कुठंय #मुंबई आणि कुठंय #मराठीमाणूस -❓❓
प्रत्येक मराठी माणसाने हा प्रश्न स्वतःला विचारावा - आम्हाला विश्वास आहे उत्तर काहीचं येणार नाही- कारण मुंबई मध्ये तुमची स्वतःची जागाचं शिल्लकचं कुठं राहिली नाही -
प्रश्न विचारला जातो - मुंबई कोणाची आहे ❓❓ भाबडे मराठी लोक जे कुठ घर - संसार चालवावा म्हणून #नोकरी करत असतात - काही झोपडपट्टीत राहत असतात - काही एखाद्या पक्षाचे संघटनेचे नेत्याचे कार्यकर्ते असतात , अशी लोक म्हणतात, मुंबई आमची आहे - आणि आमचीचं राहणार परंतू प्रत्येक्षात काहीचं नसतं - मुंबई आपली राहिलीचं नाही - हो जरी तुम्हाला पटतं नसलं तरी हेचं परखड असं सत्य आहे -
मग का - कशी - कोणामुळे - गेली असावी मुंबई आपल्या हातून - आमच ठाम - स्पष्ट आणि ठोक मत आहे - मुंबई तुमच्या आमच्या हलगर्जीपणामुळे हातून गेली - आपल्याला "त" म्हणता ताक कळालचं नाही - आपला फक्त वापर झाला - भावनेचा नुसता खेळ झाला - बाजार झाला - भामट्यांनी आपलं आपलं भागून घेतलं आणि तुम्ही आम्ही केवळ पाहत राहिलो हाती धुपाटनं घेऊन - आणि आजही आपण फक्त कोणाच्या तरी हाताचे बाहुलेचं तर आहोत - कुठय मग आपला #स्वाभिमान ?? कुठ गेला आपला #मराठीबाणा ???
लक्षात घ्या ,, हाणामारी करून - हातात दगड विटा घेऊन - मुंबई तुमची होणार नाही - मुंबई तेंव्हाचं तुमची होईल जेंव्हा तुम्ही कष्ट करणार - मेहनत घेणार - परिश्रम करणार - छोटा जरी असला तरी स्वतःचा एखादा हक्काचा व्यवसाय सुरु करालं -
इतिहास साक्षीला आहे, इंग्रजांनी केवळ व्यापाराच्या ताकदीवर अवघ्या जगावर राज्य केल होतं आणि त्याचं इंग्रजांना आपल्या छत्रपतींनी मुठ भर मावळ्यांना सोबत घेऊन धूळ चारली होती - आणि #छत्रपतीशिवाजीमहाराज हे अगोदर #उद्योजक होते मग ते राजा झाले आणि त्यानंतर ते छत्रपती होऊ शकले - एवढी ताकद उद्योजकते मध्ये होती आहे आणि असते आणि त्याचं शिवरायांचा वारसा सांगणारे तुम्ही आम्ही मुंबईतून बाहेर फेकले जात असू तर आपल्याला शिवरायांचा वारसा सांगण्याचा खरोखर अधिकार आहे का -??? हा सवाल हर एक मराठी माणसाने स्वतःला विचारण्याची वेळ उभी ठाकली आहे.. अस आम्हाला वाटतं ....
मी कोणता नेता नाही किंवा कोणता पुढारी नाही त्यामुळे तुम्हाला आव्हान करनार नाही तर तुम्हाला हाक देतोय - चला मिळून आपण मुंबई मध्ये शिवरायांच्या विचाराने आणि प्रामाणिक कष्टाने - मराठी माणसाची ताकद उभी करू -
फक्त तुम्ही तुमच्या हिमतीवर शिवरायांचे वारसदार म्हणून छोटं असल तरी
स्वतःचं उद्योजक साम्राज्य उभ करावं हाच आमचा थोडा फार हेतू ......"
-
Comments
Post a Comment