*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
*_११. छत्रपती शिवाजी महाराजांनी नोकरी केली असती तर..._*
--------------------------------
छत्रपती शिवाजी महाराजांनी नोकरी केली असती तर आज आपल्या स्वराज्याची स्थापनाच झाली नसती...
*>> इतिहास :*
सुमारे ३०० ते ४०० वर्षापूर्वी मुघल, इंग्रज, डच अशी अनेक प्रचंड, प्रबळ व शक्तिमान आक्रमणे महाराष्ट्र व भारतावर झाली. ज्यांना आपला स्वाभिमान राखता आला नाही, घाम व रक्त गाळण्याची भीती वाटली, त्यांनी हत्यारे खाली टाकली व मुघलांची वतनदारी स्वीकारली आणि एक ठरवलेला भूभाग मिळाला. जनतेवर अन्याय करून कर गोळा करा व मुघलांना द्या आणि आपला पगार व नोकरी वाचवा. आपली चमडी वाचवण्यासाठी जनतेला व पुढच्या पिढीला त्यांनी वाऱ्यावर सोडले. पण शिवाजी महाराजांनी वतनदारी न स्वीकारता शत्रूशी दोन हात करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
*>> कष्ट घेतले :*
हिंदवी स्वराज्यासाठी आयुष्यातील ६०% हून अधिक काळ लढाई, संघर्ष, धोका, प्रवास इत्यादीत गेले. जीवावर बेतणारे कितीतरी प्रसंग महाराजांच्या आयुष्यात आले. मित्रहो थोडा विचार करा, जर महाराजांनी वतनदारी स्वीकारली असती, तर घामाचा एक थेंबही न गाळता त्यांना ऐशोरामात जीवन जगता आले असते.
*>> का व कुणासाठी? :*
जीवनाचा खरा अर्थ शिवाजी महाराजांच्या चरित्रातून कळतो. स्वाभिमान म्हणजे जीवन... तुमच्या धर्माची स्वायत्तता व स्वातंत्र्य म्हणजे जीवन... स्वयंभू संरक्षण म्हणजे जीवन... आपल्या भूमीची, आई, बहिणीची सक्षमता म्हणजे जीवन... स्वमालकीचे निरंतर साधन म्हणजे जीवन... महाराजांनी जे केलं ते ह्या उभ्या मराठी माणसासाठी व महाराष्ट्रातील पुढील पिढ्या स्वाभिमानाने जगण्यासाठी.
*>> नोकरी केली असती तर :*
थोडा वेळ अशी कल्पना करा की, महाराजांनी मुघलांची नोकरी केली असती तर, हिंदवी स्वराज्याची स्थापनाच झाली नसती. महाराष्ट्राचे नाव महंमदस्थान असले असते, मुंबईचे नाव महंमदपूर असले असते, पुण्याचे नाव पठाणपूर असले असते. अशीच सर्व शहरांची नावे असती. मुलांचे नाव काय असते? माधवचे नाव महंमद, सीताचे समिना, रंजनाचे रहिमा असले असते. पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर येथे देवाचे मंदिर नाही, तर मशिदी असल्या असत्या. थोडक्यात काय तर महाराष्ट्र हा अफगाणिस्तान असला असता. महाराजांनी नोकरी केली नाही म्हणून आज महाराष्ट्र हा ३०० वर्षानी ही स्वाभिमानाने व ताठ मानेने उभा आहे.
*>> ज्यांनी नोकरी केली :*
जरा विचार करा, गेल्या पन्नास वर्षात ज्यांची शेकडो एकर शेती, वाडे, जागा सर्वकाही होते, परंतु या वतनदारांनी व्यवसाय, उद्योग न करता प्रत्येक महिन्याला पगार मिळतो म्हणून पोलीस, शिक्षण, सेनेत नोकऱ्या केल्या. महागाई वाढत गेली. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी वडिलोपार्जित जमिनी विकल्या गेल्या. आता पुढच्या पिढीकडे नोकरीही नाही, संपत्तीही नाही. स्वतःच्याच महाराष्ट्रात जैन, मारवाडी इत्यादींकडे मोलकरीण, ड्रायव्हर, वॉचमन, कामगार, हमाल इत्यादी नोकरी करायची वेळ आली. ही वेळ का आली? कारण महाराजांनी निर्माण केलेले स्वतःचे साम्राज्य, स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा उद्योग, स्वतःचे उत्पन्नाचे साधन टिकवण्याचे व वाढवण्याचे आपण विसरलोत.
*>> शेवटची संधी :*
मुंबईत फक्त २% प्रॉपर्टी कार्डवर मराठी माणसाचे नाव आहे; ९८% संपत्ती ही इतरांच्या, बिगर मराठी लोकांच्या नावे आहे. हे प्रस्थ नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर व इतर जिल्हा, तालुका इत्यादी क्षेत्रात पसरू लागले आहे. मोठमोठे व्यापारी उद्योजक यांनी संपत्ती विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. मुंबईतला मराठी माणूस विरार, वसई, अंबरनाथ, टिटवाळा, असा लांब फेकला जावू लागला आहे, आता जर जागे नाही झालात, तर पुन्हा संधी मिळणार नाही तुम्ही व तुमची पिढी इतरांचे गुलाम म्हणून आफ्रिकन लोकांप्रमाणे जीवन कंठाल.
महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा, मराठी मुलं उच्चतम स्पर्धेत यशस्वी व्हावीत यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते
Comments
Post a Comment