Skip to main content

#लोगो रेजिस्त्राशन | ट्रेडमार्क....

*लोगो रेजिस्त्राशन | ट्रेडमार्क*

*जगातील टॉप कंपन्यांचे लोगो आणि त्यामागे दडलेला अर्थ*_

*असे लोगो रजिस्टर करणे खूप महत्त्वाचं आहे:*

_प्रत्येक कंपनीच्या लोगोचा अर्थ, डिझाईन ,रंग या प्रेत्येकाचे एक वेगळेपण आहे. प्रत्येक कंपनीचा लोगो हा फक्त आपले नाव करण्यासाठी तयार केलेले नाही, तर त्याचे विशिष्ट असे वेगळेपण सुद्धा आहे._

*HUYNDAI*
खूप लोक विचार करतात कि साऊथ कोरिया ची कंपनी HUYNDAI चा लोगो खूप साधा आहे. इंग्रजीतील अक्षर H आहे. पण हा लोगो नीट पाहिला असता, या लोगोचा अर्थ बघितला असता H या अक्षरात दोन व्यक्ती हात मिळवत आहे, एक ग्राहक आणि एक कंपनीचा प्रतिनिधी.

*AMAZON*
AMAZON बघताच क्षणी आपल्याला त्या लोगो मध्ये काहीच दिसत नाही. पण हा लोगो कंपनीची फिलॉसॉफी लक्षात घेऊन तयार केलेला आहे. लोगोचा अर्थ बघितला असता ऑरेंज रंगातील वाकडा आकार जो आहे तो स्माईलचे चिन्ह दाखवतो. कारण कंपनी कोणत्याही प्रकारे ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी लक्ष देत होती. ऑरेंज रंगातील आकार जो आहे तो A पासून Z पर्यंत जोडलेला आहे. म्हणजे A ते Z या सगळ्या वस्तू ते विकत असतात.

*TOYOTA*
भरपूर लोक TOYOTA या कार बनवण्याच्या जपानच्या कंपनीचा लोगो म्हणजे टोपी घातलेला काऊ बॉय शी तुलना करतात. पण या लोगोचा अर्थ बघितला असता, सुईच्या छिद्राला (डोळ्याला) दाखवत असून त्यातून दोरा जात असलेलं दाखवत आहे. म्हणजेच हा कंपनीचा भूतकाळ दर्शवतात. कारण हि कंपनी आधी कपडे तयार करायचे काम करत असत. विविध भागांना एकत्र केले तर कंपनीचे नाव तयार होते.

*BASKIN ROBBINS*
BASKIN ROBBINS हि जगभरातील सगळ्यात मोठी ICE CREAMS बनवणारी कंपनी आहे. यातील B आणि R हा गुलाबी रंगातून 31 हा नंबर दाखवतो. याचे कारण म्हणजे हि कंपनी 31 प्रकारच्या Flavors मध्ये ICE CREAMS बनवत असते.

*FedEx*
कुरिअरच्या क्षेत्रातली फेडएक्स ही एक अग्रगण्य कंपनी असून अतिशय वेगळा आणि आकर्षक असा फेडएक्स या कंपनीचा लोगो आहे. हा लोगो दिसताना फक्त या कंपनीचे नाव दिसते. पण जर तुम्ही निरक्षण करून या लोगोकडे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की 'ई' आणि 'एक्स' या दोन शब्दांच्या मधे एक अ‍ॅरो दिसतो. हा अ‍ॅरो कंपनीच्या पुढे नेणा-या विकसित विचारांना आणि भविष्याकडे कंपनीचा बघण्याचा दृष्टिकोन दर्शवतो.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...