Skip to main content

#आपली किंमत कशी वाढवाल ?....

*व्यवसाय कसा करावा?...*
किंवा ...
*आपली किंमत कशी वाढवाल ?*
👇🏽
न्यूयॉर्कच्या ब्रूक्लीन प्रांतातल्या झोपडपट्टीत मायकेल जॉर्डनचा जन्म झाला त्याला चार बहिणी होत्या आणि त्यांच्या वडिलांची कमाई संपूर्ण कुटुंबासाठी पुरेशी नव्हती
त्यांचे शेजारी पण खूप गरीब होते. तिथल्या वातावरणात मायकेल जॉर्डनला त्याचे भविष्य अंध:कारमय दिसत होते.
           आत्मचिंतनात हरवलेल्या मायकेलला त्याच्या वडिलांनी पाहिले  आणि त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.
          १३ वर्षाच्या जॉर्डनला वडिलांनी वापरलेल्या जुना एक कपडा दिला आणि त्याला विचारले "हा कपडा किती किमतीचा असेल?"
       जॉर्डन उत्तरला "असेल १ डॉलरचा" वडील म्हणाले, "याला तू कुणाला तरी २ डॉलरला विकू शकशील का?"
     "हा जर २ डॉलरला विकलास तर आपल्या कुटुंबासाठी ती खूप मोठी मदत होईल"
      जॉर्डनने डोके खाजवले आणि म्हणाला, "मी प्रयत्न करतो पण यशाची खात्री देऊ शकत नाही"
     जॉर्डनने कपडा स्वछ धुतला, उन्हात वाळवला. त्याच्याकडे इस्त्री नव्हती, म्हणून त्याने तो कपडा अंथरुणाखाली ठेवला. दुसऱ्या दिवशी एका गर्दीच्या ठिकाणी कपडा विकायला घेऊन गेला.
     ५-६ तासांच्या प्रतीक्षेनंतर एका गिर्हाईकाने तो कपडा जॉर्डन कडून २ डॉलरला विकत घेतला. जॉर्डन आनंदाने धावतच घरी आला.
     १० -१२ दिवसांनंतर त्याचे वडील म्हणाले, "जे कापड तू २ डॉलरला विकलेस त्याला १० डॉलर किम्मत येईल का रे?"
     जॉर्डन म्हणाला "कसं शक्य आहे? २ डॉलर मिळताना नाकी नऊ आले"
      वडील म्हणाले "प्रयत्न तरी करून बघ"
खूप वेळ विचार केल्यानंतर जॉर्डनला आयडिया सुचली. त्याने त्याच्या चुलत भावाच्या मदतीने जुन्या धुतलेल्या कापडावर डोनाल्ड डक आणि मिकी माउस ची चित्रे रंगवली, आणि ज्या शाळेत श्रीमंत मुलं शिकतात अशा शाळेच्या बाहेर शाळा सुटण्याच्या वेळेत जाऊन कपडा विकायला उभा राहिला.
       एका मुलाला ती चित्रे असलेला कपडा खूप आवडला. त्याने आई जवळ कडून हट्ट करून तो कपडा जॉर्डन कडून १० डॉलरला विकत घेतला. शिवाय आईने जॉर्डनचे कौतुक केले आणि अजून १० डॉलर त्याला टीप दिली.
       २० डॉलर ही मोठी रक्कम होती, जवळ जवळ त्याच्या वडिलांच्या महिन्याच्या पगारा इतकी.
जेंव्हा जॉर्डनने वडिलांना २० डॉलर दिले आणि ते त्याला कसे मिळाले याची कहाणी सांगितली तेंव्हा वडील आनंदले आणि अजून एक वापरलेला कापडा त्यांनी जॉर्डनला दिला आणि म्हणाले, "हा कपडा तू २०० डॉलरला विकू शकशील का?"
      आता यावेळी जॉर्डनने वडिलांचे चॅलेंज कुठलेही आढेवेढे न घेता आत्मविश्वासाने स्वीकारले.
       २-३ महिन्यानंतर सुप्रसिद्द चित्रपट  "Charlie's Angels" ची  नायिका Farah Fawcett न्यूयॉर्क मध्ये तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली. प्रेस कॉन्फरन्स नंतर जॉर्डन सुरक्षारक्षकां मार्फत
      तिच्यापर्यंत पोहोचला आणि त्याने तिला कापडावर सही करण्यासाठी विनंती केली.
      त्याचा निरपराध चेहरा पाहून तिने लगेचच कापडावर सही केली.
      आता जॉर्डन मोठमोठ्याने ओरडू लागला, "Miss Farah Fawcett ने सही केलेले कापड घ्या, Miss Farah Fawcett ने सही केलेले कापड घ्या"
         थोड्याच वेळात ते कापड त्याने ३०० डॉलरला विकलं.
         तो जेंव्हा घरी आला आणि सर्व हकीकत वडिलांना सांगितली आणि
३०० डॉलर त्यांच्या हातात दिले, तेंव्हा वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, "मला तुझा अभिमान आहे, तू करून दाखवलस"
        रात्री जेंव्हा जॉर्डन वडिलांच्या शेजारी झोपला तेंव्हा वडिलांनी जॉर्डनला विचारले, "बाळा, तीन जुने कपडे विकण्याच्या अनुभवातून तू काय शिकलास?"
जॉर्डन म्हणाला, "जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो"
          वडिलांनी त्याला घट्ट जवळ घेतले आणि म्हणाले, "तू जे सांगतोस ते काही चूक नाही, पण माझा हेतू वेगळा होता. मला तुला दाखवून द्यायचं होतं की, ज्या जुन्या कपड्याची किंमत १ डॉलर सुद्धा नाही त्याची किंमत आपण वाढवू शकतो, तर बोलणाऱ्या,  चालणाऱ्या, विचार करणाऱ्या माणसांचं काय?"
      "आपण काळे सावळे असू किंवा गरीब असू, आपली किंमत पण वाढू शकते"
        वडिलांच्या या वाक्याने जॉर्डन खूपच प्रभावित झाला.
        *वापरलेल्या जुन्या कापडाला जर मी प्रतिष्ठा देऊ शकतो, तर स्वतःला का नाही* ? स्वतःला कमी पणा घेण्यात काहीच हित नाही.
        त्यानंतर जॉर्डनला वाटू लागलं, की माझं भविष्य खूप सुंदर आणि उज्वल असेल.
       काही वर्षांनी *मायकेल जॉर्डन* उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू बनला.

*स्वत:वर विश्वास ठेवा।*
*सबसे बड़ा रोग,क्या कहेंगे लोग।*
👍👍👍👍👍👍👍👍

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...