बना यशस्वी उद्योजक
पैसा कमावन्या चा व यशाचा कुठलाही शॉर्ट कट नसतो
----------------------------------
. प्रयत्न करणे कधीही सोडू नका
----------------------------------
असे म्हटले जाते की, “यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो.” आणि उद्योजकतेच्या बाबतीत तर हे सोळा आणे सत्य आहे. तर मग असा कुठला एक सद्गुण आहे ज्यामुळे उद्योजक यशस्वी होऊ शकतो? तो आहे चिकाटी. जे करत आहोत तेच करत राहाणे. स्टीव्ह जॉब्सने याचे अगदी योग्य शब्दांत वर्णन केले आहे ते असे, “यशस्वी उद्योजक आणि अयशस्वी उद्योजकांची तुलना करायची झाल्यास अयशस्वी उद्योजकांच्या अपयशाचे मुख्य कारण म्हणजे चिकाटीचा अभाव.”
उद्योजक बनण्याचा निर्णय घेणं हे कठीण काम आहे, पण पटकन यश मिळत नसताना आणि वारंवार अपयशाची चव चाखायला लागूनही त्याच निर्णयाला चिकटून राहणे हे महाकठीण काम आहे. अनेकदा उद्योजक म्हणून काम करताना तुम्हाला अनेक वर्षं तुम्हाला नुसतीच मेहनत करावी लागू शकते, मात्र हातात काहीही येत नाही. त्याचबरोबर अनेक आव्हानांचा, समाजाच्या दबावाचा सामना करावा लागतो. ही आव्हाने तुम्हाला नाउमेद करतात आणि प्रयत्न सोडायला भाग पाडतात. या अशा अडचणीच्या परिस्थितीतून सुद्धा निभावून जायचे असेल तर एकच गोष्ट तुमची मदत करू शकते ती म्हणजे ‘चिकाटी.’
या सर्व संकटांवर मात करण्यासाठी आणि तुमचे उद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी अपयशाने खचून न जाता तुमचे प्रयत्न निरंतर सुरूच ठेवले पाहिजेत. याबतीत नदीचे उदाहरण देता येईल, “नदी सर्व खडकांतून मार्ग काढत पुढे जात राहते, ती शक्तीमुळे नाही; तर सतत पुढे जाण्याच्या वृत्तीमुळे.” म्हणून कधीही प्रयत्न सोडू नका. “मी हे करू शकतो” हा दृष्टीकोन ठेवा आणि अपयशातून शिकत पुढे जात राहा.
Comments
Post a Comment