Skip to main content

संयमाचा अभाव*

*संयमाचा अभाव*
गुंतवणूक करणे सोपे नाही.

- वारेन बफे यांनी असा का म्हटलं असेल ..❓

*कारण* ,
गुंतवणुकीचे फायदे आज नाही,
*अनेक वर्षांनी मिळतात*.

गुंतवणूक करायला माणसाला शिस्त लागते.

आपल्याला शाळेत कधी *श्रीमंत कसे व्हावे* हा विषय शिकवला का ❓
मग शाळेतून बाहेर पडल्यावर आपण गुंतवणुकीबद्दल शिकायला काय मेहनत घेतली ⁉

पैसे कसे कमवायचे यासाठी आपण बहुतेक लोक किमान १५ वर्ष तरी शिकलो.
पण ,
कमावलेले पैसे कसे गुंतवूण मोठे करावे, ह्याचा किती दिवसांचा अभ्यासक्रम आपण केलाय ?⁉

फक्त,
*ही पोस्ट वाचून तुम्ही श्रीमंत होणार नाही.*

🎯 गुंतवणूकदार व्हायला तुम्हाला स्वतःला, स्वतःवर काम कराव लागेल.
स्वतः काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील.
काही चुकीच्या गोष्टी सोडून द्याव्या लागतील.

ह्या *गोष्टी* सर्व लोक *करू शकतात* .
पण करत नाही.
त्यामुळेच फक्त *थोडे लोक श्रीमंत आहेत*.

समजा ,
आज तुम्ही २०,००० चे जागी ३०,००० चा 📺 घेतला तर तुम्हाला वाटेल काय झाल ???
फक्त १०,००० च जास्त गेले ना ❓
पण ,
वारेन बफे असा विचार करत नाहीत,
तर ते असा विचार करतात कि,
हे १०,००० भविष्यात किती झाले असते..⁉
माझ नुकसान तेवढ झाल आहे.
म्हणजे ,
आज गमावलेले १०,००० हे भविष्यातील :
- सोन्यात गमावलेले ७२,०००,
- F.D  मध्ये ०.९९ लाख,
- POST F.D मध्ये १.०७ लाख,
तर ,
- सेन्सेक्स मध्ये २.३८ लाख .

पैसे खर्च करताना जर का विचार केला कि हे पैसे गुंतवले तर किती मोठे होतील ❓
तर ,
फालतू खर्च करणे बंद करणे सोपे होईल.

आपण नको असलेल्या गोष्टी घेतो,
आपल्याकडे नसलेल्या पैश्यातून,
आपल्याला नको असलेल्या लोकांना प्रभावित करण्यासाठी.

- *Nilima Ghadge

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...