उधारी : पैसे वसूल कसे होतात ?
....
.....
धंदयात पैसा घेणे आणि वस्तू देणे हा नौर्मल व्यवहार , पण वस्तूच्या बदल्यात फक्त. काही दिवसांनी पैसे मिळण्याचे आश्वासन म्हणजे ... "उधारी".
.....
या उधारीला समजून घेतले पाहिजे , फक्त राग - राग करून उपयोग नाही तर याचे विस्तृत Analysis करायला पाहिजे , जेणेकरून या संदर्भात उपाययोजना करायला मदत होईल .
. धंदयात पैसा हा ऑक्सीजन सारखा असतो , तो जर कमी पडला तर धंद्याचा श्वास गुदमरतो , चिडचीड , अपमान , सहन करावा लागतो .
तर ....
1) आपण उधारी का देतो .
__.... 1] आपल्याला ग्राहक संख्या वाढवायची असते , कशासाठी ???
दुकानात आणलेला मालावर नफा मिळवण्यासाठी ... बरं तो माल दुकानात राहिला तर काय सडणार आहे काय ? मग घाई कशाला करायची .
........... 2] सहानुभूती दाखवण्यासाठी .... किंवा माझ्याकडून थोडीशी मदत म्हणून, उधार देता आणि बुडत्याचा पाय खोलात सारखं गमावून बसता भांडवल .
............3] कधी - कधी मोठी एर्मजन्सी असते , अशा वेळी आपण सहजस उधार देऊन जातो .
............4] आपल्याला आपल्या स्पर्धकाला दाखवयचं असतं कि , माझ्याकडे किती ग्राहक आहेत ? आणि त्या मोठेपणा दाखवण्याच्या नादात उधार - पाधार वाटून मोकळे होतो आणि आर्थिक अडचणीत येतो.
......
2) आपण उधारी कोणाला देतो ????
......... आपण कोणालाही उधार देत नाही , काहीतरी अगोदरचे बंध असल्याशिवाय
आपण कसे उधार वाटू ???
...........1] मित्र परिवार
............2] नातेवाईक , भावकी , किंवा नातेवाईकांचे नातेवाईक
............3] शेजारी , किंवा नुकतीच ओळख झालेले लोक .
यापैकीच कोणाला तरी आपण उधारी देतो . आणि ठरलेल्या वेळेत त्यांचे कडून पैसा आला नाही कि उधारी तटली असे आपण म्हणतो !
......
आता एकदा का उधारी दिली कि हातात काय रहातं ?
काहीही करून आपले पैसे वापस मिळवणे ... हाच मुख्य हेतू रहातो
तसे पाहता बऱ्याचदा वेळेवर पैसे देतात पण काही जरा जास्तच "पक्के" असतात .
पण बऱ्याचदा असे घडते कि , परिस्थिती हाताबाहेर जाते , भांडणं होतात , मारामारी होते . आणि डोकी पण फुटतात .
मग अशा वेळी काहीही करून रिकव्हरी करणेच आपले लक्ष असते , पण अशा रिकव्हरी करताना काही काळ ज्या घ्याव्या लागतातच .
.....
.....
काय घ्याव्या काळजी ?
.........1] सरळ सरळ साध्या शब्दात formal मागणी करावी
..........2] व्यक्ती समोर येतच नसेल तर ... साधारण कॉल करणे किवा Text करावे .
..........3] समोरच्या व्यक्तीच्या घरी माणूस पाठवणे , आणि formal मागणी करणे .
..........4] कधीही फोनवर , किंवा व्हाट्स अप वर हिंसात्मक भाषा / शिवराळ भाषा वापरू
नये .
5] कौल रेकॉर्डिंग होऊन उगाचच अडचण वाढू शकते
6] कधीही समोरच्याच्या पाहुण्या समोर , नातेवाईकांसमोर किंवा इतर त्रयस्थ व्यक्ती समोर पैशाची मागणी करूच नये , त्यामुळे असा अपमान जिव्हारी लागून वेगळ्या प्रकारे बदल्याची भावना बाळगू शकतात .
7] अॅडव्हान्स चेक घेऊन किंवा बिलावर ग्राहकाची सही घेऊन त्याची कॉपी जवळ ठेवली त तर पुढे फायदा होईल .
8 ] रिकव्हरी साठी समोरच्याने चेक , DD , pay tm , चिल्लर , दहाच्या नोटा , काहीही ऑप्शन दिला तरी तो स्विकारावा .
9] Recovery Agent हा प्रकार सगळ्यात शेवटी च वापरावा किंवा वापरणे टाळावेच
10] सगळ्यात चांगला प्रकार म्हणजे एखादया प्रतिष्ठीत व्यक्तीस मध्यस्थी घालून , आपला दगडाखाली अडकलेला हात काढून घेणे .
11] आणि सगळ्यात शेवटी शक्यतो उधारी देणे पूर्णपणे थांबवणे , दोन पैसे कमी आले तरी चालतील , माल दुकानात पडून राहीला तरी चालेल , उधारीला लांबूनच राम राम .
......
..... शक्यतो साधारण follow up केला तरी लोक त्यांची अडचण संपली कि , पैसे देतातच त्यामुळे आक्रमक न होता . सातत्याने follow up ठेवावा .
कधीच कोणाचा पैसा बुडत नसतो , फक्त वेळ कमी जास्त लागू शकतो .
संयम ठेऊन वसूली करावी !
....
...
शुभेच्छा .
Comments
Post a Comment