Skip to main content

माझी शेअर्स मार्केट मध्ये येण्याआधीची मानसिकता

⛳*पोस्ट संपूर्ण वाचा*⛳

माझी शेअर्स मार्केट मध्ये येण्याआधीची मानसिकता

2006 साली माझे B.A मुंबई युनिव्हर्सिटी झाले आणि मला बँक मध्ये छोटेसे काम मिळाले त्या वेळी मला महिना पगार 2500 भेटत होता त्या पैशात माला माझे घर चालवायचे होते पन माझा खर्च कमी असल्या कारणाने मला ते पैसे ठीक वाटत होते परंतु कालांतराने मला तो पगार कमी वाटू लागला कारण दिवसेंदिवस माझा खर्च वाढत होता काय करावे कळत नव्हते डोक्यात आनेक विचार चक्र चालु झाले होते काय करावे कळत नव्हते दुसरे काम पाहावे की अजुनी काय करावे दुसरे काम पाहिले तरी माझा खर्च वाढणार होताच आणि मला कामा मध्ये बदल केला तरी जास्त पगाराची नोकरी मिळेल ह्याची ही काही शाश्वती नव्हती कारण माझे इंग्लिश वरती प्रभुत्व नव्हते म्हणून तो जॉब मी त्याच पगार मध्ये करु लागलो माझ्या कामा वरती माझे बॉस (वरिष्ठ ) खुश होते त्या मुळे ते माझ्याशी खूप चांगले मित्रा सारखे राहात होते
एकदा मी दुपारी शांत पणे बसलो होतो बाजुला येऊन माझे बॉस बसले तेवढ्यात त्यांना फोन आला ते फोन वरती बोलत असताना मी ते काय बोलत आहेत ते मी लक्ष्य देऊन समजून घेत होतो, मार्केट वरती आहे माझे स्टॉक विकून टाक आणि प्रोफीट बूक कर कारण मार्केट खाली जाऊ शकते आपल्याला 2 दिवसात 7500 फायदा झाला म्हणजे खूप चांगला फायदा झाला आहे असे बोलत होते त्यांनी फोन ठेवला आणि माझ्या तिथून निघून गेले मी विचार करु लागलो 2 दिवसात 7000 मला ती खूप मोठी रक्कम वाटत होती कारण मी एक महिना काम करतो त्या वेळी मला 2500 भेटत होते आणि ह्यांना 2 दिवसात 7500 एवढी मोठी तफावत.
माझ्या डोक्यात आता खऱ्या अर्थाने मार्केट बदलचे चक्र विचार चक्र चालु झाले होते ,असे नक्की ह्यांनी काय केले की 2 दिवसात 7500 माला समजायला मार्ग नव्हता एक महिना मला ही गोष्ट सतावत होती पन उत्तर मिळत नव्हते एक दिवशी सकाळी ऑफिस मध्ये मी चहा पीत होतो तेवढय़ात माझे बॉस तिथे आले आणि माझ्या बरोबर कामा बदल बोलत होते तेवढय़ात त्यांना मोबाईल वरती फोन आला ते  समोरचा वेक्ति काय बोलत होता त्याला ते फक्त हा हा करुन उत्तर देत होते मला समजले होते ते मार्केट बदलच बोलत आहेत फोन वरती बोलून झाल्या नंतर ते मला बोलले श्रीकांत थोड्या साठी घोळ झाला नाहीतर आज मला जबरदस्त फायदा झाला असता पन मी लवकर बाजूला झालो मी त्यांना लगेच विचारले कुठे बाजूला झालात आणि कसला फायदा झाला असता त्या वेळी ते मला बोलले आरे मार्केट मधून स्टॉक घेतला होता तो खूप वरती गेला पन मी तो स्टॉक लवकर विकला त्या मुळे मला थोडाच फायदा झाला मी विचारले तरी पन किती झाला फायदा त्या वरती ते बोलले 17000 हजार च्या आसपास फक्त फायदा झाला माझे डोळे एकदम चक्रावले........
मी त्यांना विचारले सर मला पन शिकवाना मार्केट मध्ये कसे काय करतात ते, त्या वेळी ते बोलले शिकवतो पन वेळ लागेल आणि लवकर समजणार नाही कारण मार्केट येवढे सोपे नाही आणि मेहनत घेतली तर अवघड सुधा नाही मी त्यांना बोललो चालेल पन मला शिकायचे आहे शेअर्स मार्केट. त्या आधी मला सांगा की माझ्या कानावर बऱ्याच वेळा आले आहे की शेअर्स मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करणारे लोक काही दिवसांनी घरदार विकून रस्त्या वरती येतात ते मोठय़ाने हसायला लागेल मला बोलले श्रीकांत मार्केट मध्ये दिवसाला शेअर्स घेणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे कमीत कमी दिवसाला 50 लाखाच्या वरती लोक शेअर्स घेतात आणि विकतात मग त्यांनी जर घरदार विकले तर आपल्या देशात सर्वच रस्त्यावर दिसले असते ..... असे काही नसते तू मार्केट  समजून घेतलेस तर खूप फायद्याचं आहे आरे ज्या लोकांनी 25 वर्षा पूर्वी मार्केट मध्ये 10000 रुपये गुंतवून ठेवले आहेत काही शेअर्स मध्ये त्यांच्या पैशाचे आता करोडो रुपये झाले आहेत थांब तुला एकादा मी मा़झ्या ब्रोकर च्या ऑफिस मध्ये घेऊन जातो आणि दाखवतो मार्केट मध्ये कसे काय करतात आणि 1 सेकंदाला किती लोक शेअर्स ची खरेदी विक्री करतात ते.  पन तुला त्याच्या साठी एक दिवस सुट्टी घ्यावी लागेल मी लगेच हा बोललो त्यांनी मला पुढच्या आठवड्यात गुरुवारी जाऊ आसे बोलले मी आता फक्त गुरुवार ची वाट पाहात होतो आर्जुनला जसा पक्ष्यांचा डोळा दिसत होता तसा मला फक्त गुरुवार दिसत होता..... मार्केट बघायला भेटणार म्हणुन मनात खूप आनंद झाला होता गुरुवार ची वाट बगत बगत गुरुवार आला ठरल्या प्रमाणे मी सरांना सीएसटी स्टेशनला भेटलो सकाळी 9 वाजले होते आम्ही तिथून पटापट चालत एकदासे ब्रोकरच्या ऑफिस मध्ये पोचलो मार्केट ओपेन होणार होते त्या पूर्वी तिथे जमलेले बहुतांश लोक गुजराथी होते ते आप आपसात गुजराथी मध्ये बोलत होते माझे सर पन गुजराथी होते परंतु त्यांचे मराठी भाषेवरही चांगले प्रभुत्व होते ते माझ्याशी मराठीतच बोलायचे मी त्या ठिकाणी सर्वांनकडे कावरा बावरा  होऊन बगत होतो ते बोलत होते ते ऐकत होतो पन ते nifty, सेंसेक्स, स्टॉप लॉस, target, आशे बरेच शब्द बोलत होते मला त्याच्यातील काहिच समजत नव्हते मी फक्त त्यांच्याकडे पाहात होतो तेवढय़ात सर्वांचा गोंधळ झाला फोन वाजू लागले मला कळाले मार्केट चालु झाले आहे  मी त्या ठिकाणी उभा होतो त्या ठिकाणा वरून मला कम्प्युटर  दिसत नव्हता म्हणून मी सरांना बोललो सर मला काही दिसत  नाही सर बोलले श्रीकांत थांब थोड्या वेळाने ह्याच्यातले बरेच जण जातील तेव्हा तुला कम्प्युटर च्या जवळ बसायला जागा करुन देतो मला जागा मिळायला 12:30 वाजले आता मी कम्प्युटर जवळ बसून बगत होतो पन मला काय करत होते काय चालले आहे काही कळायला मार्ग नव्हता फक्त कम्प्युटर वरती काजवे चमकतात त्या प्रमाणे आकडे बादली होताना दिसत होते त्या पूर्ण दिवसात फ़क्त आकडे  बादली होताना समजले बाकी सर्व डोक्याच्या वरून गेले आम्ही तिथून 3 वाजता निघालो मला सरांनी विचारले श्रीकांत पाहिलेस का मार्केट काही समजले का मी त्यांना बोललो नाही काही नाही समजलो , त्यांना मी विचारले सर मार्केट इंग्लिश सोडून आणखी कोणत्या भाषेत असते ते बोलले हिंदी आणि गुजराथी आणि इंग्लिश मध्ये फक्त आस्ते मराठी मध्ये नसते का मला इंग्लिश येत नाही सर बोलले मार्केट शिकायचे आसेल तर इंग्लिश आले पाहिजे मराठी मध्ये कोण शिकवणारे नाही तुला काही प्रश्ण असतील तर माला विचारत  जा मी तुला मराठी मध्ये सांगत जाईन....
त्या रात्री मला झोप आली नाही कारण मला मार्केट कसे समजेल त्याचा विचार मी करत होतो आणि मनाशी चगच बांधला होता काहीही झाले तरी शेअर्स मार्केट शिकायचे.......
आणि एक एक गोष्ट खोलवर जाऊन शिकायची..,....
उद्या सरांना सांगायचे की मला पन शेअर्स विकत घ्यायचे आहेत मी माझा प्रश्र्न उद्या साठी तयार ठेवला होता उत्तर काय आसेल काही कल्पना नव्हती फक्त उत्तर मोठे असणार तेवढा अंदाज होता.......

टीप:  1) सपूर्ण इंडिया मध्ये फक्त 4% लोकच शेअर्स मार्केट मध्ये आहेत बाकीचे अजुनी FD आणि सेविंग A/C आणि मध्ये आहेत
2) अमेरिका किवा इतर प्रगतीशील देशात 80% लोक मार्केट मध्ये आहेत

बाकी आपण पुढच्या आठवड्याच्या पोस्ट मध्ये account काढण्यासाठी काय काय लागते काय करावे लागते आणि काय काळजी घ्यावी लागते ते पाहू.....

धन्यवाद......

ठरल्या प्रमाणे मी सरांना विचारले सर मला सुद्घा मार्केट मध्ये पैसे टाकायचे आहेत काय करावे लागेल सर बोलले की पैसे आसेच नाही टाकू शकत त्या साठी तुला account काढावे लागेल मग तुला शेअर्स वगेरे घेता येतील मी सरांना बोललो की अकाऊंट आहे ना माझे पाहिलेच आपल्या बॅंक मध्ये सरांनी विचारले की कोणते अकाऊंट आहे मी बोललो की माझा पगार येतो ना त्या अकाऊंट मध्ये ते आहे माझ्या कडे ते हसून बोलले की श्रीकांत ते सेविंग अकाउंट आहे त्याच्यात पैशाची लेन देन केली जाते त्याच्यात तुझे शेअर्स कसे काय घेणार त्याच्यात नाहीत शेअर्स घेता येत त्याच्या साठी वेगळे accounts असते आणि हो ते ही a/c गरजेचे आहे आपल्याला मार्केट साठी आणि दुसरी 2 A/C लागतील एक ट्रेडिंग (treding a/c आणि दुसरे damat a/c मी बोललो की damat अकाऊंट नसेल तर चालणार नाही का ते काढावेच लागेल काय ते हो बोलले काढावे लागणारच त्याचा उपयोग काय आणि ते कशाला पाहिजेत आणि त्या दोन a/c ची नक्की मार्केट मध्ये भूमिका काय सरांनी समजून सांगतले पन नेहमी प्रमाणे डोक्यावरून गेले माझ्या त्याचे हि तसेच कारण आहे की त्यांनी मला सांगताना प्रोफेशनल भाषेत सांगितले त्या मूळे मी समजू शकलो नाही मला माहित आहे की आपल्या पैकी बऱ्याच लोकांनी  पुस्तकातून वाचून मार्केट समजून घेण्याचा प्रयत्न ही केला असेल परंतु समजू शकले नसतील कारण बहुतेक पुस्तकातील भाषा प्रोफेशनल असते आणि ती समजणे खूप अवघड असते परंतु काळजी करण्याचे कारण नाही कारण मी ह्या ठिकाणी तुम्हाला आपल्या बोली भाषेत समजून सांगणार आहे की damat अकाऊंट आणि ट्रेडिंग अकाउंट आणि सेविंग अकाऊंट चा शेअर्स मार्केट मध्ये भुमिका काय असते आणि का गरजेचे असते चला तर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करुयात
उदाहणार्थ:  समजा आपण भाजी मार्केट मध्ये चाललो आहोत त्या साठी आपण काय करु, घरात आपण  आपल्या कपाटा  मध्ये पैसे ठेवले असतील ते पैसे आपण आपल्या भाजी घेन्या साठी लागणार आहेत त्याचा आपण अंदाज घेऊन तेवढे पैसे पॉकेट मध्ये घेऊ  त्याच्या नंतर आपण भाजी घेन्या साठी एखादी पिशवी घेऊ बाराबर ना!  आता एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या घरी असणारे कपाट हे आपले सेविंग ( बँक)  अकाऊंट आहे आणि आपले पॉकेट हे आपले ट्रेडींग अकाउंट आहे आणि आपल्या कडे भाजी घेतल्यानंतर ती ठेवण्या साठी असणारी पिशवी ही damat अकाऊंट आहे आता थोडे लक्ष्य देऊन समजून घ्यायचे आहे
शेअर्स मार्केट मध्ये आपल्याला पैसे गुंतवयाचे आल्यास आपण जसे कपाटातून आपल्याला लागणारे पैसे पॉकेट मध्ये घेतले तसेच शेअर्स मार्केट मध्ये सुद्घा आपल्याला किती पैशाची गुंतवणूक करायची आहे तेवढे पैसे आपण ट्रेडिंग अकाऊंट मध्ये घेतो ते पैसे घेण्याचे मार्ग एक तर आपण ऑन लाइन ट्रांसफर करु शकतो किवा चेक payment  करु शकतो आता आता आपण आसे समजू की बँक मधून आपल्या ट्रेडिंग अकाऊंट मध्ये पैसे आले आता आपण भाजी मार्केट मध्ये भाजी घेतल्या नंतर जसि आपण भाजी पिशवी मध्ये ठेवतो आणि पॅकेट मधले पैसे भाजी वाला आहे त्याला देतो त्याच प्रमाणे शेअर्स मार्केट मध्ये सुद्घा आपण जेवढे किमतीचे शेअर्स घेतो ती किमत तेवढे पैसे आपल्या ट्रेडिंग a/c मधून समोर च्या वेक्तिला जातात आणि त्याच्या कढे असणारे शेअर्स आपल्या damat अकाऊंट मध्ये येतात जसे की भाजी आपल्या पिशवी मध्ये आली आता हे घेणे किवा देणे आपल्याला करायचे नसते त्याच्या साठी शेअर्स ब्रोकर असतो तो हे सर्व काम करुन देतो आपल्याला फक्त भाजी कोणती घ्यायची आहे 100 रुपये  किलो वांगी की 70 रुपये किलो भेंडी ते ठरवायचे असते  तसेच शेअर्स मार्केट मध्ये सुद्घा कोणाता शेअर्स विकत घ्यायचा आहे तो ठरवायचा असतो आणि तशी ऑर्डर आपल्या शेअर्स ब्रोकर ला सांगायची असते  त्याच्या साठी आपल्याला ब्रोकरला एक ठराविक रक्कम द्यावी लागते त्याला ब्रोक्रेज चार्जेस बोलतात

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...