*प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (Private Limited Company)*
ह्या प्रकारात कमीत कमी २ व्यक्ती असणे गरजेचे आहे. त्यांना शेअरहोल्डर किंवा भागधारक म्हणतात. जास्तीत जास्त २०० शेअरहोल्डर असू शकतातकंपनी बनवताना कमीत कमी १,००,००० रुपये भांडवल म्हणून कंपनीत टाकणे गरजेचे असतेह्या प्रकारची कंपनी सर्वसामान्य नागरिकांना तिचे भागधारक होण्यासाठी आमंत्रित करू शकत नाही. याचा अर्थ असा की ही कंपनी वर्तमानपत्रात / टीव्हीवर तिचे शेअर (समभाग) विकण्यासाठी जाहिरात करू शकत माही. ह्या कंपनीचे शेअर खरेदी-विक्री हे खाजगी प्रकरण असते म्हणून त्याला प्रायव्हेट म्हणतात आणि दायित्व मर्यादित असते म्हणून लिमिटेड म्हणतातप्रायव्हेट लिमिटेड कंपनीला स्वतःचे कायदेशीर अस्तित्व असते. कायद्याने ती एक कृत्रिम व्यक्ती असल्यासारखेच असतेसर्वसामान्य जनतेकडून ह्या प्रकारची कंपनी बॉण्ड्स किंवा कर्जाद्वारे पैसे उचलू शकत नाहीकंपनीच्या नावामध्ये प्रायव्हेट लिमिटेड (Private Limited) किंवा Pvt. Ltd. असे लिहिलेले असते. उदाहरणार्थ गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Google India Pvt. Ltd.) ही कंपनीएक व्यक्ती सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (Private Limited Company) बनवू शकतो पण त्याला वन पर्सन कंपनी (One Person Company) किंवा ओपिसी (OPC) म्हणतात. एकच व्यक्ती हे वैशिष्ट्य प्रोप्रायटरशिप ह्या प्रकारामधून घेतले आहे. ओपिसी (OPC) साठी बाकी सर्व नियम जवळपास प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखेच असतात. ओपिसी (OPC) हा प्रकार नुकताच म्हणजे २०१३ मध्ये भारताच्या संसदेने पारीत केलेल्या कंपनीज ऍक्ट (Companies Act., 2013) कायद्यानुसार सुरु केला आहे.
Comments
Post a Comment