कोणता व्यवसाय करायचा हे माहीत नसताना सुरुवात कशी करायची?
बिझनेस किंवा उद्योग कसा करावा ? किंवा मुळात सुरुवातच कशी करावी ? हे माहित नसते. काही लोकांना तर माहीतच नसते की, त्यांचा इंटरेस्ट एरिया काय आहे , प्रॉडक्ट कसं ठरवायचं हे सुद्धा माहित नसते, उद्योक सुरू करण्यासाठी किती भांडवल गुंतवावे लागेल माही नसते. त्यामुळे अशा लोकांसाठी एक उद्योक सुरु करण्याचा उत्तम मार्ग सांगणार आहे. आणि मला याची खात्री आहे की तुम्हाला ते नक्कीच आवडेल.
*तुमची आवड कशात आहे ते शोधा:*
तुम्हाला आता असं वाटेल की सगळीच माणसे असं सांगतात की तुमची आवड कशात आहे ते शोधा, पण म्हणजे ते नक्की काय आहे. आपल्याला आवड किंवा आपली रुची ज्या प्रॉडक्ट मध्ये आहे किंवा ज्या बिझनेस बद्दल आपल्याला आत्मीयता वाटते किंवा आपल्याला ते काम करताना बरं वाटतं, आनंद मिळतो त्यामध्ये काम करण्यासाठी हे का शोधणं गरजेचं आहे, तर तुम्ही तसं शोधलं नाही तर बिझनेसमध्ये जेव्हा वाईट वेळ येईल , किंवा तुंगला ग्राहक मिळणार नाही, तुमच्यावर कर्ज येईल. तेव्हा बिझनेसमध्ये अशा गोष्टी होत असताना त्यावेळी तुमच्याकडे सय्यम, प्रेरणा राहिली पाहिजे की, रोज सकाळी उठून परत तेच काम करण्यासाठी त्याच व्यवसायात जाण्याची. जर तुम्ही फक्त पैसे कमावण्यासाठी बिझनेस करत असाल आणि तुमचं त्या बिझनेस मध्ये पॅशन म्हणजे आवड नसेल तर तुम्हाला त्यामध्ये लवकर कंटाळा येईल आणि तो बिझनेस सोडून द्यावासा वाटेल. असं होऊ नये म्हणून तुमची ज्यात आवड असेल, तुम्हाला जे जमत असेल असा बिझनेस शोधा. आणि फक्त तुमची आवड शोधा.
*सेल्स*
अजून बिझनेस सुरु करू नका. बिझनेस सुरु न करता तुम्हाला ते जे आवडत किंवा प्रॉडक्ट जे तुम्ही निवडले आहे, त्या प्रॉडक्टमध्ये जाऊन सेल्स करा. आता सेल्स कसा करणार, आता जे प्रॉडक्ट तुम्ही निवडलत तर ते प्रॉडक्ट तुमचं स्वतःच तर नाही. म्हणून मग तुम्ही तुमचे जे स्पर्धक आहेत त्या व्यवसायामध्ये त्यांच्याकडे जा किंवा तत्सम विकणाऱ्या लोकांकडे तुम्ही नोकरी करा किंवा कमिशन वर सेल्स करा. पण सेल्स करणं अतिशय महत्वाचं आहे. जो पर्यंत तुम्ही सेल्स करत नाही तोपर्यंत तुम्हाला बिझनेस बद्दलच्या मागच्या गोष्टी तुम्हाला समजत नाही. सेल्स जेव्हा आपण करता तेव्हा तुम्ही तुमच्या ग्राहकांसोबत बोलता, आपले ग्राहक काय विचार करतात, तो प्रॉडक्ट का विकत घेतात, त्याची प्राईज पॉईंट काय आहेत, त्यांना काय आवडतं किंवा काय नाही आवडतं या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकू शकता. आणि त्या गोष्टी तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये वापरू शकता. परंतु हे शिकण्यासाठी तुम्हाला कोणी दुसरा व्यक्ती पैसे देतोय करणं तुम्ही त्याच्याकडे सेल्सचा जॉब करत आहात. त्यामुळे दुसरा कोणता जॉब करू नका फक्त सेल्सचा अगदी पगार नाही दिला तरी चालेल किंवा मग तुम्ही पार्ट टाइम हा जॉब करा कारण तुम्हाला त्यातून काही गोष्टी शिकून व्यवसाय सुरु करायचा आहे. परंतु तुम्ही त्या व्यवसायात जाणार आहात त्या व्यवसायाचा, त्या उत्पन्नाचा त्या प्रॉडक्टच्या सेल्सचा अनुभव घेणे खूप महत्वाचं आहे.
*स्पर्धकांकडून शिका*
एकदा तुम्ही सेल्सचा अनुभव घेतलात कि तुम्हाला ते कळेल की ते प्रॉडक्ट तुम्हाला आवडतं की नाही किंवा तो व्यवसाय जमेल की नाही.तुमचं ग्राहकांसोबत बोलणं होईल, त्यांची प्राईज पॉईंट कळतील आणि तुम्हाला मार्केट कसं आहे याचा अंदाज येईल, आणि तुम्हाला आत्मविश्वास येईल की त्या व्यवसायात जायचं की नाही. हे ठरवण्यासाठी तुम्ही त्यासाठी ३ ते ४ महिने एका स्पर्धकाकडे काम करा त्यानंतर पुन्हा दुसऱ्या स्पर्धकाकडे ३ ते ४ महिने काम करा. तिथे तुम्हाला कायमचे काम करायचे नाही. तिथे फक्त अनुभव घ्यायचा. अशाप्रकारे साधारतः वर्षभर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून अनुभव घ्या. आणि त्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेस सुरु करण्यासाठी पूर्णपणे तयार झाला असाल. तुम्हाला कुठल्या कोर्सची आवश्यकता नाही. सुरुवात तुम्हीच तुमची करू शकता.
मला खात्री आहे की, या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या बिझनेसची सुरुवात कराल. निदान कुठून सुरुवात करायची, कशी सुरुवात करायची ते तरी तुम्हाला कळेल. आणि त्यानंतर तुम्ही यशस्वी उद्योजक होण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करायला सुरुवात कराल.
हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि लेख आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
धन्यवाद,
Comments
Post a Comment