🔰 शेअर मार्केटमधील सेगमेंट
📝 कँश सेगमेंट - शेअर मधील गुंतवणूकीचा पहिला व अत्यंत महत्वाचा प्रकार म्हणजे कँश सेगमेंट हा आहे. तुम्ही जेव्हा कँश देवुन त्याचे पुर्ण शेअर्स खरेदी करता तेव्हा त्याला कँश सेगमेंट असे मार्केटमध्ये म्हणतात. यालाच शेअर्स डिलीव्हरी असेही म्हणता येइल. याप्रकारे घेतलेले शेअर्स कधी घ्यावे व कधी विकावेत हे पुर्ण गुंतवणुकदाराच्या इच्छेनुसार आहे. एखादे चांगल्या कंपनीमध्ये दहा ते पंधरा वर्ष सुध्दा ठेवता येतील.
📝 इन्ट्राडे /पोजिशन - यामध्ये व्यक्ती एखाद्या दलालाप्रमाणे वर्तणुक करते जसे कि एखादा शेअर्स स्वतःकडे खरेदी करू शकते असे दाखवते व ते शेअर्स चांगली किंमत आल्यावर विकुन टाकते. अर्थातच शेअर्स मध्ये पोजिशन तयार केली असे म्हणतात. याप्रकारची वर्तणुक करणाऱ्यांना ट्रेडर्स म्हणतात. असे अनेक ट्रेडर्स रोजच्या मार्केटमध्ये असतात म्हणुन शेअर्सच्या किंमती प्रत्येक पाच ते दहा सेकंदाला बदलतात.
📝 डेरिव्हेटीव/ कॉन्ट्रक्ट मार्केट - या मार्केटला भविष्यातील मार्केट म्हटले तरी चालेल. कारण यामार्केटच्या किंमती भविष्यातील अपेक्षा व निराशा यावरच चालु असते. ज्याप्रमाणे भविष्याचा विचार करून आताच्या किंमतीलाच एखादा शेअर् खरेदी करून ठेवतो व भविष्यात त्या शेअर्स ची किंमत वाढल्यानंतर आपल्याला फायदा. सेबीने सर्वाना डेरिव्हेटीव मार्केटमध्ये दोन पर्याय दिलेले आहेत पहिला फ्युचर कॉन्ट्रक्ट व दुसरा ऑप्शन कॉन्ट्रक्ट. याबद्दलची माहिती पुढील भागात जाणुन घेऊया.
Comments
Post a Comment