*उद्योग आणि मराठी माणूस...* -------------------------------- *_१५. यशस्वी उद्योगाची त्रिसूत्री कोणती?_* -------------------------------- माणूस असो, उद्योग असो, उत्पादन असो किंवा सेवा, धर्म ग्रंथातील समग्यदर्शन, समग्यज्ञान, समग्यचरित्र ह्या तिन्ही गोष्टी त्यांना लागू पडतात. *>> सम्यकदर्शन :* म्हणजे तुमचे, तुमच्या व्यवसायाचे, तुमच्या प्रॉडक्टचे समजणे, दिसणे हे चांगले असले पाहिजे. यालाच आजच्या काळात पॅकेजिंग व पोजीशनींग म्हणतात. ही कोणत्याही उत्पादनाच्या, यशाची पहिली पायरी आहे. यालाच व्यवसायाचा योग्य विश्वास किंवा श्रध्दा असेही समजतात. *>> सम्यकज्ञान :* म्हणजे व्यक्ती किंवा प्रॉडक्ट केवळ दिसायला चांगले असून उपयोगाचे नाही, तर त्याचे गुण, क्वॉलिटी चांगली असली पाहिजे. मुलगा फक्त सुंदर असून उपयोग नाही, तर तो ज्ञानी असला पाहिजे. प्रॉडक्टची क्वॉलिटी ही दुसरी महत्वाची पायरी आहे. *>> सम्यकचरित्र :* तुम्ही, तुमचा उद्योग व प्रॉडक्ट चांगल्या नीतीवर आधारित असावेत. खूप पैसा कमविला व ५० तोळ्याची चैन घातली; पण ती नीतीने कमविली नसेल, तर तीच चैन फाशीचा फंदा बनेल. तुमच्या उत्पादनाचे परिणाम हे चांगले व चरित्र निर्माण करणारे असावेत, यालाच ज्ञानाची योग्य उपयोगिता म्हणतात. ह्या तीन पायऱ्यांवर आधारित कोणताही व्यक्ती, उद्योग, उत्पादन, ब्रॅंड अव्याहत, निरंतर यशस्वीपणे पुढे आपली वाटचाल करीत राहतो. ह्याच तीन पायऱ्यांनाच जैन धर्माची त्रिसूत्री म्हणतात. ह्याचमुळे जैन धर्मीय सर्वात श्रीमंत व उद्योगात सर्वाधिक यशस्वी आहे. आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात त्यासंबंधीचे विवेचन करण्याचा व माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा, मराठी मुलं उच्चतम स्पर्धेत यशस्वी व्हावीत यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा. - प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया
*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...
Comments
Post a Comment