मराठी माणूस हा या मार्जिनल व्यवसायांना “तुच्छ ” लेखतो म्हणून तर इतर प्रांतातील लोक लाखो रुपये कमवतात ? कुठे आहे मराठी माणूस
जिलेबी सेंटर (29/09/2018) बिझनेस मधील एक प्रकार असतो त्याला ” मार्जिनल बिझनेस ” असे म्हणतात या प्रकारच्या बिझनेस मध्ये investment ही अगदी थोडी असते . पण त्या मानाने नफा हा बक्कळ मिळतो .
आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत या प्रकारच्या व्यवसायांचं योगदान हे GDP च्या 60% एवढं मोठं आहे . पण दुर्देव असं कि , मराठी माणूस हा या मार्जिनल व्यवसायांना “तुच्छ ” लेखतो.
आणि मार्जिनल व्यवसायांपासून दूर रहातो , म्हणून तर इतर प्रांतातील लोकांनी इथं येऊन वेगवेगळ्या मार्जिनल व्यवसायातून संपत्ती निर्माण केलीये असो तो विषय वेगळा आहे .
तर हरियाणा तून आलेल्या लोकांनी आपल्या इथे जिलेबी सेंटर्स सुरू केले त . भांडवल : दोन कढ्या, झारे , एक छोटं काऊंटर , बजनकाटा आणि पातेली बस्स एवढया भांडवलावर सामान्य गावात दिवसाकाळी . दोन तीन हजार कमावतात ही लोक मग काय बिघडतय मराठी माणसांनी यात उतरलं तर !
याच्या बिझनेस जी पद्धती आपण समजावून घेऊया यांची जिलेबी लवकर नरम पडत नाही . हे गरम गरम जिलेबी देतात , आणि स्वस्त् असते ( साधारण 150 रु किलो ) तर यांच्या जिलेबी चं सिक्रेट काय आहे ? तर यांची जिलेबी पारंपारिक पद्धतीची ताक किंवा दही वापरून नसते.
तर बेकिंग पावडर व हायड्रो पावडर ( जी बाजारात सहज मिळते ) याचा वापर करून असते त्यामुळे दहा मिनीटात ते जिलेबीचं पीठ तयार करतात याची परफेक्ट सेसिपी youtube वरील Cooking shooking या चॅनेलवर instant Jalebi या शिर्षकाखाली मिळेल.
जिलेबी व्यवसायातलं प्रॉफी ट मार्जिन बघीतले तर ते जवळपास 200% आहे . रोजची विक्री सोडता छोटया – मोठया कार्यक्रमाच्या भरपूरच ऑर्डर असतात त्यामुळे हा बारामहिने चालणारा एक गोड व्यवसाय आहे .
food industry सातत्याने वाढत असल्याने , अशाच छोटया सुरुवातीपासून पुढे जाता येते , तेंव्हा लाज वगैरे काही बाळगत बसू नका !
सरळ जिलेबी सेंटर चालु करून द्या . कमाई मस्त होईल आणि स्वातंत्र्य पण मिळेल . व्यवसायीक बनन्या साठी ” गोड ” शुभेच्छा .
निलेश काळे .
Comments
Post a Comment