येथील प्रगतशील शेतकरी मंदाताई बाबासाहेब चव्हाण यांना केंद्र सरकारच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने कृषी विज्ञान केंद्र माध्यमातुन प्रसारभारती दुरदर्शनच्या वतीने प्रगतशील महिला शेतकरी पुरस्कार 2018 जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती प्रसारभारती दुरदर्शन महानिर्देशनालयाचे अतिरिक्त संचालक आलोक अग्रवाल यांनी पत्राद्वारे दिली.
देवळाली प्रवरा येथील प्रगतशील शेतकरी मंदाताई बाबासाहेब चव्हाण यांच्यासह नगर जिल्हयातील 3 महिला शेतक-यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील एकुण 5 महिला शेतक-यांना पुरस्कार घोषित करण्यात आला असून त्यामध्ये नगर जिल्हयातील देवळाली प्रवरा, संगमनेर, निमगांवजाळी, बारामती, पुणे येथील महिला शेतक-यांचा समावेश आहे.
महिला शेतकरी या भारतीय कृषी विभागाच्या प्रमुख आधारस्तंभ आहे, परंतु दुर्देवाची गोष्ट अशी की, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महिला शेतक-यांच्या योगदानाची दखल घेतली जात नाही. याची दखल घेऊन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातुन व प्रसारभारती किसान वाहिनीने महिला शेतक-यांच्या मुलाखती घेऊन प्रसारीत केल्या होत्या. त्या माध्यमातुन भारतातुन एकुण 114 प्रगतशील महिला शेतक-यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या प्रगतशील शेतकरी महिलांना दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते लवकरच पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...
Comments
Post a Comment