Option Market..
Option Market ला वायदा बाजार असेही म्हणतात..
जस तुम्ही एखादा plot विकत घेतला 1 लाख रु. ला पण आपण त्यांना फक्त 10 हजार देऊन आपण त्याची इसार पावती करून घेतो आणि 1 महिन्याने बाकी चे 90 हजार देऊन Registry करून घेतो याचा अर्थ असा कि आपण 1 महिन्याचा वायदा करतो..
आणि आपण जर उरलेली रक्कम वेळेत नाही दिली तर आपण त्याची Registry पण करू शकत नाही आणि आपण दिलेला हिसार पण आपल्याला परत मिळत नाही.. तेव्हा आपण जर Estate Broker असाल तर आपण 1 महिन्यात त्या Plot साठी 1 लाख 50 हजार रु चा customer शोधून आपण ती Property दुसऱ्या कोणाला तरी विकतो म्हणजे 10 हजार रु मध्ये आपण 50 हजार रु. कमावतो पण आपल्या जर 1 लाख च्या वर जर Customer नाही भेटला तर आपण तीच Property 90 हजार ला विकून आपण आपले 10 हजार चे पण नुकसान करून घेतो...
त्याच प्रमाणे Option Market मध्ये आपण 2 लाखा चे Stock 20,30 हजार देऊन घेत असतो त्याला इथे Premium असे म्हणतात.. मग आपण 2 लाखाचा माल 30 हजार मध्ये घेतला आणि 1 महिन्याच्या आत आपल्या ला त्याच शेयर साठी 2.50 लाख चा Customer भेटला तर आपण 30 हजार वर 50 हजार कमवू शकतो पण नाहि भेटला तर आपले नुकसान पण होऊ शकते..
तर महिन्या च्या शेवट च्या गुरुवार पर्यंत आपल्याला तो व्यवहार पूर्ण करायचा असतो..
त्यामध्ये नंतर दोन गोष्टी असतात CALL आणि PUT
1.
CALL
यासाठी CE असा Symbol असतो याचा अर्थ आपला Nifty किंवा एखादा Stock जर वर जाणार आहे हे आपल्या ला माहित असेल तर आपण CALL or CE ची खरेदी करतो
2.
PUT
याचा symbol PE असा असतो जर आपल्या ला माहित या कि एखादा Stock किंवा Nifty खाली येणार आहे तेव्हा आपण PUT or PE ची खरेदी करतो
Comments
Post a Comment