Skip to main content

#शेअर मार्केट वेळेची वाढ व त्याचे परिणाम🔰

🔰शेअर मार्केट वेळेची वाढ व त्याचे परिणाम🔰

🔰🔰*mission learn & earn*🔰🔰

👉 मार्केटची वेळ सध्या सकाळी 9.15 ते 3.30 आहे परंतु फ्युचर्स व ऑप्शन याप्रकारात हि वेळ रात्री 12 पर्यत करण्यात आलेली आहे.

👉संध्याकाळी 5 वाजता पुन्हा मार्केट चालु होइल व रात्री 12 वाजता बंद होइल परंतु डिलिव्हरी मध्ये शेअर्स ची खरेदी करता येणार नाही. हा फक्त फ्युचर्स व ऑप्शन मध्येच खरेदी विक्री चालु असणार आहे. निफ्टी किंवा बँक निफ्टी इन्डेक्स मध्ये ट्रेडिंग होइल का यावरती सेबीने निर्णय दिलेला नाही.

👉समजा एखाद्या कंपनीचा शेअर्स आपण सकाळी खरेदी केले व मार्केट मध्ये एखादी चांगली किंवा खराब न्युज आली तर त्यानुसार आपली पोजिशन बदलुन हेंजिग करता येइल किंवा त्याच्या विरूध्द पोजीशन घेता येइल.

👉 ज्यांना जॉब मुळे ट्रेडिंग जमत न्हवते त्यांना जॉब सुटल्यानंतर पार्टटाइम ट्रेडिंग करता येऊ शकते. त्यांच्यासाठी हि आनंदाची बातमी आहे. त्यांना घरी बसुन पार्टटाइम उत्पन्न मिळवता येइल

👉सध्याचा मार्केट बंद होण्याचा व दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन होण्याचा कालावधी 16 तासाचे अंतर आहे व अनेक गुंतवणूकदाराचे म्हणणे होते की मार्केटची वेळ वाढवावी यावरती सेबीने अमलबजावणी केलेली दिसत आहे.

👉जागतीक मार्केटची वेळ सुध्दा जास्त आहेत भारतिय मार्केटची वेळ सुध्दा जागतिक मार्केटबरोबर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ग्लोबल घटनानांचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊन गुंतवणूकदारांना नुकसान होत होते याची दखल याठिकाणी घेतली आहे. गुंतवणूकदाराला वेळीच बाहेर पडता येइल.

👉ज्याप्रमाणे एखाद्या गोष्टीचे फायदे असतात तसे तोटे सुध्दा असणार आहेत. म्हणजे यानिर्णयामुळे ऑप्शन व फ्युचर्स मधील मोठ्या पोजिशन करणे जिकरीचे जाइल कारण त्यापोजिशन वरती रात्री बारख पर्यत लक्ष ठेवावे लागणार आहे.

👉पोजिशन ओपन राहिल्याने टेनशंन वाढणार आहे परिणामी त्याचा परिणाम आयुष्यात जाणवेल.

👉  लोकांचे व्यवहार वाढल्याने सेबीचे उत्पन्न वाढणार आहे जास्त टँक्स जमा होणार आहे. सेबीचे उत्पन्नात कैकपटीने वाढ होइल.

👉मोठ्या रक्कमा घेऊन मँन्युपुलेट करणारे वर्गा वरती याचा परिणाम होणार आहे.

👉हेजिंग करणाऱ्या ना खऱ्या अर्थाने मोठा फायदा होणार आहे परिणामी न्युज व पेव पसरवणारे वर्ग निर्माण होऊ शकतात. व ऑप्शन मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू शकतात.

👉 गुंतवणूक करणाऱ्यांना खऱ्या अर्थाने सेबी प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत आहे परंतु FII ची गुंतवणूक या बदलेल्या वेळे मुळे काढुन घेऊ शकतात. यानिर्णयामध्ये FII चा तोटा आहे.

👉 सर्वात महत्वाचे म्हणजे यासर्व गोष्टीमुळे मार्केट गुंतागुंतीचे बनेल व या सर्व गोष्टी समजावुन घेण्यासाठी विशिष्ट कौशल्य विकास असल्यास याचा फायदा नक्कीच होणार आहे. पारंपरिक पध्दतीला छेद गेल्याने नवीन पध्दती शिकणे आवश्यक असणार आहे.

🔰 आमची तर तयारी आहे आणि तुमची? पुढील माहिती साठी व शिक्षणासाठी सोबत आमच्या रहा.      

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...