम.

            श्री. देवेंद्र शहा यांनी साली भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म ची स्थापना १९९० मध्ये केली.देवेंद्र शहा हे1990 साली पशुखाद्य विक्रेते होते, 1990 साली सरकारने आठवड्यातून एक दिवस दूध खरेदी बंद केली त्यावेळी दूध उत्पादकांनी त्यांना तुम्ही दूध खरेदी करा व प्रोसेसिंग करा असा सल्ला दिला त्यानुसार त्यांनी दूध खरेदी करायला चालू केले, त्याचबरोबर त्यांनी 30 hf गाई खरेदी करून दुग्ध व्यवसाय चालू केला होता.

आजमितीस त्यांच्याकडे 3000 गाई आहेत 27 एकर मंध्ये मंचर ता.नारायणगाव जि. पुणे येथे अत्याधुनिक गोठा व दुध प्रक्रिया युनिट आहे.भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म अत्याधुनिक करण्यासाठी शहा यांनी सुरवातीला विदेश दोरे केले व अभ्यास करून या क्षेत्रात पदार्पण केले.

भाग्यलक्ष्मी डेअरी च्या गाईंना RO  चे पाणी ,म्युजिक थेरेपी ,आणि सेंद्रीय हिरवा चारा दिला जातो ,हिरव्या चाऱ्यासाठी 250 शेतकऱ्यांशी बरोबर करार केलेला आहे.गायी आजारी पडल्या तर आयुर्वेद औषधां चा वापर केला जातो.विदेशी डॉ.कडून दर तीन महिन्याला गाईंची आरोग्य तपासणी केली जाते.गाईचं दिवसातून 3 वेळा दूध मशीन ने काढून त्यावर योग्य ती प्रक्रिया करून फ्रेंच टेकनिक नुसार बाटली बंद दुध विक्री साठी पाठवले जाते.

दररोज 20 हजार लिटर दुध भाग्यलक्ष्मी डेअरीतून विक्रीसाठी पुणे ,मुबंई ,सुरत येथे पाठवले जाते.घरपोच सेवा आणि ह्यूमन अनटचड् मिल्क असल्याने खूप मोठ्ठा ग्राहक वर्ग जोडला गेला आहे.दूधापासून तयार होणारे दही,ताक,लोणी,तुप,गुलाबजाम बनवले जातात आणि संपूर्ण भारतभर त्याची विक्री केली जाते. 

भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म ची वर्षिक उलाढाल कोटीं च्या आकडेवारीत आहे.2400 जणांचा स्टाफ आहे.100 माणसं मार्केटिंग साठी जगभरात फिरतात. दररोज 70 मेट्रीक टन चीज चे उत्पादन होते.42 देशात या चीज ची निर्यात होते. गोचीज नावाने ब्रँड आहे. प्रत्येक देशाला लागणाऱ्या चवीनुसार फ्लेवर्ड चीजं पुरवलं जातं.

आशिया खंडातील हा सर्वात मोठा तर सर्वात स्वच्छ व सुंदर प्रकल्प असून डेअरीला लागणारी वीज बायोगॅस मधून निर्माण केली जाते.दुधाची वाढती मागणी व वाढता ग्राहकवर्ग असल्याने गायीचे गोठे हैद्राबाद,दिल्ली येथे वाढवले आहेत.

गायींच्या शेणामूता पासून जीवाम्रूत,सेंद्रिय खत,स्लरी सारखे प्रोडक्ट तयार करून शेतकऱ्यांना अल्प दरात विक्री करतात.गोवर्धन डेअरी च्या भाग्यलक्ष्मी आणि पराग मिल्क फूड्स अशा संस्था आहेत.पराग मिल्क ही कंपनी सध्या शेअर मार्केट लिस्टेड आहे.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...