#तुमची गोष्ट
एक पंचवीस वर्षाचा तरुण एका private compony मध्ये जॉब करत असतो. घरची जेमतेम परिस्थिती- सर्वासारखीचं त्यालाही घरची office ची कटकट ऐकून घ्यावीचं लागत असते- आणि जो महिनाभर पुरेल त्याला पगार म्हणतं नाही.?? त्यामुळे पैशाचीही अडचण येत असते - मनात नेहमी कायतरी मोठं करण्याची - होण्याची अर्थात काहीतरी व्यवसाय करण्याची त्याचीही इच्छा असायची- रोज plan बनवले जायचे- रोज ठरवलं जायचं- मेहनत करायची हिम्मत असते- त्रास अडचणी कितीही असल्या तरीही त्यांना सामोरे जाण्याची सुद्धा तयारी असते -
पण नेहमी सारखे, तुम्हाला जसे पडतात अगदी तसेंच #व्यवसाय कोणता करू ? -कसा करू-? भांडवल उभा कस करू-? व्यवसाय सुरू केला तर तो चालेल का- या आणि अश्या कितीतरी प्रश्नांचा नुसता खेळ त्याच्या मनात चालू असायचा- दिवस तर जात होते मात्र होत काहीचं नव्हत- काय करायचं माहीत असल तरी सुरवात कुठून करावी याबाबत मनात संभ्रम असायचा....
एक दिवस जॉब सुटल्यावर घरी निघाला होता - घरी बायकोचा वाढदिवस असतो-ती वाट पहात होती- याला अगोदरच उशीर झाला होता- त्यात रस्त्यावर ट्रॅफिक असल्यामुळे अजूनचं उशीर होत होता - बायकोचे सारखे फोन चालू होते - आपल #आयुष्य बहुतेक असच ट्रँफिकमध्ये - संसार-बायको-पोरं- घर या सगळ्यांना adjust करत जाइलं अशी भीती त्याच्या मनात घोळत होती - इतक्यात सहज त्याच्या मनात विचार आला ट्राफिक तर खूप आहे सरळ मार्गांने गेलो तर खूप उशीर होईल -आणि आपण असच उलट दिशेने गेलो तर घरी लवकर पोहचू शकतो मात्र त्यात risk होती - accident ची भीती होती - पण आपण जर risk घेऊन-न घाबरता उलट दिशेने अर्थात प्रवाहाच्या उलट दिशेने जर जाण्याचं धाडस दाखवलं तर घरी नक्की लवकर पोहचवू शकतो - आणि त्याने गाडी फिरवली - गाडी चालवताना डोळ्यावर lights चमकत होत्या - खूप जपून गाडी चालवावी लागत होती - लक्ष फक्त समोरच द्याव लागत होतं- त्यात काही लोक ओरडत सुद्धा होते -पण याने कसलीही पर्वा न करता फक्त आपली वाट धरली होती आणि तीही प्रवाहाच्या उलट - थोडा त्रास झाला पण हा वेळेत घरी पोहचला - घरी सर्वाना आनंद झाला -
रात्री झोपताना सहज याच्या मनात विचार आला अरे आपण जर उलट दिशेने गाडी चालवली नसती तर वेळेत पोहचलो नसतो - आणि घरी पुन्हा रोजचीचं कटकट ऐकून घ्यावी लागली असती - त्याला लगेच क्लीक झालं- त्याने ठरवलं - उद्या पासून job सोडून द्यायचा खर तर उद्या नाही आता पासुनचं - आणि त्याने एक छोटासा व्यवसाय सुरु केला - सुरवातीला त्रास झाला - अडचणी आल्या- घरच्यांनी विरोध केला - शेजाऱ्यांनी नावे ठेवली - समाजातील काही उचल्यानी नाहक त्रास दिला पण हा थाबला नाही - कुठ घाबरला नाही - कुठ अडकला नाही - आपला काम करत राहिला वेळेनुसार-वेळेप्रमाणे बदलत गेला आणि पुढे चालून मोठा उद्योजक झाला - मग सगळे त्याला मानसन्मान द्यायला लागले - घरी दारी त्याचं कौतुक होत असायचं - ज्यांनी त्याला त्रास दिला दमदाटी केली आता तेचं त्याला गणपतीसाठी आपली जुनी ओळख आहे अस बोलतं जयंतीची वर्गणी मागण्यासाठी त्याच्या ऑफिसवर जात असायचे -
हे सगळ का घडल माहित आहे का - त्यादिवशी घरी लवकर येण्यासाठी रस्त्याच्या उलट दिशेने त्याने गाडी चालवताना समजल कि, काहीतरी मोठ्ठ करायचं असेल तर - #प्रवाहाच्या उलट दिशेनेच प्रवास करावा लागतो - risk घ्यावीचं लागते - #धाडस करावचं लागतं - लोक नाव ठेवतील - घरचे विरोध करतील - कोणीतरी आडवं येईल असचं काहीतरी करावं लागतं तरच घासून घासून आपण #यशस्वी होऊ शकतो - आपल्याला समाजात प्रतिष्ठा मिळत असते - तरच आपला गाजावाजा होऊ शकतो -
मित्रानो गोष्ट छोटी आहे काल्पनिक आहे परंतु डोळे खाटकन उघडणारी आहे - कितीतरी तरुणाची अशीच अवस्था सध्यपरिस्थिती मध्ये आम्हाला दिसायला मिळत आहे
Comments
Post a Comment