Skip to main content

पण हिंमत हारू नका !

अचानक कंपनी बंद पडणं , कंत्राट संपण,
जॉब जाणं,
व्यवसाय अडचणीत येणं,
उत्पन्न एकदम कमी होण 
हे कोणाच्याही 
आणि केंव्हाही वाट्याला येऊ शकतं 
त्रास होणं , झोप उडन , काळजी वाटणं स्वाभाविक आहे 
पण हिंमत हारू नका !मात्र काही निर्णय ताबडतोब घ्यावे लागत
चार रूम मध्ये राहात असाल दोन रूम मध्ये रहा
दोन मध्ये रहात असाल एक मध्ये जा
फोर व्हीलर वापरत असाल
टू व्हीलर घ्या
चारिठाव स्वयंपाक होत असेल
फक्त पोळी-भाजी वर या
काही loan घेतलेले असेल तर ते Clear करण्याचा प्रयत्न करा !
नातेवाईकाला शिव्या देऊ नका
फालतू डायलॉगबाजी अगोदर बंद करा
वेळच येऊ नये , कुणीच कुणाचं नसतं
त्याच त्या घिस्यापिट्या कॅसेट्स वाजउ नका !
शंभर पैकी दोन चार जण नक्की मदत करत असतात
त्यांचं नाव घ्या
96 जणांना नावं ठेवण्या पेक्षा 4 जणांना चांगलं म्हणा !
थोडक्यात काय ,
आपला आर्थिक स्रोत कमी झाला आहे
हे समजून घ्या
आणि गरजा कमी करा !
अजून एक महत्वाची गोष्ट
अशा प्रसंगी .......

बायकोने नवऱ्याला साथ देणे
खूप गरजेचे आहे
त्याला टोमणे मारू नका ,
त्याच्या दुर्गुणांवर बोट ठेवण्याची ही वेळ नाही
हे जरा समजून घ्या
शाब्दिक बाणांनी सुद्धा माणूस घायाळ होऊन कोलमडून पडू शकतो
हे नीट समजून घ्या.
आहे त्या परिस्थितीत मी तुमची साथ देईल
तुम्हाला सोडून जाणार नाही
अवास्तव मागण्या करणार नाही
असा त्याचा अर्थ असावा !
वाढलेले खर्च कमी कसे करता येतील
ती पावलं अगोदर उचला
पोरं जर खूप जास्त फिस असणाऱ्या मोठाल्या शाळेत असतील
तर त्यांच्या शाळा बदला
फिस भरतांना ओढाताण होणार नाही
त्या शाळेत टाका
लोकांच्या हसण्याचा नाही स्वतःच्या खिशाचा विचार करा !
दिवस राहत नसतात
मार्ग निघत असतात
कोणतंही काम करण्याची
लाज बाळगू नका
अगदी भाजी पोळी करण्या पासून ते
ड्रेस मटेरियल विकण्या पर्यंत काहीही करा
घरातल्या मोबाईलची संख्या कमी करा
इतरांशी स्पर्धा करू नका , तुलना करू नका
कोणाच्याही लग्नाकार्यात उपस्थित राहण्या पेक्षा चार पैसे कमवण्यासाठी वेळ खर्च करा
कमी पगारावर join व्हायची वेळ आली तरी पटकन हो म्हणा
हेच मार्ग आहेत संकटातून बाहेर पडण्याचे !
नातेवाईकांना , लोकांना शिव्या देऊन काहीही होत नसतं
कोणी न कोणी मदत करतच असतं
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा
उद्या दिवस सुधारल्या नंतर ज्यांनी मदत केली होती
त्यांच्या वरच तगंड वर करू नका !
कारण मदत करणाऱ्याचे अनुभव फार चांगले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे !
हे मत बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा
सगळं चांगलं होईल
काळजी करायची नाही आणि
हिंमत हारायची नाही !!!
काहि महत्वाच्या टिप्स :-
1. तुम्ही हालाखीत आहात याचा पाढा सर्वांसमोर सतत वाचू नका. लोक तुमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतील.
2. आपले जवळचे मित्र कोण त्यांच्याकडे मनमोकळेपणाने बोला. खरे मित्र या परिस्थितीत तुमच्या बाजूने उभे राहतात. हीच ती वेळ आहे जेव्हा खरे मित्र ओळखता येतात.
3.नातेवाईक अश्या प्रसंगी दूर जाण्याचा प्रयत्न करतात हे लक्षात ठेवा.
4. कागद व पेन घ्या. तुमच्या कुटूंबासोबत बसून महिन्याचे एकूण खर्च लिहून काढा. कोणते खर्च कमी करता येतील ते ठरवा. यामुळे संपूर्ण कूटूंब तुमच्या मदतीला येते.
5. स्वत:वर विश्चास ठेवा. या जगात फक्त तुम्ही आणि तुम्हीच स्वत:ला सर्वात जवळून ओळखता.
6. जग काय म्हणेल हे विसरा. जगाला तुमची काही पडलेली नाही.
7. छोटा व्यवसाय देखील उद्या तुम्हाला मोठ करु शकतो हे लक्षात घ्या.
8. व्यवसाय करताना लाज मनात बाळगू नका. लक्षात घ्या तुम्ही कमवून खात आहात चोरी करुन नाही.
9. योग्य आर्थिक नियोजन करा. कुटुंबाचा मेडीक्लेम व लाईफ ईन्शूरन्स हा एखाद्या तज्ञ आर्थिक सल्लागाराकडूनच करुन घ्या. लक्षात ठेवा योग्य तज्ञ आर्थिक सल्लागार तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतो.
लेखकाचे आभार..!!

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...