*व्यावसायिक नवीन कल्पनांना भरारी द्या*
■■■■■■■■■■■■■■■■
आजकालचे बहुतांशी युवक नागरिकांच्या अडचणी, समस्या जाणून आहेत आणि त्यावर समाधान शोधण्यासाठी व्यवसाय सुरू करत आहेत. अशा उद्योजकांचा नवीन व्यवसाय देखील नवनवीन उंची गाठत आहेत. जर आपण स्वत:चा व्यवसाय सुरू करू इच्छीत असाल आणि बॉस व्हायचे असेल तर आपल्याला नवीन कल्पनांचा शोध घ्यावा लागेल.
आजकालचे बहुतांशी युवक नागरिकांच्या अडचणी, समस्या जाणून आहेत आणि त्यावर समाधान शोधण्यासाठी व्यवसाय सुरू करत आहेत. अशा उद्योजकांचा नवीन व्यवसाय देखील नवनवीन उंची गाठत आहेत. जर आपण स्वत:चा व्यवसाय सुरू करू इच्छीत असाल आणि बॉस व्हायचे असेल तर आपल्याला नवीन कल्पनांचा शोध घ्यावा लागेल.
आपल्याला नवीन कल्पनांचा शोध घ्यावा लागेल.
ऑनलाइन फंडरेजिंग कन्सल्टंट : जर आपल्याला फायन्सान्स आणि सेल्सचा अनुभव असेल आपण चॅरिटीजसाठी आपण स्वत: फंडरेजिंग कन्सल्टंसी सुरू करू शकतो. आपल्यासमवेत काम करणार्या चॅरिटीजचा शोध घ्यावा लागेल. याशिवाय आपल्याला नेटवर्किंगही वाढवावे लागेल.
जेणे-करून या क्षेत्रात काम करणार्या मंडळींशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. त्यानंतर आपल्याला त्या लोकांच्या अभियानासाठी किंवा आंदोलनांसाठी पैसे गोळा करू शकतो, असा विश्वास मनात निमाण करून द्यावा लागेल. यासाठी आपण प्रभावीपणे फंडरेजिंग कार्यक्रमाचे आयोजन करू शकता. त्याचबरोबर आपण योग्य रितीने सादर केल्यास क्लाइंटला चांगला फायदा करून देऊ शकता.
ग्रीन अॅप डेव्ह-लपर : जी मंडळी इको फ्रेंडली आणि ग्रीन होण्याची इच्छा बाळगून आहेत, त्यांना सुरवात कोठून करावी याची माहिती नसते. आपण अशा मंडळींना सहकार्य करू शकतो. संकेतस्थळ आणि मोबाइल अॅप्लिकेशन तयार करून यूर्जसंना इको-फ्रेंडलीबाबत मार्गदर्शन करू ाकतो. याशिवाय एनर्जी कंन्जरवेशन, रिसायकलिंग, इको फ्रेंडली प्रॉडक्टस, घर आणि कामावर ग्रिन लिव्हिंगचा अवलंब करण्यासंदर्भात माहिती देऊ शकता.
सोशल क्राऊडफंडिग : सोशल क्राऊडफंडिगच्या माध्यमातून सोशल उद्योजक आपल्या उत्पादनासाठी फंडिंग शोधत राहतात. त्यानुसार आपण एक सोशल क्राऊडफंडिग तयार करू शकतो. जे मानवी प्रकल्प आहेत अशा प्रकल्पांना निधी देणार्या इच्छुंक मंडळींना जोडू शकतो. त्यात आपण फिस घेण्याऐवजी एखादे आश्वासन देऊ शकतो. जसे की गुंतवणुकदाराच्या रुपातून त्यांना सकारात्मक रुपाने हायलाइट करू शकता किंवा त्यांना प्रकल्पात लाइफटाइम मेबंरशिप देऊ शकतात.
एज्यूकेशनल ट्रॅव्हल कंपनी : आजकाल अनेक मंडळी हिंडण्या-फिरण्यावर पैैसा खर्च करत आहेत. ही मंडळी ज्या देशात आणि शहरात जातात तेथील सामाजिक उपक्रमात सहभागी होऊ इच्छितात. यासाठी आपण एक ऑनलाइन ट्रेवल कंपनी सुरू करू शकतो. यामाध्यमातून आपण ज्या ठिकाणी सामाजिक कार्यात सहभाग घ्यायचा आहे, अशा ठिकाणांची माहिती संबंधितांना उपलब्ध करून देऊ शकतो. याशिवाय फिरणार्या मंडळींसाठी आकर्षक पॅकेजही तयार करू शकतो की त्यात विमानप्रवास, वास्तव्य, आहार, वाहतूक, विविध उपक्रमातील सहभाग याचा समावेश असेल.
*©माहिती आणि संकलन*
*मराठा व्यवसाय संघ*
Comments
Post a Comment