Skip to main content

*अर्थविचार*

*महात्मा गांधीच्या *अर्थविचार*  वर  *डॉ. डी एस् काटे*  यांचा
*दुर्मिळ माहिती असणारा लेख वाचा व शेयर करा*

*महात्मा गांधीचे अर्थविचार*’’
    भारतात २ ऑक्टोबर रोजी ’’गांधी जयंती साजरी कली जाते ह्या वर्षी १५० व्या सुवर्ण जयंतीचे विशेष महत्व आहे. महात्मा गांधी जगभरात एक प्रमुख नेते व अहिंसेचे समर्थक म्हणून परिचीत आहे. पण मला त्यांचे अर्थविचार विशेष करुन जास्त भावतात. 

गांधीजीने १८१७ साली पहिला यशस्वी सत्याग्रह चंपारण्य या गावापासून सुरु केला. लढयात गांधीजींनी पहिल्यांदा शेतकर्ययांना उतरविले तेव्हा गांधीजी म्हणाले *मी जेव्हा त्या शेतकर्यला पाहिले तेव्हा मला देवाचा साक्षात्कार झाला*’’ एवढी शेतकरी व गरीब वर्गाबद्दल त्यांना कळकळ होती. गांधीजींच्या सत्याग्रह व आंदोलनांचे मुळ हे जनहितात दडलेले होते.

केवळ संघर्ष राजकीय वापर यासाठी आंदोलनाचा वापर त्यांनी केला नाही. त्यांच्या रेटयामुळे ब्रिटीशांनी निळ सक्ती पिक पध्दत रद्द केली. व शेतकर्ययांच्या मनाप्रमाणे पिक घेण्यास मुभा मिळाली.

 त्याच वेळी खरी कृषीउदयोगाची सकारात्मक पायाभरणी झाली. भारत देशात कृषी उदयोगाशिवाय पर्याय नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. खेडेगावातील सर्वेक्षण करुन कृषीपुरक उदयोग स्थापित होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याच बरोबर घाण्याचे तेल उदयोग, हातसफाई तांदूळ, गूळ, मध, चटई ह्या अशा कृषी ग्राम व्यवस्थेवर आधारीत व्यवसाय चालू करण्याचे त्यांनी सुचित करुन प्रत्यक्षात खेडेगावातील मागणी व गजरेनुसार सुरुवात केली हाच खरा ग्राम अर्थव्यवस्थेचा पाया होय. 

१९३० मध्ये इंग्रजांनी मिठावर कर लावला वास्तवीक वेगवेगळया वस्तूंवर ब्रिटीशांनी अगोदर कर लावले होते. मिठा सारख्या स्वस्त वस्तूवर कर लावल्याने ब्रिटीशांची नाचक्की करण्यासाठी एक प्रतिकात्मक दांडी यात्रेद्वारे आंदोलन छेडले प्रामुख्याने मिठा बरोबरच इतर ही वस्तूच्या कर विरोधात सुध्दा अप्रत्यक्षरित्या हे आंदोलन होते. याद्वारे ब्रिटीशांच्या जाचक कर प्रणाली बद्दल लोकांना जागृती होवुन गांधीजींच्या आंदोलनास पाठींबा मिळू लागला. हे आंदोलन सर्व वस्तुवरील कराचे प्रतिक होते. 

अर्थव्यवस्थेतील उत्पन्न व कर याचे प्रमाण काय असावे हे त्यांनी सुचित केले. दुष्काळात शेतकर्ययांकडून शेतसारा  घेवू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. १९४२ च्या चलेजाव आंदोलनानंतर भारत स्वातंत्र्य झाल्यास देशातील आर्थिक परिस्थती कशी असावी त्यांचे त्यांनी अर्थभान ठेवून नुसतेच आंदोलन व स्वातंत्र्यास देशाची परिस्थिती सक्षम असल्याशिवाय अर्थ नाही असे मानत. स्वातंत्र्या बरोबर समान हक्क, आर्थिक स्वावलंबन,साम्प्रदायीकता ह्या गोष्टीतून विकास व्हावा असा त्यांचा मानस होता. मानसाच्या जिवन मुल्यापासून ते पोटापाण्याच्या प्रश्नापर्यंत त्यांना सक्षम अर्थव्यवस्था हवी होती. 

पाश्चात देशांने औद्योगिकरणाचे जातिकीकरण जगभर फैलावत असतांना त्यापासून भारताला वाचविण्याचे ठरवल्यास ’’स्वदेशी संकल्पने’’ शिवाय पर्याय नाही, असे सांगून स्वदेशीचे मूळ चरखा व हातमागामध्येच शोधले, त्यामुळे श्रमवृत्ती, सदभावना, यात वाढ होवून जनता स्वयंपूर्ण बनेल, देशातील मालाला देशातच बाजारपेठ मिळवून जागतीकरणामध्ये भारत स्वयंपूर्ण होईल ’चरखा’ हेच व्यापारी क्षेत्रात शांती देऊन सदभावना व स्वावलंबनाचे हेच उदाहरण आहे. त्याकाळी ’’सेवा आश्रमाची’’ स्थापना करुन उद्योग प्रशिक्षण व व्यवसाय निर्मितीचे ते क़ेद्र बनुन हजारो लोकांना रोजगार मिळू लागला. मजुरांना योग्य मेहनतीचे श्रेय व वस्तूंना योग्य खरेदी मूल्य देणे गरजेचे आहे, तसे न केल्यास ते पाप मानत.भारतीय जनतेची वस्तूची व मालाची मागणी पुरवण्यासाठी गांधीजीनी ’’स्वदेशी उद्योग व्यवसाय’’ निर्मीती सुरु केली. जनसहभागातून ’’आश्रम’’ निर्मिती करुन तेथे कौशल्य-विकास, शिक्षण, आरोग्य या विषयी शिक्षण देऊ लागले. 

गांधीजी नी आडगळीत पडलेली चरखे शोधुन काढून त्यासाठी चालवणारे निष्णांत कारागीर शोधून हजारो कौशल्य युक्त कामगार तयार केले. अशा अनेक उद्योग व्यवसायामुळे ग्रामव्यवस्थेस बळ मिळाले हीच खरी त्यावेळीची *मेक इन इंडिया*’’ ग्रामव्यवस्थेस महात्मा गांधींच्या विश्वास व विचारांनीच खाद्यी ग्रामउद्योग व हातमाग व्यवसायाचे खरी सुरुवात झाली, ह्या उपक्रमाला अनेक दानशुर व्यक्तीकडून मदत झाली. वाढत चाललेली ’’अर्थविषमता’’ त्यांना ज्ञात होती.

*श्रीमंताची श्रीमंती हिरावून न घेता त्यांची दानशूरवृत्ती वाढवून  गरिबांची पत निर्माण करणारी ’’अर्थ समानता’’ त्यांना अपेक्षीत होती*. तसे नाही झाले तर स्वातंत्र्यानंतर स्वैराचार माजेल असे गांधीजीचे मानवी भाकित होते.

श्रमाची दखल व आदर हा नैसर्गीक संसाधनानुरुप असावा श्रमाची पर्यावरणाशी मैत्री असावी त्याच बरोबर जिवन जगतांना आवश्यक तेवढाच नैसर्गीक संपत्तीचा वापर करावा योग्य त्याचा वापर असावा की पर्यावरणावर आघात होणार नाही. मनुष्य प्राण्याएवढीच विंâमत निसर्ग संतुलणास दयावी असे त्यांचे मत होते. पर्यावरण संरक्षणनुरुप मानवी जिवनशैली असावी असे त्यांचे मत होते.
*सृष्टी माणसाच्या लालसा सोडून सर्व गरजा पूर्ण करु शकते*’’ असे त्यांचे परखड मत होते. 

गांधीजीचे असे म्हणने होते की, अशी अर्थव्यवस्था निर्मीत करायला पाहिजे की भारतच नव्हे तर  जगात अन्न व वस्त्र यापासून एक ही व्यक्ती वंचित राहता कामा नये. ज्याप्रमाणे परमेश्वराने हवा व पाणी उपलबध केले त्याच प्रमाणे मानवाने मानवास पायाभूत सुविधा पुरवणे गरजेचे आहे ! बेसुमार विकासाबरोबर गरिबी व विषमता वाढत जाते असे त्यानी त्याकाळी सुचित केले. गरिब व कमजोर व्यक्तीचे औदयोगिकरणामुळे शोषण घेवु नये यांची खबरदारी घेण्याचे सांगीतले.श्रमाचा मोबदला योग्य मिळाला पाहिजे. श्रमशोषणातून निर्माण झालेले उत्पादनास म्हणजे, गांधीजी पाप मानत. स्वातंत्र्यानंतर गांधीजींचे स्वदेशीविचार, ग्रामविकास, ग्रामउद्योग, अशा योजनांचा सरकारला विसर पडला मग ग्रामीण भाग दूर्लक्षित होवून अर्थ विषमता व गरिबीत भर पडत गेली. जागतीत खुल्या धोरणामुळे ग्रामीण व कृषी व्यवसाय देशोधडीला लागले.  नैसर्गीक संसाधनाची व श्रमशोषणाची वाढणारी धनीकांची भूक वाढल्याने आज महात्मा गांधीच्या अर्थविचाराची देशहीतास जरुरी आहे !

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...