स्टीव्ह जॉब्स – ज्या कंपनीने कपट करून हाकलले तिलाच सर्वोत्तम बनविले. Posted on Business world स्टीव्ह जॉब्स यांनी १९७६ मधे अॅप्पल या कंपनीची स्थापना केली होती. कंपनीचा कारभार सुरळीत सुरु असताना तत्कालीन सीईओ जॉन स्कुली यांनी कारस्थान रचून जॉब्स यांना कंपनीबाहेर काढले. वास्तविक जॉन यांना स्टीव्ह यांनी कंपनीत आणले होते. पण जॉन यांनी डायरेक्टर बोर्डाला हाताशी धरून जॉब्स यांच्याविरोधात मोहीम राबवली आणि त्यांना कंपनीबाहेर काढले. स्टीव्ह जॉब्स यांनी कंपनीबाहेर पडल्यानंतर नेक्स्ट नामक कंपनी स्थापन केली. इकडे जॉब्स बाहेर पडल्यामुळे अॅप्पल ला उतरती कळा लागली. कंपनीची बाजारातील भागीदारी १६ टक्क्यांवरून ४ टक्क्यांपर्यंत घसरली. यानंतर व्यवथापनाचे डोळे उघडले आणि त्यांनी जॉब्स यांना पुन्हा कंपनीत येण्याची विनंती केली. जॉब्स पुन्हा अॅप्पल मध्ये परतले आणि त्यांनी अल्पावधीतच कंपनीला जगातील सर्वोत्तम कंपनी बनविले. युवा वर्गाला आकर्षित करतील अशा नवनवीन उत्पादनांना मार्केटमधे आणण्याचा त्यांनी धडाका लावला. आजही कंपनी जगभरातील करोडो हृदयावर राज्य करते. कंपनीचे आर्थिक उत्पन्न हे एखाद्या प्रगत देशाला लाजवेल असे आहे. नुकताच कंपनीने १००० अब्ज डॉलर्स च्या मार्केट कॅपिटल चा टप्पा पार केला. १००० अब्ज डॉलर्स मार्केट कॅपिटल असणारी अॅप्पल हि एकमात्र कंपनी आहे. स्टीव्ह जॉब्स यांच्या नावावर ३०० पेक्षा जास्त पेटंट आहेत. जन्म – २४ फेब्रुवारी १९५५ निधन – ५ ऑक्टोबर २०११ १७ व्य वर्षी पहिली नोकरी सुरु केली, २१ व्य वर्षी अॅप्पल ची स्थापना केली. २०१७ मधील एकूण उलाढाल – २२९ अब्ज डॉलर्स २०१७ मधील निव्वळ नफा – ४८ अब्ज डॉलर्स मार्केट कॅपिटल – १०००+ अब्ज डॉलर्स एकूण कर्मचारी संख्या १,२५,००० पेक्षा जास्त _ उयोजक मिञ
*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...
Comments
Post a Comment