Skip to main content

#मेबॅक DS8 झेपलिन...

१०० वर्षांपूर्वी जंगबहाद्दूर हत्ती कोल्हापूरच्या शाही दसर्याच्या अग्रस्थानी असायचा, जंगबहाद्दूर नंतर हि जागा 'मेबॅक' या आलिशान जर्मन कार ने १९३२ पासून घेतली.
'मेबॅक DS8 झेपलिन' असं पूर्ण नाव असलेली हि एकमेव कार भारतात उपलब्ध आहे,आणि जगभरात फक्त ४-५ असाव्यात.अश्या फक्त १०० कार्स चे उत्पादन मेबॅक तर्फे करण्यात आलेले.तत्कालीन जगात फक्त काही मोजके राजे,सुलतान राष्ट्राध्यक्ष,लष्करशहा यांच्यातच हि ऐपत होती कि ते हि कार विकत घेऊ शकतील.कंपनीनेही 'प्रोफाईल' बघूनच या कार्स विकल्या.
१९३२ साली छत्रपती राजाराम महाराजांनी मेबॅक कार ऑर्डर देऊन लंडनमधून खरेदी केली. संस्थानाच्या ध्वजाचा रंग केशरी असल्याने केशरी रंगाच्या कारची ऑर्डर देण्यात आली. बॉनेटच्या पुढे महालक्ष्मी मूर्ती असून ,कारच्या मधल्या हेडलाईटवर भवानी आणि शिवराय असे संस्थानाचे चिन्ह कंपनीकडून तयार करवून घेतले.आजतागायत या गाडीची एकदाही दुरुस्ती झाली नाही. अत्यंत उत्कृष्ठ स्थितीत आणि अतिशय दुर्मिळ असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात या कार ची किंमत सुमारे ४० कोटी (६.५ Million $ ) आहे.
विल्हेम मेबॅक यांनी १९०९ साली मेबॅक कंपनीची स्थापना केली होती ,गॉटलिब डैम्लर त्यांचे सहकारी मित्र होते तर यांच्या कंपनीत फर्डिनांड पोर्श हा डिजाइन इंजिनियर म्हणून होता. त्यादरम्यानच कार्ल बेंझ आणि डैम्लर यांनी मर्सिडीज बेंझ कंपनीची स्थापना केली. फर्डिनांड पोर्श नेही वेगळे होत पोर्श मोटर्स चालू केली. डैम्लर आणि त्यांच्या मुलांने ऑडी आणि BMW च्या स्थापनेतही हातभार लावला.
जर्मनी मध्ये त्या काळात अडोल्फ हिटलर चा उदय झाला होता, तो मेबॅक कार्स चा प्रचंड मोठा चाहता होता. पण मेबॅक सारख्या अल्ट्रालक्झरी कार्स सामन्यांच्या आवाक्यातल्या नाहीत हि रुखरुख त्याला होती आणि त्यातूनच Volkswagen ('सर्वसामान्यांची कार' ) चा जन्म झाला.Volkswagen च्या बीटल कार ची संपूर्ण संकल्पना अडोल्फ हिटलर ची होती आणि या प्रोजेक्ट चा लीड होता फर्डिनांड पोर्श. बीटल हि खर्या अर्थाने सर्वसामान्यांची कार ठरली कारण किंमत होती फक्त ८५ पौंड आणि अश्या २.५ कोटी बीटल्स जगभर विकल्या गेल्या.
राजाराम महाराजांच्या नंतर शाहू महाराज,संभाजीरा
जे,मालोजीराजे हे ही या मेबॅक ची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतात. मेबॅक कार जशी कोल्हापूरकरांच्या आणि छत्रपतींच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली तशीच हि कार जगभरातल्या मोठ्या कार ब्रान्ड्स ची जनकही बनली.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...