*उद्योग आणि मराठी माणूस...* -------------------------------- १७. श्रीमंती म्हणजे खरे जीवन; गरीबी म्हणजे रोजचे मरणच... -------------------------------- वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार ज्यांना अन्न, वस्त्र निवारा, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा इत्यादी किमान मानवी व नागरी सुविधा एक मनुष्य प्राणी म्हणून मिळत नाहीत, असे गरीब लोक जगात तब्बल ६३% हून अधिक आहेत. गरिबीमुळे मानवाच्या जीवनावर कोणकोणते परिणाम होतात ते पहा, त्याची श्रीमंतीशी तुलना करून पहा. १) जन्म : गर्भवती महिलेला चांगला आहार मिळाला नसल्यामुळे गरीब कुटुंबातील मुले कुपोषित व अशक्त जन्माला येतात, उलट श्रीमंत घरात सशक्त मुले जन्माला येतात व त्यांचा बुद्धांक चांगला असतो. २) शिक्षण : गरिबीमुळे जगातील ५०% मुले उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. आज तर इंग्रजी शाळांचे फॅड आहे, गरीबांना वर्षाला १ लाख फी कशी परवडणार? श्रीमंत लोक मुलांना इंग्रजी शाळा, उच्च तंत्रज्ञान, विदेशात शिक्षण देतात व त्यांची मुले आयुष्यात पुढे जातात. त्याउलट गरिबीमुळे निरक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे. ३) आरोग्य : सध्या अनेक आजारांचे उपचार इतके महागले आहेत की, ते गरीबांना घेणे शक्य नाही. हृदयविकार, किडनी, गुडघेदुखी इत्यादींचा किमान उपचारखर्च ३ लाखांहून अधिक आहे. कित्येक गरीब लोक उपचाराविना मरून जात आहेत. ९९% गरीब वृद्धांचे गुडघेदुखीचे ऑपरेशन पैशामुळे होत नाही, या उलट श्रीमंत अशा कोणत्याही आजारामुळे पैसे नाही म्हणून मरत नाही. ४) अंधश्रध्दा : गरिबीमुळे निरक्षरता व पुढे अंधश्रध्दा वाढीस लागते. आफ्रिकन, आदिवासी लोकांमध्ये गरीबीमुळे प्रचंड अंधश्रध्दा आहे. बळी देण्याचे, बालविवाहाचे प्रमाण प्रचंड आहे. श्रीमंतीमुळे काही प्रमाणात अंधश्रध्दा लांब जाते व जीवनाचा विकास होतो. ५) दंगली : जगात सर्वाधिक दंगली व सिव्हील वॉर हे गरीब देशात व गरीब वस्तीत होते. कांगो देशात २० लाख लोक मृत्युमुखी, रवांडात २५ लाख, कंबोडिया ३ लाख, श्रीलंका १ लाख जणांचा जीव गेला. भारतातील उत्तरप्रदेश व बिहारमध्ये सर्वाधिक दंगली होतात. मुंबईत झोपडपट्टीतच सर्वाधिक दंगली झाल्या. या उलट उच्चभ्रु लोकवस्तीत दंगली व सिव्हील वॉर सहसा होत नाही. अमेरिका, युरोपात अशी दंगल किंवा सिव्हील वॉर झालेले कधीही आपण ऐकले नाही. श्रीमंताचा भाग हा त्यामानाने सुरक्षित असतो. ६) आत्महत्या : जगात जेवढ्या आत्महत्या होतात, त्यास मोठ्या प्रमाणात गरीबी हे कारण आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या पहा. केवळ काही हजार व लाख रुपयांच्या कर्जापायी हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. याउलट श्रीमंत, व्यापारी, उदयोजक यांनी कधी अशी आत्महत्या केल्याचे ऐकले आहे का? ७)चिंता : जागतिक मतानुसार, चिंता ही सर्वाधिक गरीब लोकांकडून केली जाते. गरीब लोकांचे जवळजवळ संपूर्ण आयुष्य चिंता करण्यात जाते. मुलांची फी भरायची आहे, गॅस संपला, घराचा हप्ता, कंपनी बंद पडली, मुलींचे लग्न, दवाखान्याचा खर्च, नोकरी मिळेना, एक ना अनेक अशा हजारो चिंता गरीब माणसांना सतावत असतात. या उलट श्रीमंतांना वरील पैकी एकही चिंता नसते. ८)अपघात : गेल्या दहा वर्षात केवळ लोकल रेल्वे अपघातात मुंबईचे २७ हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडलेत. अत्यंत गर्दी व चेंगराचेंगरीतून आणि असुरक्षित प्रवासामुळे अनेक लोक मरतात. ग्रामीण भागात अनधिकृत वाहन प्रवासामुळे प्रत्येक वर्षाला किमान १ लाख २० हजारांहून अधिकजण मरतात. या उलट श्रीमंत लोक एसी डबा किंवा कार किंवा विमानाने प्रवास करतात. सुरक्षित व आरामदायी प्रवासामुळे श्रीमंतांचे असे मृत्यू होत नाहीत. ९)शिक्षा न्याय : न्याय हा सुध्दा श्रीमंतांच्या बाजूने झुकताना दिसतो. जगातील जेवढे जेल आहेत, त्यात ९९.९% हे गरीब कैदी आहेत. पोलीस ठाण्यातसुध्दा श्रीमंतावर गुन्हा नोंदवणे टाळले जाते, सर्व कायदे हे फक्त गरिबासाठीच आहेत. कोणा श्रीमंताला जन्मठेप, फाशी झाल्याचे तुम्ही ऐकले आहे का? कोणा श्रीमंताला कार अॅक्सीडेंटमध्ये शिक्षा झालेले तुम्ही ऐकले आहे का? १०)देहव्यापार : जगात चालणारा देहव्यापार, मग तो वेश्याव्यवसाय असो व मानवी अवयवांची विक्री असो, गरीब कुटुंबातील मुलींची विक्री देहव्यापारासाठी केली जाते. किडनीसारखे अवयव गरिबीमुळे लोक विकतात आणि ह्या गोष्टी श्रीमंत लोक विकत घेतात. ११) बेकारी : गरीब लोकांच्या देशात सुशिक्षित बेकारी खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. गरिबीमुळे मार्ग व संधीपर्यंत पोहचत नसल्याने गरीब मुले बेकार म्हणून कित्येक वर्ष जीवन कंठतात, याउलट श्रीमंतांना पैशाच्या जोरावर अनेक संधी मिळतात व ते पुढे निघून जातात. १२) व्यसने : नैराश्य व वाईट वातावरणामुळे गरीब कुटुंबे दारू, मटका, जुगार अशा अनेक व्यसनांनी ग्रासलेली असतात व कित्येक कुटुंबे या व्यसनामुळे उध्वस्त होतात. श्रीमंत अशा व्यसनांपासून दूर असतात. मोठ्या उद्योजकाचे घर व्यसनामुळे उध्वस्त झालेले कुणी पहिले आहे का? १३)गुन्हेगारी : गरिबीमुळे अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळतात. उदा. चोऱ्या, गुंडगिरी, स्मगलिंग इत्यादी. याउलट पुरेसा पैसा आल्याने श्रीमंत घरातील मुले गुन्हेगारीकडे वळताना दिसत नाहीत. १४) कलह : गरीब घरात कौटुंबिक कलह खूप मोठया प्रमाणावर दिसतो. महिलांची भांडणे, भावा-भावाची भांडणे इत्यादी खूप मोठया प्रमाणावर असतात. खाणारी तोंडे जास्त व कमाई कमी त्यामुळे कलह वाढतो. उलट श्रीमंत घरात खाणारी तोंडे कमी व पैसा मुबलक त्यामुळे कलह तितकासा आढळत नाही. १५) लैंगिक कुचंबणा: गरिबीमुळे नोकरी नाही, व्यवसाय नाही त्यामुळे मुलांचे विवाह खूप वेळाने होतात. त्यामुळे त्यांना लैंगिक कुचंबणा होते. सुशिक्षित बेकार मुलांचे लग्न कसे होईल असा प्रश्न असतो. याउलट श्रीमंत मुलांची लग्ने खूपच लवकर होतात. १६) मतपेटी : गरिबांचा फक्त मतपेटी म्हणून वापर केला जातो. गरीब गल्लीत, गावात, घरात लोकनेते फक्त निवडणुकीच्या काळात ५ वर्षातून एकदाच येतात. याउलट श्रीमंताकडे कायम नेते, व्यापारी लोकांची उठबस चालू असते. १७) रांगेत : गरीबांना आयुष्यभर रांगेत उभा राहावे लागते. सेकंड क्लासची, बसची रांग, रेशन दुकानात रांग, जेथे जावे तेथे रांग... गरिबांच्या नशिबी रांगेत उभे राहणे असते, याउलट श्रीमंत कधीही कुठल्या रांगेत उभा राहिलेला दिसत नाही. १८) मनोरुग्ण : गरिबी, व्यसन, कलह या इतर सर्व बाबींचा परिणाम म्हणून गरीब कुटुंबातील लोक मनोरुग्ण होण्याचे प्रमाण खूप मोठया प्रमाणावर जगभर आढळते. याउलट श्रीमंत घरात हे प्रमाण तितकेसे आढळत नाही. श्रीमंत होण्यासाठी जेवढे करावे लागते. त्यापेक्षा जास्त गरिबेमुळे येणाऱ्या वेदना व त्रास सहन करण्यासाठी यातना व कष्ट पडतात. त्यामुळे गरीब राहण्यापेक्षा श्रीमंत होणे कमी मेहनतीचे आहे. फरक इतकाच की, गरिबीची मेहनत योग्य वेळ, योग्य दिशेने काम न केल्याने करावी लागते व श्रीमंतीची फळे योग्य वेळ, योग्य दिशेने मेहनत केल्यामुळे मिळतात. आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात त्यासंबंधीचे विवेचन करण्याचा व माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा. - प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया
*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...
Comments
Post a Comment